Wildebeest analysis examples for:   mar-mar   “    February 25, 2023 at 00:40    Script wb_pprint_html.py   by Ulf Hermjakob

3  GEN 1:3  देव बोलला, प्रकाश होवो” आणि प्रकाश झाला.
5  GEN 1:5  देवाने प्रकाशाला दिवस” व अंधकाराला रात्र” असे नाव दिले. संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा पहिला दिवस.
6  GEN 1:6  देव बोलला, जलांच्या मध्यभागी अंतराळ होवो व ते जलापासून जलांची विभागणी करो.”
9  GEN 1:9  नंतर देव बोलला, आकाशाखालील पाणी एकाजागी एकत्र जमा होवो व कोरडी जमीन दिसून येवो,” आणि तसे झाले.
11  GEN 1:11  देव बोलला, हिरवळ, बीज देणाऱ्या वनस्पती, आणि आपआपल्या जातीप्रमाणे, ज्यात त्याचे बीज आहे अशी फळे देणारी फळझाडे, ही पृथ्वीवर येवोत.” आणि तसेच झाले.
14  GEN 1:14  मग देव बोलला, दिवस व रात्र ही वेगळी करण्यासाठी आकाशात ज्योति होवोत व त्या चिन्हे, ऋतू, दिवस, आणि वर्षे दाखविणाऱ्या होवोत.
20  GEN 1:20  देव बोलला, जले जीवजंतूनी भरून जावोत, आणि पृथ्वीच्या वर आकाशाच्या अंतराळात पक्षी उडोत.”
22  GEN 1:22  देवाने त्यांना आशीर्वाद देऊन म्हटले, फलद्रूप व्हा आणि बहुगुणित व्हा, समुद्रातील पाणी व्यापून टाका. पृथ्वीवर पक्षी बहुगुणित होवोत.”
24  GEN 1:24  देव बोलला, आपापल्या जातीचे सजीव प्राणी, गुरेढोरे, सरपटणारे प्राणी व वनपशू पृथ्वी उपजवो.” आणि तसे झाले.
26  GEN 1:26  देव बोलला, आपण आपल्या प्रतिरूपाचा आपल्या सारखा मनुष्य निर्माण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, सर्व वनपशू, मोठी जनावरे व जमिनीवर सरपटणारे सर्व लहान प्राणी यांच्यावर त्यांना सत्ता चालवू देऊ.”
28  GEN 1:28  देवाने त्यांना आशीर्वाद दिला, आणि त्यांना म्हटले, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. ती आपल्या सत्तेखाली आणा; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवर फिरणारा प्रत्येक सजीव प्राणी यांवर सत्ता चालवा.”
47  GEN 2:16  परमेश्वर देवाने मनुष्यास आज्ञा दिली; तो म्हणाला, बागेतील कोणत्याही झाडाचे फळ तू खुशाल खात जा;
49  GEN 2:18  नंतर परमेश्वर देव बोलला, मनुष्याने एकटे असावे हे बरे नाही; मी त्याच्यासाठी सुसंगत मदतनीस निर्माण करीन.”
54  GEN 2:23  तेव्हा मनुष्य म्हणाला, आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व माझ्या मांसातले मांस आहे; मी तिला स्त्री म्हणजे नारी असे नाव देतो, कारण ती नरापासून बनवलेली आहे.”
57  GEN 3:1  परमेश्वर देवाने निर्माण केलेल्या सर्व वनपशूंमध्ये सर्प हा अतिशय धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, ‘बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नका’ असे देवाने तुम्हास खरोखरच सांगितले आहे काय?”
58  GEN 3:2  स्त्रीने सर्पाला उत्तर दिले, बागेतल्या झाडांची फळे आम्ही खाऊ शकतो.
60  GEN 3:4  सर्प त्या स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही.
65  GEN 3:9  तेव्हा परमेश्वर देवाने मनुष्यास हाक मारुन म्हटले, तू कोठे आहेस?”
66  GEN 3:10  मनुष्य म्हणाला, बागेत मी तुझा आवाज ऐकला व मला भीती वाटली, कारण मी नग्न होतो. म्हणून मी लपलो.”
67  GEN 3:11  परमेश्वर त्यास म्हणाला, तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा दिली होती त्या झाडाचे फळ तू खाल्लेस काय?”
