277 | GEN 11:10 | ही शेमाची वंशावळ: जलप्रलयानंतर दोन वर्षांनी शेम शंभर वर्षांचा झाला होता आणि तो अर्पक्षदाचा पिता झाला. |
294 | GEN 11:27 | तेरहाची वंशावळ ही: तेरहाने अब्राम, नाहोर व हारान यांना जन्म दिला. हारानाने लोटाला जन्म दिला. |
402 | GEN 17:4 | “पाहा, तुझ्यासोबत माझा करार असा आहे: तू अनेक राष्ट्रांचा महान पिता होशील. |
408 | GEN 17:10 | माझा करार जो, तू आणि तुझ्या मागे तुझ्या संतानाने पाळायचा तो हा की: तुमच्यातील प्रत्येक पुरुषांची सुंता व्हावी. |
671 | GEN 25:12 | अब्राहामापासून सारेची दासी हागार हिला झालेल्या इश्माएलाची वंशावळ ही: |
672 | GEN 25:13 | इश्माएलाच्या मुलांची नावे ही होती. इश्माएलाच्या मुलांची नावे त्यांच्या जन्मक्रमाप्रमाणे: इश्माएलाचा प्रथम जन्मलेला मुलगा नबायोथ, केदार, अदबील, मिबसाम, |
996 | GEN 34:15 | पण फक्त या एकाच अटीवर आम्ही तुझ्याशी सहमत होऊ: तुम्हा सर्वांची आमच्याप्रमाणे सुंता झाली पाहिजे, जर तुमच्यातील प्रत्येक पुरुषाची सुंता झाली तरच |
1003 | GEN 34:22 | फक्त एकाच अटीवर ते लोक आपल्यासोबत राहायला आणि आपल्यासोबत एक व्हायला तयार आहेत: ती म्हणजे आपण सगळ्या पुरुषांनी त्या लोकांप्रमाणे सुंता करून घेण्याचे मान्य केले पाहिजे. |
1035 | GEN 35:23 | त्यास लेआपासून झालेले पुत्र: याकोबाचा ज्येष्ठ मुलगा रऊबेन आणि शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार व जबुलून. |
1036 | GEN 35:24 | त्यास राहेलीपासून झालेले पुत्र: योसेफ व बन्यामीन. |
1037 | GEN 35:25 | त्यास राहेलीची दासी बिल्हापासून झालेले पुत्र: दान व नफताली. |
1050 | GEN 36:9 | सेईरच्या डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या अदोमी लोकांचा पूर्वज एसाव याची ही वंशावळ: |
1051 | GEN 36:10 | एसावाच्या मुलांची नावे: एसाव व आदा यांचा मुलगा अलीपाज आणि एसाव व बासमथ यांचा मुलगा रगुवेल. |
1054 | GEN 36:13 | रगुवेलाचे हे पुत्र होते: नहाथ, जेरह, शाम्मा व मिज्जा. ही एसावाची पत्नी बासमथ हिची नातवंडे होती. |
1056 | GEN 36:15 | एसावाचे वंशज आपापल्या कुळांचे सरदार झाले ते हे: एसावाचा पहिला मुलगा अलीपाज, त्याचे पुत्र: तेमान, ओमार, सपो, कनाज, |
1058 | GEN 36:17 | एसावाचा मुलगा रगुवेल याचे पुत्र हे: सरदार नहाथ, सरदार जेरह, सरदार शम्मा, सरदार मिज्जा. हे सर्व सरदार रगुवेलास अदोम देशात झाले. एसावाची पत्नी बासमथ हिची ही नातवंडे होती. |
1059 | GEN 36:18 | एसावाची पत्नी अहलीबामा हिचे पुत्र: यऊश, यालाम व कोरह. हे सरदार एसावाची पत्नी, अनाची मुलगी अहलीबामा हिला झाले. |
1061 | GEN 36:20 | त्या देशात सेईर नावाच्या होरी मनुष्याचे पुत्र हे: लोटान, शोबाल, सिबोन, अना, |
1064 | GEN 36:23 | शोबालाचे पुत्र: अलवान, मानहाथ, एबाल, शपो व ओनाम. |
1065 | GEN 36:24 | सिबोनाचे दोन पुत्र होते: अय्या व अना. आपला बाप सिबोन याची गाढवे राखीत असता ज्याला डोंगरात गरम पाण्याचे झरे सापडले तोच हा अना. |
