416 | GEN 17:18 | अब्राहाम देवाला म्हणाला, “इश्माएल तुझ्या समोर जगावा तेवढे पुरे!” |
467 | GEN 19:9 | ते म्हणाले, “बाजूला हो!” ते असेही म्हणाले, “हा आमच्यात परराष्ट्रीय म्हणून राहण्यास आला. आणि आता हा आमचा न्यायाधीश बनू पाहत आहे! आता आम्ही तुझे त्यांच्यापेक्षा वाईट करू.” ते त्या मनुष्यास म्हणजे लोटाला अधिक जोराने लोटू लागले व दरवाजा तोडण्यास ते जवळ आले. |
521 | GEN 21:7 | आणखी ती असेही म्हणाली, “सारा या मुलाला स्तनपान देईल असे अब्राहामाला कोण म्हणाला असता? आणि तरीसुद्धा त्याच्या म्हातारपणात मला त्याच्यापासून मुलगा झाला आहे!” |
559 | GEN 22:11 | परंतु तेवढ्यात, परमेश्वराच्या दूताने स्वर्गातून हाक मारून त्यास म्हटले, “अब्राहामा, अब्राहामा!” अब्राहामाने उत्तर दिले, “मी येथे आहे.” |
689 | GEN 25:30 | एसाव याकोबास म्हणाला, “मी तुला विनंती करतो, मला थोडे तांबडे डाळीचे वरण खायला घेऊ दे. मी फार दमलो आहे!” म्हणून त्याचे नाव अदोम पडले. |
1149 | GEN 38:29 | परंतु त्या बाळाने आपला हात आखडून घेतला. त्यानंतर मग दुसरे बाळ प्रथम जन्मले. म्हणून मग ती सुईण म्हणाली, “तू आपल्यासाठी कशी वाट फोडलीस!” आणि त्याचे नाव पेरेस असे ठेवले. |
1281 | GEN 42:28 | तेव्हा तो आपल्या इतर भावांना म्हणाला, “पाहा! धान्यासाठी मी दिलेले हे पैसे कोणीतरी पुन्हा माझ्या गोणीत ठेवले आहेत!” तेव्हा ते भाऊ अतिशय घाबरले, ते एकमेकांस म्हणाले, “देव आपल्याला काय करत आहे.” |
1584 | EXO 3:4 | मोशे झुडूपाजवळ येत आहे हे परमेश्वराने पाहिले. तेव्हा झुडपातून देवाने त्यास हाक मारून म्हटले, “मोशे! मोशे!” आणि मोशे म्हणाला, “हा मी इथे आहे.” |
1625 | EXO 4:23 | परमेश्वर म्हणतो, मी तुला सांगत आहे की “तू माझ्या पुत्राला माझी उपासना करण्याकरता जाऊ दे!” जर तू त्यास जाऊ देण्याचे नाकारशील तर मी तुझ्या ज्येष्ठ पुत्राला ठार मारीन. |
1806 | EXO 10:28 | मग फारो मोशेवर ओरडला व म्हणाला, “तू येथून चालता हो! आपले तोंड मला पुन्हा दाखवू नकोस! यानंतर तू आपले तोंड मला दाखवशील त्या दिवशी तू मरशील!” |
1807 | EXO 10:29 | मोशे म्हणाला, “तू बरोबर बोललास, मी तुझे तोंड पुन्हा कधीही पाहणार नाही!” |
2997 | LEV 10:19 | परंतु अहरोन मोशेला म्हणाला, “पाहा, आज त्यांनी आपले पापार्पण व होमार्पण परमेश्वरासमोर अर्पण केले, आणि तरी आज माझ्यावर कशी संकटे आली आहेत हे तू जाणतोस; तेव्हा आज मी पापबली खाल्ला असता तर परमेश्वरास ते आवडले असते, असे तुला वाटते काय? नाही ना!” |
3043 | LEV 11:45 | मी परमेश्वर, ज्याने तुम्हास मिसर देशातून यासाठी बाहेर आणले की तुम्ही माझे पवित्र लोक व्हावे व मी तुमचा देव असावे; मी पवित्र आहे म्हणून तुम्हीही पवित्र असावे!” |