68  GEN 3:12  मनुष्य म्हणाला, तू ही स्त्री माझ्या सोबतीस म्हणून दिलीस, तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि म्हणून मी ते खाल्ले.”
69  GEN 3:13  मग परमेश्वर देव त्या स्त्रीस म्हणाला, तू हे काय केलेस?” ती स्त्री म्हणाली, सर्पाने मला फसवले व म्हणून मी ते फळ खाल्ले.”
70  GEN 3:14  परमेश्वर देव सर्पास म्हणाला, तू हे केल्यामुळे सर्व गुरेढोरांमध्ये व सर्व वन्यपशूंमध्ये तू शापित आहेस. तू पोटाने सरपटत चालशील आणि आयुष्यभर तू माती खाशील.
72  GEN 3:16  परमेश्वर देव स्त्रीस म्हणाला, मुलांना जन्म देते वेळी तुझ्या वेदना मी खूप वाढवीन तरी तुझी ओढ तुझ्या नवऱ्याकडे राहील; आणि तो तुझ्यावर अधिकार चालवील.”
78  GEN 3:22  परमेश्वर देव म्हणाला, पाहा, मनुष्य आपल्यातल्या एका सारखा होऊन त्यास बरे व वाईट समजू लागले आहे. तर आता त्यास त्याच्या हातांनी जीवनाच्या झाडावरून ते फळ घेऊन खाऊ देऊ नये, आणि जर का तो ते फळ खाईल तर मग सदासर्वकाळ तो जिवंत राहील.”
86  GEN 4:6  परमेश्वर काइनाला म्हणाला, तू का रागावलास? तुझा चेहरा का उतरला आहे?
89  GEN 4:9  परमेश्वर काइनास म्हणाला, तुझा भाऊ हाबेल कोठे आहे?” काइनाने उत्तर दिले, मला माहीत नाही; मी माझ्या भावाचा राखणदार आहे काय?”
90  GEN 4:10  देव म्हणाला, तू हे काय केलेस? तुझ्या भावाच्या रक्ताची वाणी जमिनीतून शिक्षेसाठी ओरड करत आहे.
93  GEN 4:13  काइन परमेश्वरास म्हणाला, माझी शिक्षा मी सहन करण्यापलीकडे, इतकी मोठी ती आहे.
95  GEN 4:15  परमेश्वर त्यास म्हणाला, जर कोणी काइनाला ठार मारील तर त्याचा सातपट सूड घेण्यात येईल.” त्यानंतर, तो कोणाला सापडला तर त्यास कोणी जिवे मारू नये म्हणून, परमेश्वराने काइनावर एक खूण करून ठेवली.
105  GEN 4:25  आदामाने पुन्हा पत्नीस जाणिले आणि तिला पुत्र झाला. त्यांनी त्याचे नाव शेथ असे ठेवले. हव्वा म्हणाली, देवाने हाबेलाच्या ठिकाणी मला दुसरे संतान दिले आहे, कारण काइनाने त्यास जिवे मारले.”
141  GEN 6:3  परमेश्वर म्हणाला, माझा आत्मा मानवामध्ये सर्वकाळ राहणार नाही, कारण ते देह आहेत. ते एकशें वीस वर्षे जगतील.”
145  GEN 6:7  म्हणून परमेश्वर म्हणाला, मी उत्पन्न केलेल्या मानवास पृथ्वीतलावरून नष्ट करीन; तसेच मनुष्य, पशू, सरपटणारे प्राणी, व आकाशातील पक्षी या सर्वांचा मी नाश करीन, कारण या सर्वांना उत्पन्न केल्याचे मला दुःख होत आहे.”
151  GEN 6:13  म्हणून देव नोहाला म्हणाला, मी पाहतो की, सर्व प्राण्यांचा नाश करण्याची वेळ आता आली आहे; कारण त्यांच्यामुळे पृथ्वी अनर्थ हिंसाचाराने भरली आहे. खरोखरच मी पृथ्वीसह त्यांचा नायनाट करीन.”
153  GEN 6:15  देव म्हणाला, तारवाचे मोजमाप मी सांगतो त्याप्रमाणे असावे. ते तीनशे हात लांब, पन्नास हात रुंद, आणि तीस हात उंच असावे.
