9 | GEN 1:9 | नंतर देव बोलला, “आकाशाखालील पाणी एकाजागी एकत्र जमा होवो व कोरडी जमीन दिसून येवो,” आणि तसे झाले. |
10 | GEN 1:10 | देवाने कोरड्या जमिनीस भूमी आणि एकत्र झालेल्या पाण्याच्या संचयास समुद्र असे म्हटले. त्याने पाहिले की हे चांगले आहे. |
39 | GEN 2:8 | परमेश्वर देवाने पूर्वेकडे एदेनात एक बाग लावली आणि त्या बागेत आपण घडविलेल्या मनुष्यास ठेवले. |
41 | GEN 2:10 | बागेला पाणी देण्यासाठी एदेनातून एक नदी निघाली. तेथून ती विभागली आणि तिच्या चार नद्या झाल्या. |
46 | GEN 2:15 | परमेश्वर देवाने मनुष्यास एदेन बागेत तिची मशागत करण्यासाठी व बागेची काळजी घेण्यासाठी ठेवले. |
49 | GEN 2:18 | नंतर परमेश्वर देव बोलला, “मनुष्याने एकटे असावे हे बरे नाही; मी त्याच्यासाठी सुसंगत मदतनीस निर्माण करीन.” |
52 | GEN 2:21 | तेव्हा परमेश्वर देवाने मनुष्यास गाढ झोप लागू दिली, आणि तो झोपला असता परमेश्वराने मनुष्याच्या शरीरातून एक बरगडी काढली व ती जागा मांसाने बंद केली. |
55 | GEN 2:24 | म्हणून मनुष्य आपल्या आई वडीलांस सोडून आपल्या पत्नीला जडून राहील आणि ती दोघे एक देह होतील. |
63 | GEN 3:7 | तेव्हा त्या दोघांचे डोळे उघडले व आपण नग्न आहोत असे त्यांना समजले; तेव्हा त्यांनी अंजिराची पाने एकत्र जोडून आपणाला झाकण्यासाठी वस्त्रे तयार केली. |
78 | GEN 3:22 | परमेश्वर देव म्हणाला, “पाहा, मनुष्य आपल्यातल्या एका सारखा होऊन त्यास बरे व वाईट समजू लागले आहे. तर आता त्यास त्याच्या हातांनी जीवनाच्या झाडावरून ते फळ घेऊन खाऊ देऊ नये, आणि जर का तो ते फळ खाईल तर मग सदासर्वकाळ तो जिवंत राहील.” |
79 | GEN 3:23 | तेव्हा परमेश्वर देवाने मनुष्यास ज्या जमिनीतून उत्पन्न केले होते तिची मशागत करण्यासाठी एदेन बागेतून बाहेर घालवून दिले. |
80 | GEN 3:24 | देवाने मनुष्यास बागेतून घालवले, आणि जीवनाच्या झाडाचे रक्षण करण्यासाठी त्याने एदेन बागेच्या पूर्वेकडे करुब ठेवले, आणि सर्व दिशांनी गरगर फिरणारी ज्वालारूप एक तलवार ठेवली. |
95 | GEN 4:15 | परमेश्वर त्यास म्हणाला, “जर कोणी काइनाला ठार मारील तर त्याचा सातपट सूड घेण्यात येईल.” त्यानंतर, तो कोणाला सापडला तर त्यास कोणी जिवे मारू नये म्हणून, परमेश्वराने काइनावर एक खूण करून ठेवली. |
96 | GEN 4:16 | काइन परमेश्वरासमोरून निघून गेला आणि एदेनाच्या पूर्वेस नोद प्रदेशात जाऊन राहिला. |
97 | GEN 4:17 | काइनाने आपल्या पत्नीस जाणिले, ती गर्भवती होऊन तिने हनोखाला जन्म दिला; काइनाने एक नगर बांधले त्याने त्या नगराला आपल्या मुलाचेच हनोख हे नाव दिले. |
98 | GEN 4:18 | हनोखाला इराद झाला; इरादाला महूयाएल झाला महूयाएलास मथुशाएल झाला; आणि मथुशाएलास लामेख झाला. |
103 | GEN 4:23 | लामेख आपल्या बायकांना म्हणाला, आदा आणि सिल्ला माझी वाणी ऐका; लामेखाच्या बायकांनो, मी ज्या गोष्टी बोलतो त्याकडे कान लावा; एका मनुष्याने मला जखमी केले, मी त्यास ठार मारले, एका तरुणाने मला मारले म्हणून मी त्यास ठार केले. |
109 | GEN 5:3 | आदाम एकशे तीस वर्षांचा झाल्यावर त्यास त्याच्या प्रतिरूपाचा म्हणजे त्याच्या सारखा दिसणारा मुलगा झाला. त्याने त्याचे नाव शेथ ठेवले; |
