Wildebeest analysis examples for:   mar-mar   ‍    February 25, 2023 at 00:40    Script wb_pprint_html.py   by Ulf Hermjakob

8202  2SA 7:19  हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या दृष्टीने ही केवळ लहान गोष्ट आहे; तू आपल्या सेवकाच्या घराण्यासंबंधाने पुढील बर्याच काळाचे सांगून ठेवले आहेस; प्रभू परमेश्वरा, हे सर्व तू मानवी व्यवहारासारखे केले आहेस.
8542  2SA 19:29  माझ्या बापाचे सर्व घराणे स्वामीराजासमोर मृतवत होते; तरी आपण आपल्या दासाची आपल्या पंक्तीस बसणार्यांमध्ये नेमणूक केली; महाराजांजवळ आणखी दाद मागायचा मला काय हक्क आहे?
14525  PSA 38:14  मी तर बहिर्यासारखा होऊन ऐकत नाही; मुक्यासारखा मी आपले तोंड उघडत नाही.
23244  MAT 2:6  ‘हे बेथलेहेमा, यहूदाच्या प्रांता, तू यहूदाच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही कारण तुझ्यातून असा सरदार निघेल जो माझ्या इस्राएल लोकांचा सांभाळ करील.’”
23250  MAT 2:12  देवाने त्यांना स्वप्नात हेरोदाकडे परत जाऊ नका, अशी सूचना दिल्यामुळे ते दुसर्या मार्गाने आपल्या देशास निघून गेले.
23264  MAT 3:3  कारण यशया संदेष्ट्याच्याद्वारे त्याच्याचविषयी असे सांगितले होते की, “अरण्यात घोषणा करणार्याची वाणी झाली; ‘परमेश्वराचा मार्ग तयार करा,’ त्याच्या ‘वाटा सरळ करा.’”
23324  MAT 5:21  ‘खून करू नको आणि जो कोणी खून करतो तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल,’ असे प्राचीन लोकांस सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे.
23325  MAT 5:22  मी तर तुम्हास सांगतो, जो कोणी आपल्या भावावर (उगाच) रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल; जो कोणी आपल्या भावाला, ‘अरे वेडगळा,’ असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या पात्र होईल आणि जो कोणी त्याला, ‘अरे मूर्खा,’ असे म्हणेल, तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल.
23346  MAT 5:43  ‘आपल्या शेजार्यावर प्रीती कर व आपल्या वैऱ्याचा द्वेष कर’, असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे.
23422  MAT 8:8  तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की, “प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अश्या योग्यतेचा मी नाही; पण आपण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल.
23423  MAT 8:9  कारण मीही एक अधिकारी असून माझ्या हाताखाली शिपाई आहेत. मी एकाला ‘जा’ म्हणले की तो जातो, दुसर्याला ‘ये’ म्हणले की तो येतो आणि माझ्या दासास ‘हे कर’ म्हणले की तो ते करतो.”
23434  MAT 8:20  येशू त्यास म्हणाला, “खोकडांस बिळे व आकाशातील पाखरांस घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला आपले डोके टेकण्यास ठिकाण नाही.”
23609  MAT 13:1  त्यादिवशी येशू घरातून निघून सरोवराच्या किनार्याशी जाऊन बसला
23610  MAT 13:2  तेव्हा लोकांचे समुदाय त्याच्याजवळ जमले; म्हणून तो मचव्यात जाऊन बसला व सर्व लोक किनार्यावर उभे राहिले.
23638  MAT 13:30  कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या; मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्यास सांगेन की, पहिल्याने निदण गोळा करा आणि जाळण्यासाठी त्याच्या पेढ्या बांधा; परंतु गहू माझ्या कोठारात साठवा.”
23649  MAT 13:41  मनुष्याचा पुत्र आपल्या देवदूतांना पाठवील आणि त्याच्या राज्यातून अडखळण करणाऱ्या सर्व वस्तू व अन्याय करणार्यांना जमा करील,
23656  MAT 13:48  ते भरलेल्या मनुष्यांनी ते किनार्याकडे ओढले आणि बसून जे चांगले ते भांड्यात जमा केले, वाईट ते फेकून दिले.