161  GEN 7:1  नंतर परमेश्वर नोहाला म्हणाला, चल, तू आणि तुझ्या कुटुंबातील सर्वांनी तारवात यावे, कारण या पिढीमध्ये तूच मला नीतिमान दिसला आहेस.
200  GEN 8:16  तू, तुझी पत्नी, तुझी मुले व तुझ्या मुलांच्या स्त्रिया यांना तुझ्याबरोबर घेऊन तारवाच्या बाहेर ये.
205  GEN 8:21  परमेश्वराने तो सुखकारक सुगंध घेतला आणि आपल्या मनात म्हटले, मानवामुळे मी पुन्हा भूमीला शाप देणार नाही; मानवाच्या मनातील योजना बालपणापासूनच वाईट आहेत. मी आता केले आहे त्याप्रमाणे मी पुन्हा कधीही सर्व जिवांचा नाश करणार नाही.
207  GEN 9:1  नंतर देवाने नोहाला व त्याच्या मुलांना आशीर्वाद दिला आणि म्हटले, फलदायी व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी भरून टाका.
215  GEN 9:9  माझे ऐका! मी तुमच्याशी व तुमच्या नंतर तुमच्या वंशजाशी एक करार स्थापन करतो,
218  GEN 9:12  देव म्हणाला, मी माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये, व तुमच्याबरोबर जे सर्व जिवंत जीव आहेत त्यांच्यामध्ये भावी पिढ्यानपिढ्यासाठी हा करार केल्याची निशाणी हीच आहे.
223  GEN 9:17  नंतर देव नोहाला म्हणाला, हे मेघधनुष्य माझ्यामध्ये व पृथ्वीवरील सर्व देहांमध्ये स्थापित केलेल्या कराराची निशाणी आहे.”
231  GEN 9:25  तेव्हा नोहा म्हणाला, कनान शापित होवो, तो आपल्या भावाच्या गुलामातील सर्वांत खालचा गुलाम होवो.”
232  GEN 9:26  तो म्हणाला, शेमाचा देव परमेश्वर धन्यवादित असो. कनान त्याचा सेवक होवो.
244  GEN 10:9  तो परमेश्वरापुढे पराक्रमी शिकारी मनुष्य बनला. त्यामुळे निम्रोदासारखा परमेश्वरापुढे पराक्रमी शिकारी” अशी म्हण पडली आहे.
270  GEN 11:3  ते एकमेकांना म्हणाले, चला, आपण विटा करू व त्या पक्क्या भाजू.” त्यांच्याकडे बांधकामासाठी दगडाऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर होते.
271  GEN 11:4  मग लोक म्हणाले, चला, आपण आपल्यासाठी नगर बांधू आणि ज्याचे शिखर आकाशापर्यंत पोहचेल असा उंच बुरूज बांधू, आणि आपण आपले नाव होईल असे करू या. आपण जर असे केले नाही, तर पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होईल.”
273  GEN 11:6  परमेश्वर देव म्हणाला, पाहा, हे सर्व लोक एक असून, एकच भाषा बोलतात आणि ही तर त्यांची सुरुवात आहे! लवकरच, जे काही करण्याचा त्यांचा हेतू आहे ते करणे त्यांना मुळीच अशक्य होणार नाही.
300  GEN 12:1  आता परमेश्वर अब्रामाला म्हणाला, तू आपला देश, आपले नातलग आणि बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा.
306  GEN 12:7  परमेश्वर अब्रामाला दर्शन देऊन म्हणाला, हा देश मी तुझ्या वंशजांना देईन.” ज्या जागेवर परमेश्वराने अब्रामाला दर्शन दिले त्या जागी त्याने परमेश्वरासाठी वेदी बांधली.
310  GEN 12:11  मिसर देशात प्रवेश करण्यापूर्वी अब्राम आपली पत्नी साराय हिला म्हणाला, पाहा मला माहीत आहे की, तू अतिशय सुंदर स्त्री आहेस.
317  GEN 12:18  तेव्हा फारोने अब्रामास बोलावले. तो म्हणाला, तू हे माझ्याबाबत का केलेस? साराय तुझी पत्नी आहे हे तू मला का सांगितले नाहीस?