111 | GEN 5:5 | अशा रीतीने आदाम एकंदर नऊशें तीस वर्षे जगला; नंतर तो मरण पावला. |
112 | GEN 5:6 | शेथ एकशे पाच वर्षांचा झाल्यावर त्यास अनोश झाला |
114 | GEN 5:8 | शेथ एकंदर नऊशेंबारा वर्षे जगला, मग तो मरण पावला. |
117 | GEN 5:11 | अनोश एकंदर नऊशेंपाच वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला. |
120 | GEN 5:14 | केनान एकंदर नऊशेंदहा वर्षे जगला, नंतर तो मरण पावला. |
123 | GEN 5:17 | महललेल एकंदर आठशे पंचाण्णव वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला. |
124 | GEN 5:18 | यारेद एकशे बासष्ट वर्षांचा झाल्यावर तो हनोखाचा पिता झाला; |
126 | GEN 5:20 | यारेद एकंदर नऊशें बासष्ट वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला. |
129 | GEN 5:23 | हनोख एकंदर तीनशे पासष्ट वर्षे जगला; |
131 | GEN 5:25 | मथुशलह एकशेसत्याऐंशी वर्षांचा झाल्यावर लामेखाचा पिता झाला. |
133 | GEN 5:27 | मथुशलह एकंदर नऊशें ऐकोणसत्तर वर्षे जगला. त्यानंतर तो मरण पावला. |
134 | GEN 5:28 | लामेख एकशेब्यांऐशी वर्षांचा झाल्यावर तो एका मुलाचा पिता झाला. |
137 | GEN 5:31 | लामेख एकंदर सातशे सत्याहत्तर वर्षे जगला. नंतर तो मरण पावला. |
141 | GEN 6:3 | परमेश्वर म्हणाला, “माझा आत्मा मानवामध्ये सर्वकाळ राहणार नाही, कारण ते देह आहेत. ते एकशें वीस वर्षे जगतील.” |
143 | GEN 6:5 | पृथ्वीवर मानवजातीची दुष्टता मोठी आहे, आणि त्यांच्या मनात येणाऱ्या विचारातील प्रत्येक कल्पना केवळ एकसारखी वाईट असते, असे परमेश्वराने पाहिले. |
152 | GEN 6:14 | तेव्हा आपणासाठी गोफेर लाकडाचे एक तारू कर; तू त्यामध्ये खोल्या कर आणि त्यास सर्वत्र म्हणजे आतून व बाहेरून डांबर लाव. |
154 | GEN 6:16 | तारवाला छतापासून सुमारे अठरा इंचावर एक खिडकी कर. तारवाच्या एका बाजूस दार ठेव आणि तारवाला खालचा, मधला व वरचा असे तीन मजले कर. |
156 | GEN 6:18 | मी तुझ्याबरोबर आपला एक करार स्थापीन. तू, तुझ्यासोबत तुझे पुत्र, तुझी पत्नी आणि तुझ्या सुना यांना घेऊन तारवात जाशील. |
184 | GEN 7:24 | एकशे पन्नास दिवस पृथ्वीवर पाण्याचा जोर होता. |
187 | GEN 8:3 | पृथ्वीवरून पुराचे पाणी एकसारखे मागे हटत गेले. आणि दीडशे दिवसाच्या अखेरीस पुष्कळ पाणी कमी झाले. |
189 | GEN 8:5 | दहाव्या महिन्यापर्यंत पाणी एकसारखे हटत गेले. दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पर्वतांचे माथे दिसू लागले. |
191 | GEN 8:7 | त्याने एक कावळा बाहेर सोडला आणि पृथ्वीवरील पाणी सुकून जाईपर्यंत तो इकडे तिकडे उडत राहिला. |
192 | GEN 8:8 | नंतर जमिनीच्या वरील भागावरून पाणी मागे हटले आहे की नाही हे पाहण्याकरिता नोहाने एक कबुतर बाहेर सोडले, |
197 | GEN 8:13 | असे झाले की, सहाशे एकाव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिल्या दिवशी पृथ्वीवरील पाणी सुकून गेले, तेव्हा नोहाने तारवाचे आच्छादन काढून बाहेर पाहिले, तो पाहा, जमिनीचा वरील भाग कोरडा झालेला होता. |
204 | GEN 8:20 | नोहाने परमेश्वराकरता एक वेदी बांधली. त्याने शुद्ध पक्ष्यांतून काही आणि शुद्ध पशुंतून काही घेतले, आणि त्यांचे वेदीवर होमार्पण केले. |
215 | GEN 9:9 | “माझे ऐका! मी तुमच्याशी व तुमच्या नंतर तुमच्या वंशजाशी एक करार स्थापन करतो, |