3319 | LEV 19:37 | “म्हणून तुम्ही माझे विधी व नियम यांची आठवण ठेवून ते पाळावे. मी परमेश्वर आहे!” |
3321 | LEV 20:2 | “तू इस्राएल लोकांस आणखी असे सांग की, इस्राएलांपैकी किंवा इस्राएल लोकांमध्ये राहणाऱ्या परकियांपैकी कोणी आपल्या मुलाबाळांतून एखादे मूल मोलख दैवतास अर्पील तर त्या मनुष्यास जिवे मारावे! आपल्या देशाच्या लोकांनी त्यास धोंडमार करावा!” |
3369 | LEV 21:23 | परंतु त्यास व्यंग असल्यामुळे त्याने अंतरपटाच्या आत आणि वेदीजवळ जाऊ नये व माझी परमपवित्र स्थाने भ्रष्ट करु नये; कारण त्यांना पवित्र करणारा मी परमेश्वर आहे!” |
3403 | LEV 22:33 | मी तुम्हास मिसर देशातून बाहेर आणले, आणि मी तुमचा देव झालो, मी परमेश्वर आहे!” |
3425 | LEV 23:22 | तसेच तुम्ही आपल्या जमिनीतील पिकाची कापणी कराल तेव्हा तुमच्या शेताच्या कोनाकोपऱ्यातील साऱ्या पिकाची कापणी करु नका आणि सरवा वेचू नका; गरीब व तुमच्या देशातून प्रवास करणाऱ्या उपरी लोकांसाठी तो राहू द्या, मी तुमचा देव परमेश्वर आहे!” |
3446 | LEV 23:43 | म्हणजे तुमच्या पुढील पिढ्यांना कळेल की, मी इस्राएल लोकांस मिसर देशातून बाहेर आणले तेव्हा त्यांना तात्पुरत्या उभारलेल्या मांडवात रहावयास लावले. मी परमेश्वर तुमचा देव आहे!” |
3469 | LEV 24:22 | परदेशीयांना व स्वदेशीयांना एकच नियम लागू असावा; कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे!” |
4031 | NUM 11:6 | आता आम्ही कमजोर झालो आहोत. मान्न्याशिवाय आम्ही येथे काहीच पाहत नाही!” |
4064 | NUM 12:4 | तेव्हा परमेश्वर एकाएकी मोशे, अहरोन व मिर्याम ह्याच्याशी बोलला. “तुम्ही तिघे आत्ताच्या आता दर्शनमंडपापाशी या!” तेव्हा ते तिघे बाहेर आले. |
5680 | DEU 28:67 | सकाळी तुम्ही म्हणाल, “ही रात्र असती तर बरे!” आणि रात्री म्हणाल, “ही सकाळ असती तर किती बरे!” तुमच्या मनातील भीती आणि डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टी यामुळे असे होईल. |
6678 | JDG 6:22 | तेव्हा गिदोनाला समजले की तो परमेश्वराचा दूत होता; गिदोन म्हणाला, हाय हाय, “हे प्रभू देवा! कारण मी परमेश्वराचा दूत समोरासमोर, पाहिला आहे!” |
6960 | JDG 16:9 | तेव्हा तिच्या आतल्या खोलीत गुप्तपणे माणसे दबा धरून बसली होती, आणि तिने त्यास म्हटले, “शमशोना, पलिष्टी तुजवर चालून आले आहेत!” परंतु त्याने जसा तागाचा दोरा अग्नी लागताच तुटून जातो तशा धनुष्याच्या त्या सात हिरव्या वाद्या तोडून टाकल्या. आणि त्याच्या बळाचे रहस्य त्यांना समजू शकले नाही. |
6965 | JDG 16:14 | तो झोपला तेव्हा तिने त्याचे केस विणकाराच्या फणीमध्ये धाग्यांबरोबर ताणून बांधले आणि नंतर मागावर विणले; आणि ती त्यास म्हणाली, “शमशोना, पलिष्टी तुझ्यावर चालून आलेत!” तेव्हा तो आपल्या झोपेतून जागा झाला आणि त्याने विणकराची फणी व मागसुद्धा उखडून काढला. |