1067 | GEN 36:26 | दीशोनाचे हे पुत्र होते: हेम्दान, एश्बान, यित्रान व करान. |
1070 | GEN 36:29 | होरी कुळांचे जे सरदार झाले त्यांची नावे अशी: लोटान, शोबाल, सिबोन, अना, |
1072 | GEN 36:31 | इस्राएलावर कोणी राजा राज्य करण्यापूर्वी अदोम देशात जे राजे राज्य करीत होते ते हेच: |
1081 | GEN 36:40 | एसावाच्या वंशातील कुळांप्रमाणे त्या त्या कुळांच्या सरदारांची नावे: तिम्ना, आल्वा, यतेथ, |
1090 | GEN 37:6 | तो त्यांना म्हणाला, “मला पडलेले स्वप्न कृपा करून ऐका: |
1093 | GEN 37:9 | नंतर योसेफाला आणखी एक स्वप्न पडले. तेही त्याने आपल्या भावांना सांगितले. तो म्हणाला, “पाहा, मला आणखी एक स्वप्न पडले: सूर्य, चंद्र व अकरा तारे यांनी मला खाली वाकून नमन केले.” |
1230 | GEN 41:34 | फारोने हे करावे: देशावर देखरेख करणारे नेमावे. त्यांनी येत्या सात वर्षांच्या सुकाळात मिसरातल्या पिकाचा पाचवा हिस्सा गोळा करून घ्यावा. |
1382 | GEN 45:23 | त्याने आपल्या वडिलासाठीही या देणग्या पाठवल्या: धान्य, भाकरी, आणि इतर पदार्थांनी लादलेल्या दहा गाढवी त्याच्या वडिलाच्या प्रवासासाठी पाठवल्या. |
1395 | GEN 46:8 | इस्राएलाचे जे पुत्र त्याच्याबरोबर मिसरला गेले त्याची नावे अशी: याकोबाचा प्रथम जन्मलेला रऊबेन; |
1569 | EXO 2:14 | पण त्या मनुष्याने उत्तर दिले, “तुला आम्हांवर अधिकारी व न्यायाधीश कोणी नेमले? तू काल जसे त्या मिसऱ्यास जिवे मारलेस, तसे मला मारायला पाहतोस का?” तेव्हा मोशे घाबरला. तो विचार करीत स्वत:शीच म्हणाला, “मी काय केले ते आता खचीत सर्वांना माहीत झाले आहे.” |
1587 | EXO 3:7 | परमेश्वर म्हणाला, “मिसरामध्ये माझ्या लोकांचा जाच मी खरोखर पाहिला आहे; आणि मुकादमांच्या त्रासामुळे त्यांनी केलेला आकांत मी ऐकला आहे; त्यांचे दु:ख मी जाणून आहे. |
1640 | EXO 5:7 | तो त्यांना म्हणाला, “तुम्ही लोकांस विटा बनवण्याकरिता आजपर्यंत सतत गवत दिलेले आहे. परंतु आता त्यांना लागणारे गवत त्यांना स्वत: शोधून आणायला सांगा. |
1644 | EXO 5:11 | तेव्हा तुम्हास लागणारे गवत तुम्ही स्वत:च आणले पाहिजे. तुमचे काम काही कमी होणार नाही.” |
1678 | EXO 6:22 | उज्जियेलाचे पुत्र: मिशाएल, एलसाफान व सिथ्री. |
1703 | EXO 7:17 | परमेश्वर म्हणतो, की मी परमेश्वर आहे हे त्यास यावरुन कळेल: मी नदीच्या पाण्यावर माझ्या हातातील काठीने मारीन तेव्हा त्याचे रक्त होईल. |
1828 | EXO 12:11 | ते तुम्ही या प्रकारे खावे: तुमच्या कमरा कसून, पायांत जोडे घालून आणि हातात काठी घेऊन, ते घाईघाईने खावे; हा परमेश्वराचा वल्हांडण सण आहे. |
1847 | EXO 12:30 | रात्रीच्या वेळी फारो, त्याचे सर्व सेवक आणि सगळे मिसराचे लोक जागे झाले आणि मिसर देशात मोठा हाहा:कार उडाला, कारण ज्यात कोणी मरण पावले नाही असे एकही घर राहिले नाही. |
2011 | EXO 18:11 | परमेश्वर सर्व देवांहून श्रेष्ठ आहे हे आता मला कळले. इस्राएल लोकांपेक्षा स्वत:ला श्रेष्ठ मानत असलेल्या मिसरी लोकांचे त्याने काय केले हे मला समजले.” |