23660  MAT 13:52  तेव्हा तो त्यांना म्हणाला, “प्रत्येक नियमशास्त्राचा शिक्षक जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला आहे तो आपल्या भांडारातून नव्या जुन्या गोष्टी काढणार्या मनुष्यासारखा आहे.”
23664  MAT 13:56  याच्या बहिणी, त्या सर्व आपणाबरोबर नाहीत काय? मग ते सर्व याला कोठून?
24171  MAT 26:48  आणि त्यास धरून देणार्याने त्यांना खूण देऊन म्हणले होते की, मी ज्याचे चुंबन घेईन तोच तो आहे, त्यास तुम्ही धरा,
24979  LUK 1:17  आणि देवासाठी सिद्ध झालेले असे लोक तयार करायला, वडिलांची अंतःकरणे मुलांकडे आणि आज्ञा न मानणार्यांना नीतिमानांच्या ज्ञानाकडे वळवून प्रभूसाठी तयार केलेली प्रजा उभी करावयाला तो एलीयाच्या आत्म्याने आणि सामर्थ्याने त्यांच्यापुढे चालेल.
26142  JHN 1:29  दुसर्या दिवशी येशूला आपल्याकडे येताना पाहून योहान म्हणाला, “हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा!
26148  JHN 1:35  त्यानंतर दुसर्या दिवशी योहान व त्याच्या शिष्यांतील दोघांसह उभा असता;
26156  JHN 1:43  दुसर्या दिवशी त्याने गालील प्रांतात जाण्याचा बेत केला; आणि तेव्हा फिलिप्प त्यास भेटला; येशूने त्यास म्हटले, “माझ्यामागे ये.”
26165  JHN 2:1  नंतर तिसर्या दिवशी गालील प्रांतातील काना नगरात एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती.
26172  JHN 2:8  मग त्याने नोकरांना सांगितले, “आता आता त्यातले काढून भोजनकारभार्याकडे घेऊन जा,” तेव्हा त्यांनी ते नेले.
26173  JHN 2:9  द्राक्षरस बनलेले पाणी? भोजनकारभार्याने जेव्हा चाखले आणि तो कुठला होता हे त्यास माहीत नव्हते, पण ज्या नोकरांनी पाणी काढले त्यांना माहीत होते, तेव्हा भोजनकारभारी वराला बोलावून,
26179  JHN 2:15  तेव्हा त्याने दोर्यांचा एक कोरडा करून मेंढरे व गुरे या सर्वांना परमेश्वराच्या भवनातून घालवून दिले. सराफांचा पैसाही ओतून टाकला आणि चौरंग पालथे केले.
26180  JHN 2:16  व त्याने कबुतरे विकणार्यांना म्हटले, “ह्यांना येथून काढा, माझ्या स्वर्गीय पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका.”
26263  JHN 4:38  ज्यासाठी तुम्ही कष्ट केले नाहीत ते कापायला मी तुम्हास पाठवले. दुसर्यांनी कष्ट केले होते व तुम्ही त्यांच्या कष्टात वाटेकरी झालेले आहात.”
26327  JHN 6:1  या गोष्टी झाल्यानंतर येशू गालीलच्या सरोवराच्या दुसर्या बाजूस गेला ज्याला तिबिर्य सरोवरसुद्धा म्हणतात.
26339  JHN 6:13  मग जेवणार्यांना पुरे झाल्यावर त्यांनी जवाच्या पाच भाकरींचे उरलेले तुकडे गोळा करून बारा टोपल्या भरल्या.
26343  JHN 6:17  आणि एका तारवात बसून सरोवराच्या दुसर्या बाजूस कफर्णहूमकडे जाऊ लागले. इतक्यात अंधार झाला होता आणि येशू त्यांच्याकडे आला नव्हता.
26348  JHN 6:22  दुसर्या दिवशी जो लोकसमुदाय सरोवराच्या दुसर्या बाजूस उभा होता त्यांने पाहिले की, ज्या लहान होडीत त्याचे शिष्य बसले होते त्याच्याशिवाय तेथे दुसरे तारू नव्हते आणि येशू आपल्या शिष्यांबरोबर त्या तारवावर चढला नव्हता. तर त्याचे शिष्य मात्र निघून गेले होते.