327  GEN 13:8  तेव्हा अब्राम लोटाला म्हणाला, तुझ्यामध्ये व माझ्यामध्ये, तसेच तुझे गुराखी व माझे गुराखी यांच्यामध्ये भांडण नसावे. शेवटी आपण एक कुटुंब आहोत.
333  GEN 13:14  लोट अब्राहापासून वेगळा झाल्यावर परमेश्वर अब्रामाला म्हणाला, तू जेथे उभा आहेस त्या ठिकाणापासून उत्तरेकडे व दक्षिणेकडे, पूर्वेकडे व पश्चिमेकडे पाहा.
356  GEN 14:19  त्याने अब्रामाला आशीर्वाद देऊन म्हटले, अब्रामा, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्नकर्ता परात्पर देव तुला आशीर्वाद देवो.
358  GEN 14:21  सदोमाचा राजा अब्रामास म्हणाला, मला फक्त माझे लोक द्या आणि तुमच्यासाठी वस्तू घ्या.”
359  GEN 14:22  अब्राम सदोमाच्या राजाला म्हणाला, आकाश व पृथ्वीचा उत्पन्नकर्ता परमेश्वर परात्पर देव याच्यासमोर आपला हात उंचावून मी वचन देतो की,
362  GEN 15:1  या गोष्टी घडल्यानंतर अब्रामाला दृष्टांतात परमेश्वराचे वचन आले. तो म्हणाला, अब्रामा, भिऊ नको. मी तुझे संरक्षण करीन आणि तुला फार मोठे प्रतिफळ देईन.”
363  GEN 15:2  अब्राम म्हणाला, हे प्रभू परमेश्वरा, मी अजून निपुत्रिक आहे, आणि माझ्या घराचा वारस दिमिष्क शहरातील अलिएजर हाच होईल, तेव्हा तू मला काय देणार?”
364  GEN 15:3  अब्राम म्हणाला, तू मला संतान दिले नाहीस म्हणून माझ्या घराचा कारभारीच माझा वारस आहे.”
365  GEN 15:4  नंतर, पाहा, परमेश्वराचे वचन अब्रामाकडे आले. तो म्हणाला, हा मनुष्य तुझा वारस होणार नाही, तर तुझ्या पोटी येईल तोच तुझा वारस होईल.”
366  GEN 15:5  मग त्याने त्यास बाहेर आणले, आणि म्हटले, या आकाशाकडे पाहा, तुला तारे मोजता येतील तर मोज.” तो त्यास म्हणाला, असे तुझे संतान होईल.”
368  GEN 15:7  परमेश्वर त्यास म्हणाला, हा देश तुला वतन करून देण्याकरता खास्द्यांच्या ऊर देशातून तुला आणणारा मीच परमेश्वर आहे.”
369  GEN 15:8  तो त्यास म्हणाला, हे प्रभू परमेश्वरा मला हे वतन मिळेल हे मी कशावरून समजू?”
370  GEN 15:9  तो त्यास म्हणाला, माझ्यासाठी तीन वर्षांची एक कालवड, तीन वर्षांची एक शेळी, तीन वर्षांचा एक एडका तसेच एक होला व एक पारव्याचे पिल्लू आण.”
374  GEN 15:13  मग परमेश्वर अब्रामाला म्हणाला, तुला या गोष्टी समजल्या पाहिजेत; तुझे वंशज जो देश त्यांचा नाही त्या अनोळखी देशात राहतील आणि ते तेथे गुलाम होतील आणि चारशे वर्षे त्यांचा छळ होईल.
379  GEN 15:18  त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाशी करार केला. तो म्हणाला, मिसर देशाच्या नदीपासून फरात महानदीपर्यंतचा
384  GEN 16:2  साराय अब्रामाला म्हणाली, परमेश्वराने मला मुले होण्यापासून वंचित ठेवले आहे. तेव्हा तुम्ही माझ्या दासीपाशी जा. कदाचित तिच्यापासून मला मुले मिळतील.” अब्रामाने आपली पत्नी साराय हिचे म्हणणे मान्य केले.