6981 | JDG 16:30 | तेव्हा शमशोन म्हणाला, “पलिष्ट्यांच्या बरोबर माझाही जीव जावो!” मग त्याने सर्व बळ एकवटून ते खांब ढकलले, आणि ते सभागृह त्या अधिकाऱ्यांवर व त्यातल्या सर्व लोकांवर पडले. अशा रीतीने तो जिवंत असताना त्याने जितके मारले होते, त्यांपेक्षाही त्याच्या मरणाच्या वेळी त्याने जे मारले ते अधिक होते. |
6984 | JDG 17:2 | आणि त्याने आपल्या आईला म्हटले, “जी अकराशे शेकेल रुप्याची नाणी तुझ्याजवळून घेतली गेली होती,” आणि ज्यामुळे तू शाप उच्चारला होता, आणि तो मी ऐकला! पाहा ती रुप्याची नाणी माझ्याजवळ आहेत; मीच ती चोरून घेतली होती. त्याची आई म्हणाली, “माझ्या मुला, परमेश्वर तुला आशीर्वाद देवो!” |
7056 | JDG 19:30 | ज्या प्रत्येकाने ते पाहिले, त्यांनी म्हटले, “मिसर देशातून इस्राएल लोक पुन्हा आले, त्या दिवसापासून आजपर्यंत यासारखी गोष्ट घडली नाही, आणि कधी दृष्टीस पडली नाही; याविषयी तुम्ही विचार करा! आम्हांला सल्ला द्या! काय करावे ते आम्हांला सांगा!” |
7320 | 1SA 4:21 | तिने मुलाचे नांव ईखाबोद असे ठेवून म्हटले की, “इस्राएलापासून वैभव निघून गेले आहे!” कारण देवाचा कोश पळवून नेलेला होता, आणि तिचा सासरा व तिचा पती हे मरण पावले होते. |
7444 | 1SA 10:24 | तेव्हा शमुवेल सर्व लोकांस म्हणाला, “ज्याला परमेश्वराने निवडले त्यास तुम्ही पाहता काय? त्याच्यासारखा सर्व लोकात कोणी नाही!” सर्व लोक ओरडून म्हणाले, “राजा दीर्घायुषी होवो!” |
7816 | 1SA 23:3 | तेव्हा दावीदाच्या मनुष्यांनी म्हटले, “पाहा आम्हास येथे यहूदात भय आहे; मग आम्ही कईल्यांकडे पलिष्टांच्या सैन्यावर चालून गेलो तर ते कितीतरी अधिक धोकादायक होईल!” |
8180 | 2SA 6:20 | मग दावीद घरातील सर्वांना आशीर्वाद द्यायला घरात आला. तेव्हा शौलकन्या मीखल हिने त्यास गाठले आणि ती म्हणाली, “इस्राएलाच्या राजाने आज आपला सन्मान राखला नाही. नोकरा-चाकरांसमोर, दासीसमोर त्या मूर्खांपैकीच एक असल्याप्रमाणे तुम्ही आपले वस्त्र काढलेत!” |
8514 | 2SA 19:1 | यावरुन अबशालोम मरण पावला हे राजाला उमगले. तो फार शोकाकुल झाला. वेशीच्या भिंतीवर बांधलेल्या खोलीत तो गेला. तेथे त्यास रडू कोसळले, आपल्या दालनात जाताना तो म्हणाला, “अबशालोम, माझ्या पुत्रा, तुझ्या ऐवजी मीच मरायला हवे होते माझ्या पुत्रा!” |
9331 | 1KI 17:11 | ती पाणी आणायला निघाली तेव्हा, एलीया तिला म्हणाला, “मला एखादा भाकरीचा तुकडाही दिलास तर बरे!” |
9567 | 2KI 2:12 | अलीशा हे पाहून मोठ्याने ओरडला, “माझ्या बापा! माझ्या बापा! इस्राएलचा रथ आणि त्याचे घोडेस्वार!” त्याने एलीयाला पुन्हा पाहिले नाही. त्याने आपली वस्रे धरुन फाडली व त्याचे दोन तुकडे केले. |