26353  JHN 6:27  नष्ट होणार्या अन्नासाठी श्रम करू नका, पण सार्वकालिक जीवनाकरता, टिकणार्या अन्नासाठी श्रम करा. मनुष्याचा पुत्र ते तुम्हास देईल, कारण त्याच्यावर देवपित्याने शिक्का मारला आहे.”
26423  JHN 7:26  पाहा, तो उघडपणे बोलत आहे आणि ते त्यास काहीच बोलत नाहीत. हाच ख्रिस्त आहे, हे खरोखर अधिकार्यांना कळले आहे काय?
26445  JHN 7:48  अधिकार्यांपैकी किंवा परूश्यांपैकी कोणी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे काय?
26479  JHN 8:29  ज्याने मला पाठवले तो माझ्याबरोबर आहे; त्याने मला एकटे सोडले नाही; कारण मी नेहमी त्यास आवडणार्या गोष्टी करतो.”
26533  JHN 9:24  तेव्हा जो मनुष्य आंधळा होता त्यास त्यांनी दुसर्यांदा बोलावले आणि ते त्यास म्हणाले, “देवाचे गौरव कर; हा मनुष्य पापी आहे हे आम्ही जाणतो.”
26661  JHN 12:12  दुसर्या दिवशी सणास आलेले पुष्कळ लोक येशू यरूशलेम शहरास येत आहे असे ऐकून,
26691  JHN 12:42  तरी यहूदी अधिकार्यांतूनही पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, परंतु आपणांस सभास्थानाच्या बाहेर घालवू नये म्हणून परूश्यांमुळे ते तसे कबूल करीत नव्हते.
26770  JHN 15:2  माझ्यातील, फळ न देणारा, प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणार्या प्रत्येक फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्यास साफसूफ करतो.
26792  JHN 15:24  जी कामे दुसर्या कोणी केली नाहीत ती मी त्यांच्यामध्ये केली नसती तर त्यांच्याकडे पाप नसते. पण आता त्यांनी मला आणि माझ्या पित्यालाही पाहिले आहे व आमचा द्वेष केला आहे.
26808  JHN 16:13  पण तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हास मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल, कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही; तर जे ऐकेल तेच सांगेल आणि होणार्या गोष्टी तुम्हास कळवील.
26888  JHN 18:34  येशूने उत्तर दिले, “आपण स्वतः हे म्हणता किंवा दुसर्यांनी आपणाला माझ्याविषयी हे सांगितले?”
26912  JHN 19:18  तेथे त्यांनी त्यास व त्याच्याबरोबर दुसर्या दोघांना, एकाला एका बाजूस व दुसऱ्याला दुसऱ्या बाजूस आणि येशूला मध्ये असे वधस्तंभांवर खिळले.
26926  JHN 19:32  तेव्हा शिपाई आल्यावर त्यांनी त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळण्यात आलेल्या पहिल्याचे व दुसर्याचे पाय तोडले.
26938  JHN 20:2  तेव्हा शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूची प्रीती होती त्या दुसर्या शिष्याकडे धावत येऊन ती त्यांना म्हणाली, “त्यांनी प्रभूला कबरेतून काढून नेले आणि त्यास कोठे ठेवले हे आम्हास माहीत नाही.”
26971  JHN 21:4  पण आता पहाट होते वेळी येशू समुद्र किनार्याजवळ उभा होता, पण तो येशू होता हे शिष्यांना समजले नाही.
26975  JHN 21:8  आणि दुसरे शिष्य त्या लहान मचव्याने ते माशांचे जाळे ओढीत ओढीत आले कारण ते किनार्यापासून फार दूर नव्हते, पण सुमारे दोनशे हातावर होते.
26976  JHN 21:9  तेव्हा ते किनार्यावर बाहेर आल्यावर तेथे कोळशांचा विस्तव आणि त्यावर ठेवलेली मासळी आणि भाकरी पाहिली.
26978  JHN 21:11  तेव्हा शिमोन पेत्राने मचव्यावर चढून एकशे त्रेपन्न मोठ्या माशांनी भरलेले जाळे किनार्यावर ओढून आणले. ते तितके असतानाही जाळे फाटले नाही.