2022 | EXO 18:22 | या नायक लोकांनी लोकांचा न्यायनिवाडा करावा; जर अगदी महत्वाची बाब असेल तर तिचा न्यायनिवाडा करण्याकरता तो वाद नायकांनी तुझ्याकडे आणावा, परंतु लहानसहान प्रकरणांसंबंधी त्यांनी स्वत: निर्णय द्यावेत. अशा प्रकारे तुझे काम सोपे होईल तसेच तुझ्या कामात ते वाटेकरी होतील. |
2050 | EXO 19:23 | मोशेने परमेश्वरास सांगितले, “लोक सीनाय पर्वतावर येऊ शकणार नाहीत, कारण तूच स्वत: आम्हांला मर्यादा घालून दिली व सक्त ताकीद दिली व तो अधिक पवित्र करण्यास सांगितले.” |
2079 | EXO 21:1 | आता जे इतर नियम तू इस्राएल लोकांस लावून द्यावेत ते हेच: |
2199 | EXO 25:3 | त्यांच्याकडून तू माझ्याकरिता घ्यावयाच्या वस्तूंच्या अर्पणाची यादी अशी: सोने, चांदी, पितळ; |
2338 | EXO 29:1 | त्यांनी याजक या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्यांना पवित्र करण्यासाठी तू काय करावेस ते मी तुला सांगतो: एक गोऱ्हा व दोन निर्दोष मेंढे घ्यावेत; |
2375 | EXO 29:38 | वेदीवर होम करायचा तो असा: प्रतिदिनी एकएक वर्षाच्या दोन कोकरांचा नेहमी होम करावा. |
2395 | EXO 30:12 | “तू इस्राएल लोकांची शिरगणती करशील तेव्हा गणनेवेळी आपणावर काही मरी येऊ नये म्हणून त्यांतल्या प्रत्येक इस्राएलाने स्वत:च्या जिवाबद्दल परमेश्वरास खंड द्यावा; |
2455 | EXO 32:16 | देवाने स्वत:च त्या पाट्या तयार केल्या होत्या व त्यांच्यावर कोरलेला लेख देवाने लिहिलेला होता. |
2478 | EXO 33:4 | ही वाईट बातमी ऐकल्यावर लोक फार दु:खी झाले आणि त्यानंतर कोणीही आपल्या अंगावर दागदागिने घातले नाहीत; |
2488 | EXO 33:14 | परमेश्वराने उत्तर दिले, “मी स्वत: तुझ्याबरोबर येईन व तुला विसावा देईन.” |
2503 | EXO 34:6 | परमेश्वर त्याच्यापुढून अशी घोषणा करीत गेला: “परमेश्वर, परमेश्वर, दयाळू, कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर, |
2704 | EXO 39:39 | पितळेची वेदी व तिची पितळेची जाळी, वेदी वाहून नेण्याचे दांडे व तिची सर्व पात्रे, गंगाळ व त्याची बैठक: |
2798 | LEV 4:2 | इस्राएल लोकांस असे सांग: जर कोणी परमेश्वराने निषिद्ध केलेल्या कृत्यापैकी एखादे कृत्य केले किंवा चुकून त्याच्या हातून पाप घडले तर त्याने पुढील गोष्टी कराव्यात: |
2864 | LEV 6:7 | हा अन्नार्पणाचा नियम आहे: अहरोनाच्या मुलांनी ते परमेश्वरासमोर वेदीपुढे आणावे; |
2870 | LEV 6:13 | “अहरोनाच्या अभिषेकाच्या दिवशी अहरोन व त्याच्या मुलांनी परमेश्वरास अर्पण आणावयाचे ते हे: एक दशांश एफा मैदा नित्याचे अन्नार्पण म्हणून द्यावे व त्यापैकी अर्धे सकाळी व अर्धे संध्याकाळी अर्पावे. |
2881 | LEV 7:1 | दोषार्पणाविषयीचा विधी असा आहे: हे अर्पण परमपवित्र आहे. |
2891 | LEV 7:11 | परमेश्वरासाठी कोणाला शांत्यर्पणाचा यज्ञ करावयाचा असेल तर त्याचा विधी असा: |
2898 | LEV 7:18 | जर कोणी शांत्यर्पणाच्या यज्ञबलीच्या मांसातून तिसऱ्या दिवशी मांस खाईल तर परमेश्वरास ते आवडणार नाही, व तो ते अर्पण मान्य करणार नाही; ते अर्पण अमंगळ होईल; त्या पापाबद्दल भोगाव्या लागणाऱ्या शिक्षेस तो स्वत: जबाबदार राहील. |