387  GEN 16:5  नंतर साराय अब्रामाला म्हणाली, माझ्यावरचा अन्याय तुमच्यावर असो. मी आपली दासी तुम्हास दिली, आणि आपण गरोदर आहो हे लक्षात आल्यावर, मी तिच्या दृष्टीने तुच्छ झाले. परमेश्वर तुमच्यामध्ये व माझ्यामध्ये न्याय करो.”
388  GEN 16:6  परंतु अब्राम सारायला म्हणाला, तू हागारेची मालकीण आहेस, तुला काय पाहिजे तसे तू तिचे कर.” तेव्हा साराय तिच्याबरोबर निष्ठुरपणे वागू लागली म्हणून हागार तिला सोडून पळून गेली.
390  GEN 16:8  देवदूत तिला म्हणाला, सारायचे दासी हागारे, तू येथे का आलीस? तू कोठे जात आहेस?” हागार म्हणाली, माझी मालकीण साराय हिच्यापासून मी पळून जात आहे.”
391  GEN 16:9  परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, तू आपल्या मालकिणीकडे परत जा आणि तिच्या अधिकारात तिच्या अधीनतेत राहा.”
392  GEN 16:10  परमेश्वराचा दूत तिला आणखी म्हणाला, तुझी संतती मी इतकी बहुगुणित करीन, की ती मोजणे शक्य होणार नाही.”
393  GEN 16:11  परमेश्वराचा दूत तिला असे सुद्धा म्हणाला, तू आता गरोदर आहेस आणि तुला मुलगा होईल त्याचे नाव तू इश्माएल म्हणजे परमेश्वर ऐकतो असे ठेव, कारण प्रभूने तुझ्या दुःखाविषयी ऐकले आहे.
395  GEN 16:13  नंतर तिच्याशी बोलणारा जो परमेश्वर त्याचे नाव, तू पाहणारा देव आहेस,” असे तिने ठेवले, कारण ती म्हणाली, जो मला पाहतो त्यास मी येथेही मागून पाहिले काय?”
399  GEN 17:1  अब्राम नव्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा परमेश्वराने त्यास दर्शन दिले व त्यास म्हटले, मी सर्वशक्तिमान देव आहे. माझ्या समक्षतेत चाल, आणि सात्त्विकतेने राहा.
402  GEN 17:4  पाहा, तुझ्यासोबत माझा करार असा आहे: तू अनेक राष्ट्रांचा महान पिता होशील.
407  GEN 17:9  नंतर देव अब्राहामाला पुढे म्हणाला, आता या करारातील तुझा भाग हा असा, तू माझा करार पाळावा, तू आणि तुझ्या मागे तुझ्या वंशजांनी पिढ्यानपिढ्या पाळावयाचा माझा करार पाळावा.
413  GEN 17:15  देव अब्राहामाला म्हणाला, तुझी पत्नी साराय, हिला येथून पुढे साराय असे संबोधू नको. त्या ऐवजी तिचे नाव सारा असे होईल.
415  GEN 17:17  अब्राहामाने देवाला लवून नमन केले आणि तो हसला, तो मनात म्हणाला, शंभर वर्षांच्या मनुष्यास मुलगा होणे शक्य आहे का? आणि सारा, जी नव्वद वर्षांची आहे, तिला मुलगा होऊ शकेल का?”
416  GEN 17:18  अब्राहाम देवाला म्हणाला, इश्माएल तुझ्या समोर जगावा तेवढे पुरे!”
417  GEN 17:19  देव म्हणाला, नाही! परंतु तुझी पत्नी सारा हिलाच मुलगा होईल, आणि त्याचे नाव तू इसहाक असे ठेव. मी त्याच्याशी निरंतरचा करार करीन; तो करार त्याच्यानंतर त्याच्या वंशजांसोबत निरंतर असेल.
428  GEN 18:3  तो म्हणाला, प्रभू, जर माझ्यावर तुमची कृपादृष्टी असेल तर तुझ्या सेवकाला सोडून पुढे जाऊ नका.
430  GEN 18:5  मी तुमच्यासाठी थोडे अन्न आणतो, जेणेकरून तुम्हास ताजेतवाने वाटेल. मग तुम्ही तुमच्या मार्गाने जा, यासाठीच तुमच्या या सेवकाकडे तुमचे येणे झाले असावे.” आणि ते म्हणाले, तू म्हणतोस तसे कर.”