26984  JHN 21:17  तो तिसर्यांदा त्यास म्हणाला, “योहानाच्या पुत्रा, शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय?” पेत्र दुःखी होऊन त्यास म्हणाला, “प्रभू, तुला सर्व माहीत आहे, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” येशू त्यास म्हणतो, “माझी मेंढरे चार.”
28014  ROM 1:16  कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही कारण विश्वास ठेवणार्या प्रत्येकाला तारणासाठी, ती देवाचे सामर्थ्य आहे; प्रथम यहूद्याला आणि ग्रीकालाही.
28030  ROM 1:32  आणि या गोष्टी करणारे मरणाच्या शिक्षेस पात्र आहेत हा देवाचा न्याय त्यांना कळत असून ते त्या करतात एवढेच केवळ नाही, पण अशा गोष्टी करणार्यांना ते संमतीही देतात.
28031  ROM 2:1  तेव्हा दुसर्याला दोष लावणार्या अरे बंधू, तू कोणीही असलास तरी तुला सबब नाही; कारण तू ज्या गोष्टींत दुसर्याला दोष लावतोस त्यामध्ये तू स्वतःला दोषी ठरवतोस; कारण दोष लावणारा तूही त्याच गोष्टी करतोस.
28032  ROM 2:2  पण आपल्याला माहीत आहे की, अशा गोष्टी करणार्यांविरुद्ध, देवाचा सत्यानुसार न्यायनिवाडा आहे.
28033  ROM 2:3  तर अशा गोष्टी करणार्यांना दोष लावणार्या आणि आपण स्वतः त्याच गोष्टी करणार्या, अरे बंधू, तू स्वतः देवाच्या न्यायनिवाड्यातून सुटशील असे मानतोस काय?
28040  ROM 2:10  पण प्रत्येक चांगले करणार्या प्रथम यहूद्याला आणि मग ग्रीकास गौरव, शांती व सन्मान ही मिळतील.
28051  ROM 2:21  तर मग जो तू दुसर्याला शिकवतोस तो तू स्वतःला शिकवीत नाहीस काय? चोरी करू नये, असे जो तू घोषणा करतोस तो तू चोरी करतो काय?
28081  ROM 3:22  पण हे देवाचे नीतिमत्त्व येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे, विश्वास ठेवणार्या सर्वांसाठी आहे कारण तेथे कसलाही फरक नाही.
28095  ROM 4:5  पण जो काही करीत नाही, पण जो धर्माचरण न करणार्यास नीतिमान ठरवतो त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याचा विश्वास त्याच्या बाजूकडे नीतिमत्त्व म्हणून गणला जातो,
28131  ROM 5:16  आणि पाप करणार्या एकामुळे जसा परिणाम झाला, तशी देणगीची गोष्ट नाही; कारण एका अपराधामुळे दंडाज्ञेसाठी न्याय आला, पण अनेक अपराधांमुळे निर्दोषीकरणासाठी कृपादान आले.
28136  ROM 5:21  म्हणजे, जसे पापाने मरणाच्या योगे राज्य चालविले तसे कृपेने नीतिमत्त्वाच्या योगे प्राप्त होणार्या सार्वकालिक जीवनासाठी आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे राज्य चालवावे.
28160  ROM 7:1  बंधूंनो, (नियमशास्त्राची माहीती असणार्यांशी मी बोलत आहे) मनुष्य जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याच्यावर नियमशास्त्राची सत्ता आहे हे तुम्ही जाणत नाही काय?
28162  ROM 7:3  म्हणून पती जिवंत असताना, जर ती दुसर्या पुरुषाची झाली तर तिला व्यभिचारिणी हे नाव मिळेल. पण तिचा पती मरण पावला तर ती त्या नियमातून मुक्त होते. मग ती दुसर्या पुरुषाची झाली तरी ती व्यभिचारिणी होत नाही.
28163  ROM 7:4  आणि म्हणून, माझ्या बंधूंनो, तुम्हीपण ख्रिस्ताच्या शरीराद्वारे नियमशास्त्राला मरण पावलेले झाला आहात; म्हणजे तुम्ही दुसर्याचे, जो मरण पावलेल्यातून उठवला गेला त्याचे व्हावे; म्हणजे आपण देवाला फळ द्यावे.
