Wildebeest analysis examples for:   mar-mar   ?    February 11, 2023 at 19:02    Script wb_pprint_html.py   by Ulf Hermjakob

57  GEN 3:1  परमेश्वर देवाने निर्माण केलेल्या सर्व वनपशूंमध्ये सर्प हा अतिशय धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, “‘बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नका’ असे देवाने तुम्हास खरोखरच सांगितले आहे काय?
65  GEN 3:9  तेव्हा परमेश्वर देवाने मनुष्यास हाक मारुन म्हटले, “तू कोठे आहेस?
67  GEN 3:11  परमेश्वर त्यास म्हणाला, “तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा दिली होती त्या झाडाचे फळ तू खाल्लेस काय?
69  GEN 3:13  मग परमेश्वर देव त्या स्त्रीस म्हणाला, “तू हे काय केलेस?ती स्त्री म्हणाली, “सर्पाने मला फसवले व म्हणून मी ते फळ खाल्ले.”
86  GEN 4:6  परमेश्वर काइनाला म्हणाला, “तू का रागावलास? तुझा चेहरा का उतरला आहे?
87  GEN 4:7  तू जर चांगल्या गोष्टी करशील तर, मग तुझाही स्विकार केला जाणार नाही का? परंतु तू जर योग्य ते करणार नाहीस, तर पाप दाराशी टपून बसले आहे आणि त्याची तुझ्यावर ताबा मिळवण्याची इच्छा आहे, परंतु तू त्यावर नियंत्रण केले पाहिजेस.”
89  GEN 4:9  परमेश्वर काइनास म्हणाला, “तुझा भाऊ हाबेल कोठे आहे?काइनाने उत्तर दिले, “मला माहीत नाही; मी माझ्या भावाचा राखणदार आहे काय?
90  GEN 4:10  देव म्हणाला, “तू हे काय केलेस? तुझ्या भावाच्या रक्ताची वाणी जमिनीतून शिक्षेसाठी ओरड करत आहे.
317  GEN 12:18  तेव्हा फारोने अब्रामास बोलावले. तो म्हणाला, “तू हे माझ्याबाबत का केलेस? साराय तुझी पत्नी आहे हे तू मला का सांगितले नाहीस?
318  GEN 12:19  ती माझी बहीण आहे असे तू का म्हणालास? मला पत्नी करण्यासाठी मी तिला नेले होते, परंतु मी आता तुझी पत्नी तुला परत करतो, तिला घेऊन जा.”
328  GEN 13:9  तुझ्यापुढे सर्व देश नाही काय? पुढे जा आणि माझ्यापासून तू वेगळा हो. तू जर डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन, आणि तू जर उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन.”
363  GEN 15:2  अब्राम म्हणाला, “हे प्रभू परमेश्वरा, मी अजून निपुत्रिक आहे, आणि माझ्या घराचा वारस दिमिष्क शहरातील अलिएजर हाच होईल, तेव्हा तू मला काय देणार?
369  GEN 15:8  तो त्यास म्हणाला, “हे प्रभू परमेश्वरा मला हे वतन मिळेल हे मी कशावरून समजू?
390  GEN 16:8  देवदूत तिला म्हणाला, “सारायचे दासी हागारे, तू येथे का आलीस? तू कोठे जात आहेस?हागार म्हणाली, “माझी मालकीण साराय हिच्यापासून मी पळून जात आहे.”
395  GEN 16:13  नंतर तिच्याशी बोलणारा जो परमेश्वर त्याचे नाव, “तू पाहणारा देव आहेस,” असे तिने ठेवले, कारण ती म्हणाली, “जो मला पाहतो त्यास मी येथेही मागून पाहिले काय?
415  GEN 17:17  अब्राहामाने देवाला लवून नमन केले आणि तो हसला, तो मनात म्हणाला, “शंभर वर्षांच्या मनुष्यास मुलगा होणे शक्य आहे का? आणि सारा, जी नव्वद वर्षांची आहे, तिला मुलगा होऊ शकेल का?
434  GEN 18:9  ते त्यास म्हणाले, “तुझी पत्नी सारा कोठे आहे?त्याने उत्तर दिले, “तेथे ती तंबूत आहे.”
437  GEN 18:12  म्हणून सारा स्वतःशीच हसून म्हणाली, “मी म्हातारी झाली आहे, आणि माझा पतीही म्हातारा झाला आहे, आता मला ते सुख लाभेल काय?