431  GEN 18:6  अब्राहाम पटकन तंबूत सारेकडे गेला आणि म्हणाला, लवकर तीन मापे सपीठ घेऊन ते मळ आणि भाकरी कर.”
434  GEN 18:9  ते त्यास म्हणाले, तुझी पत्नी सारा कोठे आहे?” त्याने उत्तर दिले, तेथे ती तंबूत आहे.”
435  GEN 18:10  त्यांच्यातील एक म्हणाला, मी वसंतऋतूच्या वेळी तुझ्याकडे नक्की परत येईन, आणि पाहा तेव्हा तुझी पत्नी सारा हिला मुलगा होईल.” तेव्हा त्याच्यामागे असलेल्या तंबूच्या दारामागून सारेने हे ऐकले.
437  GEN 18:12  म्हणून सारा स्वतःशीच हसून म्हणाली, मी म्हातारी झाली आहे, आणि माझा पतीही म्हातारा झाला आहे, आता मला ते सुख लाभेल काय?”
438  GEN 18:13  परमेश्वर अब्राहामाला म्हणाला, सारा का हसली? मी आता इतकी म्हातारी झाली असताना मला मुलगा होईल काय, असे ती का म्हणाली?
440  GEN 18:15  नंतर सारा नाकारून म्हणाली, मी हसले नाही,” कारण ती फार घाबरली होती. त्याने उत्तर दिले, नाही, तू हसलीसच.”
442  GEN 18:17  परमेश्वर देव म्हणाला, मी जे काही करणार आहे ते अब्राहामापासून लपवू काय?
445  GEN 18:20  मग परमेश्वर म्हणाला, सदोम व गमोरा यांच्या दुष्टाईचा आक्रोश मोठा आहे, आणि त्यांचे पाप फार गंभीर असल्या कारणाने,
448  GEN 18:23  मग अब्राहाम परमेश्वराजवळ जाऊन म्हणाला, तू दुष्टाबरोबर नीतिमानांचाही नाश करशील काय?
451  GEN 18:26  परमेश्वर म्हणाला, या सदोम शहरात मला पन्नास नीतिमान लोक सापडले तरीही त्यांच्यासाठी मी संपूर्ण स्थळाचा बचाव करीन.”
452  GEN 18:27  अब्राहामाने उत्तर देऊन म्हटले, पाहा मी केवळ धूळ व राख आहे, तरी प्रभूजवळ बोलायला धजतो!
453  GEN 18:28  समजा जर पाच लोक कमी असतील म्हणजे फक्त पंचेचाळीसच चांगले लोक असतील तर? त्या पाच कमी असलेल्या लोकांकरता तू सर्व नगराचा नाश करशील काय?” आणि तो म्हणाला, मला पंचेचाळीस लोक चांगले आढळले तर मी नगराचा नाश करणार नाही.”
454  GEN 18:29  पुन्हा तो परमेश्वरास म्हणाला, आणि जर तेथे तुला चाळीसच चांगले लोक आढळले तर? संपूर्ण शहराचा तू नाश करशील काय?” परमेश्वर म्हणाला, जर मला चाळीसच लोक चांगले आढळले तरीही, मी शहराचा नाश करणार नाही.”
455  GEN 18:30  तो म्हणाला, प्रभू, कृपा करून तुला राग न यावा म्हणजे मी बोलेन. तेथे फक्त तीसच मिळाले तर?” परमेश्वर म्हणाला, जर तीस चांगले लोक असतील तरीही मी तसे करणार नाही.”
456  GEN 18:31  तो म्हणाला, मी प्रभूशी बोलायला धजतो! समजा तेथे कदचित वीसच मिळाले तर?” परमेश्वराने उत्तर दिले, त्या वीसांकरताही मी नगराचा नाश करणार नाही.”
457  GEN 18:32  शेवटी तो म्हणाला, प्रभू, कृपा करून माझ्यावर रागावू नकोस, मी शेवटी एकदाच बोलतो. कदाचित तुला तेथे दहाच लोक मिळाले तर?” परमेश्वर म्हणाला, त्या दहांकरताही मी नगराचा नाश करणार नाही.”