28195  ROM 8:11  पण ज्याने येशूला मरण पावलेल्यातून उठवले त्याचा आत्मा जर तुमच्यात वास करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मरण पावलेल्यातून उठवले तो तुमच्यात राहणार्या, आपल्या आत्म्याच्याद्वारे तुमचीही मरणाधीन शरीरे जिवंत करील.
28222  ROM 8:38  कारण माझी खात्री आहे की, मरण किंवा जीवन, देवदूत किंवा सत्ता, आताच्या गोष्टी किंवा येणार्या गोष्टी किंवा बले,
28234  ROM 9:11  आणि मुलांचा जन्म झाला नसल्यामुळे काही चांगले किंवा वाईट कोणी केले नसताना निवडीप्रमाणे देवाची योजना कायम रहावी म्हणून कृतीप्रमाणे नाही पण बोलावणार्याच्या इच्छेप्रमाणे,
28243  ROM 9:20  पण उलट अरे बंधू, तू जो देवाला उलटून बोलतोस तो तू कोण आहेस? तू मला असे का केलेस, अशी कोणती वस्तू करणार्याला म्हणू शकेल?
28260  ROM 10:4  कारण ख्रिस्त हा विश्वास ठेवणार्या प्रत्येकाला नीतिमत्त्वासाठी नियमशास्त्राचा शेवट आहे.
28261  ROM 10:5  कारण नियमशास्त्राने प्राप्त होणार्या नीतिमत्त्वाविषयी मोशे लिहितो की, ‘जो मनुष्य ते आचरतो तो त्याद्वारे जगेल.’
28270  ROM 10:14  मग ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा ते कसा धावा करतील? आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते कसा विश्वास ठेवतील? आणि घोषणा करणार्याशिवाय ते कसे ऐकतील?
28277  ROM 10:21  पण इस्राएलाविषयी तो म्हणतो, ‘मी एका, अवमान करणार्या आणि उलटून बोलणार्या प्रजेपुढे दिवसभर माझे हात पसरले.’
28328  ROM 12:15  आनंद करणार्यांबरोबर आनंद करा आणि रडणार्यांबरोबर रडा.
28337  ROM 13:3  कारण चांगल्या कामात अधिकार्यांची भीती नाही पण वाईट कामात असते; मग तुला अधीकाराऱ्यांची भीती वाटू नये अशी तुझी इच्छा आहे काय? चांगले ते कर आणि तुला त्यांच्याकडून प्रशंसा मिळेल.
28338  ROM 13:4  कारण तुझ्या चांगल्यासाठी तो देवाचा सेवक आहे; पण तू जर वाईट करीत असलास तर भय धर, कारण तो विनाकारण तलवार धरीत नाही कारण तो वाईट करणार्यांवर क्रोध व्यक्त करण्यास सूड घेणारा देवाचा सेवक आहे.
28342  ROM 13:8  तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी, ह्याशिवाय कोणाचे देणेकरी असू नका कारण जो दुसर्यावर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पूर्ण केले आहे.
28343  ROM 13:9  कारण ‘व्यभिचार करू नको, खून करू नको, चोरी करू नको, लोभ धरू नको’ आणि अशी दुसरी कोणतीही आज्ञा असेल तर ‘तू जशी आपल्यावर तशीच आपल्या शेजार्यावर प्रीती कर’ या एका वचनात ती समावलेली आहे.
28344  ROM 13:10  प्रीती आपल्या शेजार्याचे काही वाईट करीत नाही; म्हणून प्रीती ही नियमशास्त्राची परिपूर्ती आहे.
28351  ROM 14:3  जो खातो त्याने न खाणार्यास तुच्छ लेखू नये; आणि जो खात नाही त्याने खाणार्यास दोष लावू नये; कारण देवाने त्याचा स्वीकार केला आहे.
28352  ROM 14:4  दुसर्याच्या नोकराला दोष लावणारा तू कोण आहेस? तो आपल्या धन्यापुढे उभा राहील किंवा पडेल. हो, तो स्थिर केला जाईल; कारण धनी त्यास स्थिर करण्यास समर्थ आहे.