2903 | LEV 7:23 | सर्व इस्राएल लोकांस असे सांग: तुम्ही बैलाची मेंढराची किंवा बकऱ्याची चरबी खाऊ नये. |
2909 | LEV 7:29 | “इस्राएल लोकांस असे सांग: जर कोणी परमेश्वरासमोर आपल्या शांत्यर्पणाचा यज्ञबली अर्पील तर त्याने त्या अर्पणातून काही भाग परमेश्वराकडे आणावा. |
2941 | LEV 8:23 | मोशेने त्याचा वध केला व त्याचे थोडे रक्त घेऊन अहरोनाच्या उजव्या कानाच्या पाळीला: उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्याला लावले. |
2961 | LEV 9:7 | मग मोशेने अहरोनाला सांगितले, “जा व परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे सर्वकाही कर; वेदीजवळ जाऊन आपला पापबली व होमबली ह्यांचे अर्पण कर आणि स्वत:साठी व लोकांसाठी प्रायश्चित कर आणि लोकांकडील बलीही अर्पण करून त्यांच्यासाठी प्रायश्चित कर.” |
2962 | LEV 9:8 | तेव्हा अहरोन वेदीजळ गेला व त्याने स्वत:साठी पापार्पणाचा गोऱ्हा वधला. |
2984 | LEV 10:6 | मोशेने अहरोन व त्याचे पुत्र एलाजार व इथामार यांना सांगितले, “तुम्ही तुमचे केस मोकळे सोडू नका तर ते विंचरा, आणि तुमची वस्त्रे फाडू नका! तुमचे दु:ख दाखवू नका! म्हणजे मग तुम्ही मारले जाणार नाही आणि परमेश्वराचा राग सर्व मंडळीवर भडकणार नाही; सर्व इस्राएल घराणे तुमचे बांधव आहेत; नादाब व अबीहू ह्याना परमेश्वराने अग्नीने भस्म केल्याबद्दल त्यांनी शोक करावा; |
2999 | LEV 11:1 | परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला: |
3000 | LEV 11:2 | इस्राएल लोकांस असे सांगा की पृथ्वीवरील ज्या प्राण्यांचे मांस तुम्ही खावे ते हे: |
3027 | LEV 11:29 | जमिनीवर रांगणाऱ्या प्राण्यांपैकी तुम्ही अशुद्ध समजावे ते हे: मुंगूस, उंदीर, निरनिराळ्या जातीचे सरडे, |
3041 | LEV 11:43 | कोणत्याही जातीच्या रांगणाऱ्या प्राण्यामुळे तुम्ही स्वत:ला अशुद्ध करून घेऊ नका, किंवा त्यांच्यामुळे स्वत:ला अशुद्ध करून विटाळवू नका! |
3060 | LEV 13:7 | परंतु त्या मनुष्याने स्वत:ला शुद्ध ठरवण्यासाठी याजकाला दाखविल्यानंतर त्याच्या कातडीवरील ते खवंद पसरत गेले असेल तर मग त्याने पुन्हा याजकापुढे हजर व्हावे. |
3114 | LEV 14:2 | महारोग बरा झालेल्या लोकांस शुद्ध करून घेण्याविषयीचे नियम असे: याजकाने महारोग्याला तपासावे. |
3204 | LEV 16:2 | परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा भाऊ अहरोन ह्याच्याशी बोल व त्यास सांग की: त्याने वाटेल त्यावेळी परमपवित्रस्थानात अंतरपटाच्या आत पवित्र कोशावर असलेल्या दयासनापुढे जाऊ नये; अहरोन जर तेथे जाईल तर तो मरेल, कारण तेथे दयासनावरील ढगात मी दर्शन देत असतो. |
3208 | LEV 16:6 | अहरोनाने आपल्यासाठी पापार्पणाचा गोऱ्हा अर्पण करून स्वत:साठी व आपल्या घराण्यासाठी प्रायश्चित करावे. |
3213 | LEV 16:11 | अहरोनाने आपल्यासाठी पापार्पणाच्या गोऱ्ह्याचे अर्पण करून स्वत:साठी व स्वत:च्या घराण्यासाठी प्रायश्चित करावे. म्हणजे त्याने स्वत:साठी गोऱ्हा पापार्पण म्हणून वधावा. |