9631 | 2KI 4:24 | मग गाढवावर खोगीर चढवून ती नोकराला म्हणाली, “आता पटकन चल आणि मी सांगितल्या शिवाय माझ्यासाठी वेग कमी करु नको!” |
9637 | 2KI 4:30 | पण मुलाच्या आईने म्हटले, “परमेश्वराची आणि तुमची शपथ मी तुम्हास सोडणार नाही!” तेव्हा अलीशा उठला आणि तिच्या मागून निघाला. |
9691 | 2KI 6:13 | तेव्हा अरामाचा राजा म्हणाला, “कोठे आहे तो अलीशा. त्यास पकडायला मी माणसे पाठवतो!” तेव्हा अरामाच्या राजाच्या सेवकांनी तो दोथानमध्ये असल्याचे सांगितले. |
9694 | 2KI 6:16 | अलीशा म्हणाला, “घाबरु नको! त्याच्या सैन्यापेक्षा आपले सैन्य कितीतरी मोठे आहे!” |
9704 | 2KI 6:26 | इस्राएलचा राजा एकदा शहराच्या तटबंदीवरुन फिरत होता. तेव्हा एका स्त्रीने त्यास मोठ्याने ओरडून म्हटले, “माझे स्वामी व प्रभू कृपाकरून मला मदत करा!” |
9709 | 2KI 6:31 | राजा म्हणाला, “आज दिवस मावळेपर्यंत शाफाटचा मुलगा अलीशा याचे मस्तक त्याच्या धडावर राहिले तर परमेश्वर मला हवे ते शासन करो!” |
9710 | 2KI 6:32 | राजाने अलीशाकडे एक दूत पाठवला. अलीशा आपल्या घरात बसला होता आणि गावातील वडिलधारी मंडळी त्याच्या बैठकीत होती. हा दूत तेथे पोचण्यापूर्वी अलीशा त्या लोकांस म्हणाला, “हे बघा, तो इस्राएलचा घातकी राजा माझा शिरच्छेद करण्यासाठी माणसे पाठवत आहे. तेव्हा आता दूत येईल तेव्हा त्यास लोटून दार लावून घ्या. त्याच्या मागोमाग त्याच्या स्वामीच्या पावलांची चाहुल मला लागली आहे!” |
9730 | 2KI 7:19 | पण या कारभाऱ्याने तेव्हा अलीशाला सांगितले, “परमेश्वराने आकाशाला खिंडार पाडले तरी हे होणार नाही!” यावर अलीशा त्या कारभाऱ्याला म्हणाला, “तू हे सर्व आपल्या डोळ्यांदेखत पाहशील पण तुला त्यातले काहीही खाता येणार नाही.” |
9744 | 2KI 8:13 | हजाएल म्हणाला, “मी पडलो कुत्र्यासारखा क्षुद्र मनुष्य एक दुबळामनुष्य या मोठ्या गोष्टी मी कसल्या करणार!” अलीशा म्हणाला, “तू अरामाचा राजा होणार असे परमेश्वराने मला सांगितले आहे.” |
9763 | 2KI 9:3 | त्यानंतर ही तेलाची कुपी घेऊन त्याच्या मस्तकावर तेल ओत. तेव्हा ‘परमेश्वर म्हणतो की इस्राएलचा राजा म्हणून मी तुला अभिषेक केला आहे,’ असे म्हण. एवढे झाले की धावत परत ये. तेथे थांबू नकोस!” |
9786 | 2KI 9:26 | परमेश्वर म्हणाला होता, ‘नाबोथ आणि त्याची मुले यांचे रक्त काल मला दिसले तेव्हा त्या शेतात मी अहाबाला शिक्षा करीन.’ प्रत्यक्ष परमेश्वरच असे म्हणाला. तेव्हा उचल तो मृतदेह आणि परमेश्वराच्या म्हणण्याप्रमाणे दे टाकून त्या शेतात!” |
9792 | 2KI 9:32 | येहूने वर खिडकीकडे पाहत म्हटले, “माझ्या बाजूने कोण आहे? बोला!” तेव्हा खिडकीतून दोन तीन खोजांनी त्याच्याकडे पाहिले. |