216 | GEN 9:10 | आणि तुमच्याबरोबर असलेले सर्व जिवंत प्राणी, म्हणजे तुमच्याबरोबर तारवातून बाहेर आलेले पक्षी, गुरेढोरे, आणि पृथ्वीवर राहणारे सर्व प्राणी त्यांच्याशीही एक करार स्थापित करतो. |
226 | GEN 9:20 | नोहा शेतकरी बनला, आणि त्याने एक द्राक्षमळा लावला. |
229 | GEN 9:23 | मग शेम व याफेथ यांनी एक कपडा घेतला व तो आपल्या खांद्यावर ठेवून ते पाठमोरे तंबूत गेले. अशा प्रकारे त्यांनी आपल्या पित्याची नग्नता झाकली; पाठमोरे असल्यामुळे ती त्यांना दिसली नाही. |
235 | GEN 9:29 | नोहा एकूण नऊशें पन्नास वर्षे जगला; मग त्यानंतर तो मरण पावला. |
245 | GEN 10:10 | त्याच्या राज्याची पहिली मुख्य ठिकाणे शिनार देशातील बाबेल, एरक, अक्काद व कालने ही होती. |
247 | GEN 10:12 | आणि निनवे व कालह यांच्या दरम्यान त्याने रेसन नावाचे शहर वसवले. हे एक मोठे शहर आहे. |
256 | GEN 10:21 | शेम हा याफेथाचा वडील भाऊ होता. एबर हा शेम यांचा वंशज होता. तो सर्व एबर लोकांचा मूळ पुरुष होता. |
257 | GEN 10:22 | शेम याचे पुत्र एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम हे होते. |
259 | GEN 10:24 | अर्पक्षद हा शेलहचा पिता झाला, शेलह हा एबरचा पिता झाला. |
260 | GEN 10:25 | एबर याला दोन मुले झाली. एकाचे नाव पेलेग होते, कारण त्याच्या काळात पृथ्वीची विभागणी झाली; त्याच्या भावाचे नाव यक्तान होते. |
263 | GEN 10:28 | ओबाल, अबीमाएल, शबा, |
268 | GEN 11:1 | आता पृथ्वीवरील सर्व लोक एकच भाषेचा वापर करत होते आणि शब्द समान होते. |
269 | GEN 11:2 | ते पूर्वेकडे प्रवास करत असताना त्यांना शिनार देशात एक मैदान लागले आणि त्यांनी तेथेच वस्ती केली. |
270 | GEN 11:3 | ते एकमेकांना म्हणाले, “चला, आपण विटा करू व त्या पक्क्या भाजू.” त्यांच्याकडे बांधकामासाठी दगडाऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर होते. |
273 | GEN 11:6 | परमेश्वर देव म्हणाला, “पाहा, हे सर्व लोक एक असून, एकच भाषा बोलतात आणि ही तर त्यांची सुरुवात आहे! लवकरच, जे काही करण्याचा त्यांचा हेतू आहे ते करणे त्यांना मुळीच अशक्य होणार नाही. |
274 | GEN 11:7 | चला आपण खाली जाऊन त्यांच्या भाषेचा घोटाळा करून टाकू. मग त्यांना एकमेकांचे बोलणे समजणार नाही.” |
281 | GEN 11:14 | जेव्हा शेलह तीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने एबरला जन्म दिला; |
282 | GEN 11:15 | एबरला जन्म दिल्यावर शेलह चारशे तीन वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला. |
283 | GEN 11:16 | एबर चौतीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने पेलेगाला जन्म दिला. |
284 | GEN 11:17 | पेलेग झाल्यावर एबर चारशे तीस वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला. |
291 | GEN 11:24 | नाहोर एकोणतीस वर्षांचा झाला, तेव्हा त्याने तेरहाला जन्म दिला. |
292 | GEN 11:25 | तेरहाला जन्म दिल्यावर नाहोर आणखी एकशे एकोणीस वर्षे जगला आणि त्याने मुलांना व मुलींना जन्म दिला. |
305 | GEN 12:6 | अब्राम कनान देशातून प्रवास करीत शखेमापर्यंत मोरेच्या एलोन झाडापर्यंत गेला. त्या काळी त्या देशात कनानी लोक राहत होते. |