3219 | LEV 16:17 | अहरोन प्रायश्चित करण्यासाठी परमपवित्रस्थानात प्रवेशकरण्यासाठी जाईल तेव्हा, तो स्वतःसाठी व स्वत:च्या घराण्यासाठी आणि इस्राएल लोकांसाठी प्रायश्चित करून बाहेर येईपर्यंत दर्शनमंडपामध्ये कोणीही नसावे व कोणीही तेथे जाऊ नये. |
3226 | LEV 16:24 | मग त्याने एखाद्या पवित्र ठिकाणी पाण्याने आंघोळ करावी, आपली वस्त्रे घालावी व तेथून बाहेर येऊन स्वत:साठी होमार्पण करावे तसेच लोकांसाठीही होमार्पण करावे आणि स्वत:साठी व लोकांसाठी प्रायश्चित करावे. |
3238 | LEV 17:2 | “अहरोन त्याचे पुत्र आणि सर्व इस्राएल लोक ह्यांना सांग की परमेश्वराने जी आज्ञा दिली आहे ती ही: |
3258 | LEV 18:6 | तुम्ही कोणीही आपल्याजवळच्या नातलगाशी शरीरसबंध ठेऊ नये! मी परमेश्वर आहे: |
3276 | LEV 18:24 | अशाप्रकारे स्वत:ला अशुद्ध करून घेऊ नका; कारण जी राष्ट्रे मी तुमच्यासमोरुन बाहेर घालवून देणार आहे, तेथील लोकही अशाच कृत्यांनी अशुद्ध झाले. |
3300 | LEV 19:18 | लोकांनी तुमचे वाईट केलेले विसरून जावे, त्याबद्दल सूड घेण्याचा प्रयत्न करु नका तर आपल्या शेजाऱ्यावर स्वत: सारखी प्रीती करा. मी परमेश्वर आहे! |
3316 | LEV 19:34 | तुमच्याबरोबर राहणाऱ्या परदेशीय मनुष्यास स्वदेशीय मनुष्यासारखेच माना; आणि त्याच्यावर स्वत: सारखीच प्रीती करा; कारण तुम्हीही एकेकाळी मिसरदेशात परदेशीय होता. मी तुमचा देव परमेश्वर आहे! |
3347 | LEV 21:1 | परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोनाचे पुत्र, जे याजक त्यांना असे सांग की, आपल्या लोकांमधील मरण पावलेल्या मनुष्यास स्पर्श करून याजकाने स्वत:ला अशुद्ध करून घेऊ नये. |
3350 | LEV 21:4 | याजक आपल्या लोकांचा प्रमुख असल्यामुळे त्याने सामान्य मनुष्याप्रमाणे लग्न करून स्वत:ला अपवित्र करून घेऊ नये. |
3364 | LEV 21:18 | शारीरिक व्यंग असलेल्या कोणत्याही मनुष्याने मला अर्पण आणू नये; याजक या नात्याने माझी सेवा करण्यास पात्र नसलेली माणसे अशी:आंधळा, लंगडा, चेहऱ्यावर विद्रूप वण असलेला, हातपाय प्रमाणाबाहेर लांब असलेला, |
3381 | LEV 22:11 | परंतु याजकाने स्वत:चे पैसे देऊन एखादा गुलाम विकत घेतला असेल तर त्या गुलामाने व याजकाच्या घरात जन्मलेल्या त्याच्या मुलाबाळांनी त्या पवित्र अन्नातून खावे. |
3386 | LEV 22:16 | जर याजकांनी त्यांना पवित्र अर्पणे खाण्याची परवानगी दिली तर ते स्वत:वर अपराध ओढवून घेतील. आणि त्या अपराधाबद्दल त्यांना पैसे भरावे लागतील. मी परमेश्वर त्यांना पवित्र करणारा आहे! |
3413 | LEV 23:10 | “इस्राएल लोकांस सांग: मी तुम्हास देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोहोचाल व हंगामाच्या वेळी कापणी कराल त्यावेळी पिकाच्या पहिल्या उपजातील पेंढी तुम्ही याजकाकडे आणावी; |
3427 | LEV 23:24 | “इस्राएल लोकांस सांग: सातव्या महिन्याचा पहिला दिवस हा विसाव्याचा पवित्र दिवस असावा; त्यादिवशी पवित्र मेळा भरवावा व पवित्र स्मरणासाठी तुम्ही कर्णे फुंकावी; |