9847 | 2KI 11:14 | राजाची रीतीप्रमाणे स्तंभाजवळ उभे रहायची जी जागा तिथे अथल्याने राजाला उभे असलेले पाहिले. नेते आणि लोक कर्णे वाजवीत आहेत हे ही तिने पाहिले. लोकांस खूप आनंद झालेला आहे हे तिच्या लक्षात आले. कर्ण्यांचा आवाज ऐकून तिने नाराजी प्रदर्शित करण्याकरता आपली वस्त्रे फाडली आणि ती “फितुरी! फितुरी!” म्हणून ओरडू लागली. |
10694 | 1CH 11:17 | तेव्हा दावीदाला पाण्याची फार उत्कट इच्छा झाली. तो म्हणाला, “बेथलेहेमच्या वेशीजवळ विहीर आहे तिच्यातले पाणी जर मला कोणी आणून दिले तर किती बरे होईल!” |
11206 | 2CH 1:7 | त्या रात्री देवाने शलमोनाला दर्शन दिले तो म्हणाला, “शलमोना, तुला काय हवय ते माग!” |
11562 | 2CH 18:15 | राजा अहाब मीखायला म्हणाला, “परमेश्वराचे नाव उच्चारुन सत्य तेच सांग असे मी कितीदा तुला शपथ घेऊन सांगितले!” |
11674 | 2CH 23:13 | पाहते तो तिला राजा दिसला. प्रवेशद्वाराशी तो राजस्तंभाजवळ उभा होता. कर्णे वाजवणारे कारभारी आणि लोक राजाजवळ उभे होते. देशभरचे लोक कर्णे वाजवून आनंद व्यक्त करत होते. गाणारे वाद्ये वाजवत होते आणि त्यांनी म्हटलेल्या स्तवनगीतापाठोपाठ लोक गात होते. तेव्हा आपली तीव्र नापसंती दाखविण्यासाठी अथल्याने आपले कपडे फाडले आणि “फितुरी! फितुरी!” असे ती ओरडली. |
12330 | NEH 2:18 | देवाची माझ्यावर कृपा असल्याचे व राजा माझ्याशी काय बोलला ते मी त्यांना सांगितले. तेव्हा ते म्हणाले, “आपण आताच उठू आणि बांधू!” म्हणून आम्ही या सत्कार्याला सुरुवात केली. |
12395 | NEH 5:8 | आणि त्यांना मी म्हणालो, “आपले यहूदी बांधव इतर देशामध्ये गुलाम म्हणून विकले गेले होते. त्यांना पुन्हा विकत घेऊन मुक्त करण्याचे आपण सर्वतोपरी प्रयत्न केले. परंतु तुम्ही त्यांना गुलामासारखे विकत आहा!” ते लोक गप्प राहिले आणि त्यांना काही बोलायला जागा उरली नाही. |
12503 | NEH 8:6 | एज्राने थोर परमेश्वराची स्तुती केली तेव्हा सर्व लोकांनी आपले हात वर करून “आमेन! आमेन!” म्हणून उत्तर दिले. मग सर्वांनी खाली वाकून, मस्तक जमिनीपर्यंत लववून परमेश्वरास वंदन केले. |
12817 | EST 7:6 | एस्तेर म्हणाली, “तो आपल्या समोरच आहे. हाच तो दृष्ट हामान आमचा शत्रू!” तेव्हा राजा आणि राणीसमोर हामान भयभीत झाला. |
16712 | PRO 9:4 | “जो अज्ञानी आहे तो इकडे येवो!” ती जे बुद्धिहीन आहेत त्यांना म्हणते. |
16724 | PRO 9:16 | “जो कोणी अज्ञानी आहे तो इकडे येवो!” जो कोणी बुद्धिहीन आहे त्यास ती म्हणते. |
17224 | PRO 26:13 | आळशी मनुष्य म्हणतो, “रस्त्यावर सिंह आहे!” तेथे उघड्या जागेमध्ये सिंह आहे. |