28353  ROM 14:5  आणि कोणी एखादा दिवस दुसर्या दिवसाहून अधिक मानतो; दुसरा कोणी सगळे दिवस सारखे मानतो. प्रत्येक मनुष्याने स्वतःच्या मनात पूर्ण खातरी होऊ द्यावी.
28368  ROM 14:20  अन्नाकरता देवाचे काम तू नष्ट करू नकोस; सर्व गोष्टी खरोखर खाण्यायोग्य आहेत; पण जो मनुष्य दुसर्याला अडखळण करून खातो त्यास ते वाईट आहे.
28373  ROM 15:2  आपल्यामधील प्रत्येक जणाने शेजार्याला जे चांगले असेल त्यामध्ये त्याच्या उभारणीसाठी संतुष्ट करावे.
28374  ROM 15:3  कारण ख्रिस्तानेही स्वतःला संतुष्ट केले नाही, पण ‘तुझी निंदा करणार्यांची सर्व निंदा माझ्यावर आली’ हे नियमशास्त्रात लिहिले आहे तसे होऊ दिले.
28375  ROM 15:4  कारण ज्या गोष्टी पूर्वी लिहिण्यात आल्या त्या आपल्या शिक्षणासाठी लिहिण्यात आल्या; म्हणजे आपण धीराने व शास्त्रलेखाकडून मिळणार्या उत्तेजनाने आशा धरावी.
28391  ROM 15:20  पण दुसर्याच्या पायावर बांधणारा होऊ नये म्हणून ख्रिस्ताचे नाव जेथे घेतले जात नव्हते, अशा ठिकाणी मी सुवार्ता सांगण्यास झटलो.
28409  ROM 16:5  त्याचप्रमाणे, त्यांच्या घरात जमणार्या मंडळीलाही सलाम द्या आणि माझ्या प्रिय अपैनतला सलाम द्या; तो ख्रिस्तासाठी आशियाचे प्रथमफळ आहे.
28416  ROM 16:12  प्रभूमध्ये श्रम करणार्या त्रुफैना व त्रुफोसा ह्यांना सलाम द्या. प्रिय पर्सिस हिला सलाम द्या. प्रभूमध्ये तिने पुष्कळ श्रम केले आहेत.
28418  ROM 16:14  असुंक्रित, फ्लगोन, हरमेस, पत्रबास आणि हरमास ह्यांना व त्यांच्याबरोबर राहणार्या बांधवांना सलाम द्या.
28419  ROM 16:15  फिललोगस, युलिया, निरीयस व त्याची बहीण आणि ओलुंपास ह्यांना सलाम द्या आणि त्यांच्याबरोबर राहणार्या सर्व पवित्र जनांस सलाम द्या.
28611  1CO 9:3  माझी चौकशी करणार्यांना हे माझे प्रत्युत्तर आहे:
28634  1CO 9:26  म्हणून तसा मी धावतो, निरर्थक नाही, मी तसे मुष्टिप्रहार करतो, हवेवर प्रहार करणार्यासारखे नाही.
28635  1CO 9:27  पण मी माझे शरीर दाबाखाली दास्यात ठेवतो; नाही तर, दुसर्यांना घोषणा केल्यावर मी स्वतः, काही कारणाने, कसोटीस न उतरलेला होईन.
28711  1CO 12:9  दुसर्याला त्याच आत्म्याच्या योगे विश्वास, आणखी एकाला त्याच आत्म्याच्या योगे निरोगी करण्याची कृपादाने,
28726  1CO 12:24  कारण आपल्या शोभून दिसणार्या अवयवांना गरज नाही पण ज्या भागांना गरज आहे त्यांना पुष्कळ अधिक मान देऊन देवाने शरीर जुळवले आहे.
28763  1CO 14:17  कारण तू उपकारस्ती चांगली करतोस, खरे हे चांगले आहे तरी त्याने दुसर्याची उन्नती होत नाही.
28765  1CO 14:19  पण मी मंडळीत अन्य भाषेत दहा हजार शब्द बोलण्यापेक्षा, दुसर्यांनाही शिकवावे म्हणून, मी माझ्या बुद्धीने पाच शब्द बोलावे हे मला बरे वाटते.