3437 | LEV 23:34 | “इस्राएल लोकांस सांग: सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवसापासून पुढे सात दिवसपर्यंत परमेश्वराकरिता मंडपाचा सण पाळावा; |
3440 | LEV 23:37 | परमेश्वराने हे सण नेमलेले आहेत: त्यादिवशी पवित्र मेळे भरवावेत; त्यामध्ये योग्य वेळी हव्य म्हणजे होमार्पण, अन्नार्पण, शांत्यर्पण व पेयार्पण परमेश्वरास अर्पावे. |
3472 | LEV 25:2 | इस्राएल लोकांस असे सांग: मी तुम्हास देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोहोचाल त्यावेळी देशाने परमेश्वरासाठी पवित्र शब्बाथ म्हणजे पवित्र विसाव्याची वेळ पाळावी. |
3496 | LEV 25:26 | आपल्या वतनाचा भाग सोडवून घ्यावयास एखाद्या मनुष्यास आपला जवळचा नातलग नसेल परंतु तो भाग सोडवून घ्यावयास त्याची स्वत:ची ऐपत वाढली असेल. |
3505 | LEV 25:35 | तुझा एखादा भाऊबंद, त्याचे स्वत:चे पोट देखील भरता येऊ नये, इतका कंगाल झाला तर तू त्यास परक्या किंवा उपऱ्याप्रमाणे तुझ्याजवळ राहू द्यावे; |
3509 | LEV 25:39 | तुझा एखादा भाऊबंद तुझ्यासमोर इतका कंगाल झाला की त्याने स्वत:ला तुला दास म्हणून विकले तर त्यास गुलामाप्रमाणे राबवून घेऊ नको; |
3517 | LEV 25:47 | तुझा एखादा परदेशीय किंवा उपरी शेजारी धनवान झाला व त्याच्यापाशी असलेला तुझा एखादा बंधू कंगाल होऊन त्याने स्वत:स तुम्हामध्ये राहत असणाऱ्या त्या परदेशीयाला किंवा परदेशीयाच्या कुटुंबातील एखाद्याला गुलाम म्हणून विकले असेल; |
3518 | LEV 25:48 | तर त्यांची विक्री झाल्यावरही त्यास स्वत:ला सोडवून घेण्याचा हक्क राहील; त्याच्या भाऊबंदापैकी कोणासही त्यास सोडवता येईल. |
3519 | LEV 25:49 | किंवा त्याचा चुलता, चुलत भाऊ अथवा त्याच्या कुळापैकी कोणी जवळचा नातलग ह्यांना त्यास सोडवता येईल किंवा तो स्वत:च धनवान झाला तर त्यास स्वत: पैसे भरुन स्वत:ची सुटका करून घेता येईल. |
3573 | LEV 27:2 | इस्राएल लोकांस सांग: एखाद्या मनुष्याने परमेश्वरास मानवाचा विशेष नवस केला तर त्या मनुष्याचे मोल याजकाने याप्रमाणे ठरवावे. |
3593 | LEV 27:22 | स्वत:च्या कुळाचे नसलेले म्हणजे एखाद्याने स्वत: खरेदी केलेले शेत त्यास परमेश्वराकरिता अर्पण करावयाचे असेल, |
3712 | NUM 3:19 | कहाथाचे पुत्र त्यांच्या कुळाप्रमाणे हे: अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जियेल. |
3713 | NUM 3:20 | मरारीचे पुत्र त्यांच्या कुळाप्रमाणे हे: महली व मूशी. ही लेवी कुळातील घराणी होत. |
3793 | NUM 4:49 | तेव्हा परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याची गणती करण्यात आली; प्रत्येक मनुष्यास त्याने स्वत: करावयाचे काम नेमून देण्यात आले व त्याने काय वाहून न्यावयाचे ते सांगण्यात आले. हे सर्व परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे करण्यात आले. |
3806 | NUM 5:13 | म्हणजे तिने दुसऱ्या मनुष्याशी कुकर्म केले व ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्यापासून लपवून ठेवली तर कोणी साक्षीदार नसल्यामुळे हे कुकर्म तिच्या नवऱ्याला कधीच कळणार नाही; ती स्वत: तर आपल्या नवऱ्याला ही गोष्ट सांगणारच नाही; |