17828 | ISA 5:19 | जे असे म्हणतात, “देव घाई करो, तो त्वरीत कृती करो, म्हणजे आम्ही ते झालेले पाहू, आणि इस्राएलाच्या पवित्र्याच्या योजना आकार घेऊन येवोत, म्हणजे त्या आम्ही जाणावे. त्यांना हायहाय!” |
18278 | ISA 29:15 | जे परमेश्वरापासून आपल्या योजना खोल लपवतात, आणि ज्यांची कृत्ये अंधारात आहेत, व जे असे म्हणतात, “आम्हांला कोण पाहते? आणि ओळखते? त्यांना हायहाय!” |
19053 | JER 2:19 | तुझे दुष्कृत्ये तुला दोष देतील आणि तुझा अविश्वासूपणा तुला शिक्षा देईल. तर आता ह्यावर विचार कर, मी, परमेश्वर तुझा देव, तू माझा त्याग केला आहे, आणि तुझ्या ठायी माझे भय नाही हे किती वाईट आणि कडू आहे!” प्रभू सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो. |
19093 | JER 3:22 | “विश्वासहीन लोकांनो, परत या, मी तुमचा विश्वासघातकीपणा बरा करीन. पाहा! आम्ही तुझ्याकडे येण्याचे कारण म्हणजे तू आमचा देव परमेश्वर आहेस!” |
19127 | JER 4:31 | त्यामुळे मी दुःखाचा आवाज ऐकतो आहे, पहिल्या बाळंतपणाच्या वेळेला स्त्री ज्याप्रमाणे किंकाळी फोडते, तसाच सियोनकन्येचा आवाज मी ऐकला आहे. ती श्वासाकरता धडपडत आहे, ती आपले हात पसरत आहे, “मला हाय हाय! कारण माझ्या घातक्यांमुळे माझा जीव कंटाळला आहे!” |
20417 | LAM 2:16 | तुझे सर्व शत्रू तुझ्याविरुध्द मोठे तोंड वासून तुझी थट्टा करतात. ते शिळ घालून दात-ओठ खातात व म्हणतात, “आम्ही तिचे प्राशन केले आहे. खात्रीने आम्ही याच दिवसाची वाट पाहत होतो. आम्ही तो दिवस शोधला! आणि तो पहिला आहे!” |
20574 | EZK 3:3 | तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला, मी तुला दिलेल्या ग्रंथपटाने आपले पोट भरुन टाक!” मग मी ते खाल्ले, आणि ते माझ्या तोंडाला मधासारखे गोड वाटले. |
20593 | EZK 3:22 | मग परमेश्वर देवाचा हात माझ्यावर आला, आणि तो मला म्हणाला, “उठ आणि दरीत जा, तेथे मी तुझ्याशी बोलेन!” |
21525 | EZK 39:8 | पाहा! असा दिवस येत आहे! ते घडेलच!” प्रभू परमेश्वर असे म्हणतो, ज्या दिवसाबद्दल मी बोललो तो हाच आहे. |
21831 | DAN 2:4 | तेव्हा ज्ञानी लोक राजाशी आरामी भाषेत बोलले “महाराज चिरायू असा! तुमच्या सेवकांना तुमचे स्वप्न सांगा आणि आम्ही त्याचा अर्थ तुम्हास प्रगट करू!” |
22103 | DAN 10:19 | तो म्हणाला, “हे परमप्रिय मानवा घाबरू नकोस, तुला शांती असो हिंमत धर. आता, नेट धर!” तो जेव्हा हे बोलला तेव्हा मला बळ मिळाले आहे व मी म्हणालो, “माझ्या स्वामीने आता बोलावे, कारण तू मला सबळ केले आहे.” |
22837 | HAB 2:20 | परंतु परमेश्वर त्याच्या पवित्र मंदिरात आहे, सर्व पृथ्वी त्यापुढे स्तब्ध राहो!” |
22874 | ZEP 1:18 | परमेश्वराच्या क्रोधाच्या दिवशी त्यांचे सोनेचांदी त्यांना वाचवू शकणार नाही. तर त्याच्या क्रोधाच्या अग्नीने सारी भूमी खाऊन टकली जाईल, कारण देशांतल्या सर्व राहणाऱ्यांविरुद्ध जो नाश तो आणणार आहे, तो भयानक असेल!” |