325 | GEN 13:6 | तो देश त्या दोघांना एकत्र जवळ राहण्यास पुरेना, कारण त्यांची मालमत्ता फारच मोठी होती, ती इतकी की त्यांना एकत्र राहता येईना. |
327 | GEN 13:8 | तेव्हा अब्राम लोटाला म्हणाला, “तुझ्यामध्ये व माझ्यामध्ये, तसेच तुझे गुराखी व माझे गुराखी यांच्यामध्ये भांडण नसावे. शेवटी आपण एक कुटुंब आहोत. |
330 | GEN 13:11 | तेव्हा लोटाने यार्देनेचे सर्व खोरे निवडले. मग ते दोघे वेगळे झाले आणि लोटाने पूर्वेकडे प्रवास करण्यास सुरुवात केली, आणि ते एकमेकांपासून वेगळे झाले. |
337 | GEN 13:18 | तेव्हा अब्रामाने आपला तंबू हलविला व तो हेब्रोन शहराजवळील मम्रेच्या एलोन झाडाशेजारी रहावयास गेला. परमेश्वरासाठी त्याने तेथे वेदी बांधिली. |
338 | GEN 14:1 | त्यानंतर शिनाराचा राजा अम्राफेल, एल्लासाराचा राजा अर्योक, एलामाचा राजा कदार्लागोमर आणि गोयिमाचा राजा तिदाल यांच्या दिवसात असे झाले की, |
340 | GEN 14:3 | नंतर हे पाच राजे सिद्दीम खोऱ्यात एकत्र जमले. या खोऱ्याला क्षार समुद्र असेही म्हणतात. |
342 | GEN 14:5 | त्यानंतर चौदाव्या वर्षी कदार्लागोमर व त्याच्या बरोबरचे राजे आले आणि त्यांनी अष्टरोथ-कर्णईम येथे रेफाईम लोकांस, हाम येथे जूजीम लोकांस, शावेह किर्याथाईम येथे एमीम या लोकांस मारले. |
343 | GEN 14:6 | आणि होरी यांना त्यांच्या सेईर डोंगराळ प्रदेशात जे एल पारान रान आहे तेथपर्यंत त्यांनी जाऊन मारले. |
344 | GEN 14:7 | नंतर ते मागे फिरून एन-मिशपात म्हणजे कादेश येथे आले. आणि त्यांनी सर्व अमालेकी देशाचा आणि तसेच हससोन-तामार येथे राहणाऱ्या अमोरी लोकांचाही पराभव केला. |
346 | GEN 14:9 | एलामाचा राजा कदार्लागोमर, गोयिमाचा राजा तिदाल, शिनाराचा राजा अम्राफेल आणि एल्लासाराचा राजा अर्योक यांच्या विरूद्ध ते लढले. हे चार राजे पाच राजांविरूद्ध लढले. |
350 | GEN 14:13 | तेथून पळून आलेल्या एकाने अब्राम इब्रीला हे सांगितले. तो तर अष्कोल व आनेर ह्यांचा भाऊ मम्रे अमोरी याच्या एलोन झाडांजवळ राहत होता आणि ते सर्व अब्रामाचे सहकारी होते. |
363 | GEN 15:2 | अब्राम म्हणाला, “हे प्रभू परमेश्वरा, मी अजून निपुत्रिक आहे, आणि माझ्या घराचा वारस दिमिष्क शहरातील अलिएजर हाच होईल, तेव्हा तू मला काय देणार?” |
370 | GEN 15:9 | तो त्यास म्हणाला, “माझ्यासाठी तीन वर्षांची एक कालवड, तीन वर्षांची एक शेळी, तीन वर्षांचा एक एडका तसेच एक होला व एक पारव्याचे पिल्लू आण.” |
383 | GEN 16:1 | अब्रामाला आपली पत्नी साराय हिच्यापासून मूल झाले नाही, परंतु तिची एक मिसरी दासी होती, जिचे नाव हागार होते. |
389 | GEN 16:7 | शूर गावाच्या वाटेवर वाळवंटातील एका पाण्याच्या झऱ्याजवळ हागार परमेश्वराच्या एका देवदूताला आढळली. |
393 | GEN 16:11 | परमेश्वराचा दूत तिला असे सुद्धा म्हणाला, “तू आता गरोदर आहेस आणि तुला मुलगा होईल त्याचे नाव तू इश्माएल म्हणजे परमेश्वर ऐकतो असे ठेव, कारण प्रभूने तुझ्या दुःखाविषयी ऐकले आहे. |
394 | GEN 16:12 | इश्माएल जंगली गाढवासारखा मनुष्य असेल. तो सर्वांविरूद्ध असेल आणि सर्व लोक त्याच्या विरूद्ध असतील, आणि तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्या भावांच्यापासून वेगळा राहील.” |