22922 | HAG 1:13 | मग परमेश्वराचा निरोप्या, हाग्गय याने, परमेश्वराचा निरोप लोकांस सांगितला आणि म्हणाला; परमेश्वर असे म्हणतो, “मी तुमच्याबरोबर आहे!” |
22943 | HAG 2:19 | कोठारात अजून बीज आहे काय? द्राक्षवेल, अंजीराचे झाड, डाळिंब, आणि जैतून झाड ह्यांनी काही उत्पन्न दिले नाही! पण या दिवसापासून मी तुम्हास आशीर्वाद देईन!” |
22950 | ZEC 1:3 | तर त्यांना असे सांग, सैन्यांचा परमेश्वर असे म्हणतो: “तुम्ही माझ्याकडे फिरा!” हे सैन्यांच्या परमेश्वराचे वचन आहे; “म्हणजे मी तुमच्याकडे फिरेन.” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. |
22951 | ZEC 1:4 | संदेष्टे तुमच्या पूर्वजांना पूर्वी संदेश देत म्हणाले, “सैन्याचा देव असे म्हणतो: आपल्या दुष्ट मार्गांपासून आणि वाईट चालीरितींपासून वळा!” परंतु त्यांनी ऐकले नाही आणि माझ्याकडे लक्ष दिले नाही. त्या पूर्वजांसारखे होऊ नका. ही परमेश्वराची वाणी होय. |
22975 | ZEC 2:11 | “अहो! बाबेलकन्येसोबत राहणाऱ्यांनो, सियोनेकडे पळून स्वतःचा बचाव करा!” |
23004 | ZEC 4:13 | तेव्हा देवदूताने मला विचारले, “तुला या गोष्टींबद्दल माहीती नाही?” मी म्हणालो, “नाही, महाराज!” |
23013 | ZEC 5:8 | देवदूत म्हणाला, “ही स्त्री दुष्टता आहे!” मग त्याने त्या तिला मापन-टोपलीच्या मध्यभागी टाकले आणि त्याने शिशाचे वजन मापन-टोपलीच्या मुखावर टाकले. |
23058 | ZEC 8:13 | शिव्या शाप देण्यासाठी लोकांनी इस्राएल व यहूदाच्या नावाचा वापर करण्यास सुरवात केली होती. पण मी इस्राएलाची व यहूदाची पापातून मुक्तता करीन त्यांची नावे आशीर्वादीत बनतील तेव्हा घाबरू नका! तुमचे हात दृढ ठेवा!” |
23134 | ZEC 13:6 | पण इतर लोक त्यास विचारतील, ‘मग तुझ्या हातावर जखमा कसल्या?’ तेव्हा तो उत्तर देईल, ‘मित्राच्या घरात मला लागलेल्या माराचे हे वण होत!” |
23763 | MAT 16:22 | तेव्हा पेत्राने त्यास एकाबाजूला घेऊन निषेध करून म्हटले, “प्रभू, तुझ्यापासून हे दूर असो. असे तुला कधीही होणारच नाही!” |
23883 | MAT 20:22 | तो तिला म्हणाला, “तू काय मागत आहेस ते तुला समजत नाही! जो प्याला मी पिणार आहे तो तुम्हास पिता येईल काय?” ते म्हणाले, होय, “पिता येईल!” |
23904 | MAT 21:9 | येशूच्या पुढे चालणारा लोकसुदाय आणि मागे चालणारे. मोठ्याने जयघोष करू लागले, “दाविदाच्या पुत्राला होसान्ना. प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित आहे. परम उंचामध्ये होसान्ना!” |
23914 | MAT 21:19 | रस्त्याच्या कडेला त्यास अंजिराचे एक झाड दिसले. ते पाहून तो जवळ गेला. पण पानाशिवाय त्यास एकही अंजीर दिसले नाही. येशू त्या झाडाला म्हणाला, “यापुढे तुला, कधीही फळ न येवो!” आणि ते झाड लगेच वाळून गेले. |
24195 | MAT 26:72 | पुन्हा एकदा पेत्र शपथ घेऊन येशूला नाकारून, म्हणाला, “मी त्यास ओळखत नाही!” |
24197 | MAT 26:74 | मग तो स्वतःला शाप देऊ लागला. तो जोराने म्हणाला, “मी देवाशपथ सांगतो, येशू हा मनुष्य कोण आहे हे मला माहीत नाही!” पेत्र असे म्हणाला तोच कोंबडा आरवला. |
24202 | MAT 27:4 | तो म्हणाला, “मी निर्दोष रक्ताला धरून देऊन पाप केले आहे” यहूदी पुढाऱ्यांनी उत्तर दिले, “आम्हास त्याचे काय? तो तुझा प्रश्न आहे!” |
24220 | MAT 27:22 | पिलाताने विचारले, “मग ज्याला ख्रिस्त म्हणतात त्या येशूचे मी काय करावे?” सर्व लोक ओरडून म्हणाले, “त्याला वधस्तंभावर खिळून मारून टाका!” |
24221 | MAT 27:23 | आणि तो म्हणाला, “का? त्याने काय अपराध केला आहे?” परंतु सर्व लोक मोठ्याने ओरडून म्हणू लागले, “त्याला वधस्तंभावर खिळा!” |
24227 | MAT 27:29 | मग एक काट्यांचा मुकुट तयार करून तो त्याच्या डोक्यावर ठेवला. तसेच त्यांनी त्याच्या उजव्या हातात एक वेत दिला. मग शिपाई त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याची थट्टा करून म्हणू लागले, “यहूद्यांचा राजा चिरायू होवो!” |
24273 | MAT 28:9 | मग पाहा; येशू त्यांना भेटला आणि तो त्यांना म्हणाला, “शांती असो!” त्या त्याच्याजवळ आल्या. त्यांनी त्याचे पाय धरले आणि त्यास नमन केले. |
24311 | MRK 1:27 | लोक आश्चर्यचकित झाले व एकमेकांस विचारू लागले, “येथे काय चालले आहे? हा मनुष्य काहीतरी नवीन आणि अधिकाराने शिकवीत आहे. तो अशुद्ध आत्म्यांनाही आज्ञा करतो आणि ते त्याचे ऐकतात!” |
24368 | MRK 3:11 | जेव्हा अशुद्ध आत्मे येशूला पाहत तेव्हा ते त्याच्यासमोर खाली पडून मोठ्याने ओरडत की, “तू देवाचा पुत्र आहेस!” |
24894 | MRK 14:71 | पेत्र निर्भत्सना करीत व शपथ वाहून म्हणाला, “तुम्ही ज्या मनुष्याविषयी बोलत आहात त्यास मी ओळखत नाही!” |
25167 | LUK 4:35 | येशूने त्यास धमकावून म्हटले, “शांत राहा आणि त्याच्यातून नीघ!” तेव्हा त्या अशुद्ध आत्म्याने त्या मनुष्यास जमिनीवर खाली पाडले व त्या मनुष्यास काहीही इजा न करता तो त्याच्यातून बाहेर निघाला. |
25189 | LUK 5:13 | तेव्हा येशूने आपला हात लांब करून त्यास स्पर्श केला आणि म्हटले, “माझी इच्छा आहे शुद्ध हो!” आणि ताबडतोब त्याचे कुष्ठ नाहीसे झाले. |
25203 | LUK 5:27 | या गोष्टी झाल्यानंतर येशू बाहेर गेला आणि त्याने लेवी नावाच्या जकातदाराला जकात नाक्यावर बसलेले पाहिले, येशू त्यास म्हणाला, “माझ्यामागे ये!” |
25278 | LUK 7:14 | मग जवळ जाऊन त्याने तिरडीस स्पर्श केला; तेव्हा खांदेकरी स्थिर उभे राहीले आणि तो म्हणाला, “मुला, मी तुला सांगतो, उठ!” |