438  GEN 18:13  परमेश्वर अब्राहामाला म्हणाला, “सारा का हसली? मी आता इतकी म्हातारी झाली असताना मला मुलगा होईल काय, असे ती का म्हणाली?
439  GEN 18:14  परमेश्वरास काही अशक्य आहे काय? येत्या वसंतऋमध्ये, सांगितल्याप्रमाणे मी पुन्हा येईन. पुढील वर्षी साधारण याच वेळी सारा हिला मुलगा होईल.”
442  GEN 18:17  परमेश्वर देव म्हणाला, “मी जे काही करणार आहे ते अब्राहामापासून लपवू काय?
448  GEN 18:23  मग अब्राहाम परमेश्वराजवळ जाऊन म्हणाला, “तू दुष्टाबरोबर नीतिमानांचाही नाश करशील काय?
449  GEN 18:24  कदाचित त्या नगरात पन्नास नीतिमान लोक असतील तर त्या नगराचा तू नाश करणार काय? तू त्या नगरात राहणाऱ्या पन्नास नीतिमान लोकांसाठी नगराचा बचाव करणार नाहीस काय?
450  GEN 18:25  असे करणे तुझ्यापासून दूर असो. दुष्टाबरोबर नीतिमानाला मारणे म्हणजे नीतिमानाला दुष्टासारखे वागवणे हे तुझ्यापासून दूर असो! जो तू संपूर्ण पृथ्वीचा न्यायाधीश आहेस, तो तू योग्य न्याय करणार नाहीस काय?
453  GEN 18:28  समजा जर पाच लोक कमी असतील म्हणजे फक्त पंचेचाळीसच चांगले लोक असतील तर? त्या पाच कमी असलेल्या लोकांकरता तू सर्व नगराचा नाश करशील काय?आणि तो म्हणाला, “मला पंचेचाळीस लोक चांगले आढळले तर मी नगराचा नाश करणार नाही.”
454  GEN 18:29  पुन्हा तो परमेश्वरास म्हणाला, “आणि जर तेथे तुला चाळीसच चांगले लोक आढळले तर? संपूर्ण शहराचा तू नाश करशील काय?परमेश्वर म्हणाला, “जर मला चाळीसच लोक चांगले आढळले तरीही, मी शहराचा नाश करणार नाही.”
455  GEN 18:30  तो म्हणाला, “प्रभू, कृपा करून तुला राग न यावा म्हणजे मी बोलेन. तेथे फक्त तीसच मिळाले तर?परमेश्वर म्हणाला, “जर तीस चांगले लोक असतील तरीही मी तसे करणार नाही.”
456  GEN 18:31  तो म्हणाला, “मी प्रभूशी बोलायला धजतो! समजा तेथे कदचित वीसच मिळाले तर?परमेश्वराने उत्तर दिले, “त्या वीसांकरताही मी नगराचा नाश करणार नाही.”
457  GEN 18:32  शेवटी तो म्हणाला, “प्रभू, कृपा करून माझ्यावर रागावू नकोस, मी शेवटी एकदाच बोलतो. कदाचित तुला तेथे दहाच लोक मिळाले तर?परमेश्वर म्हणाला, “त्या दहांकरताही मी नगराचा नाश करणार नाही.”
463  GEN 19:5  त्यांनी लोटाला हाक मारून म्हटले “आज रात्री तुझ्याकडे आलेली माणसे कोठे आहेत? त्यांना आमच्याकडे बाहेर आण; म्हणजे आम्ही त्यांच्याशी समागम करू.”
470  GEN 19:12  मग ते पुरुष लोटाला म्हणाले, “तुझे दुसरे कोणी येथे आहे काय? जावई, तुझी मुले, तुझ्या मुली आणि तुझे जे कोणी या नगरात आहेत त्यांना येथून बाहेर काढ.
478  GEN 19:20  पाहा, पळून जाण्यासाठी हे नगर जवळ आहे, आणि ते लहान आहे, कृपा करून मला तिकडे पळून जाऊ दे, ते लहान नाही काय? म्हणजे माझा जीव वाचेल.”
500  GEN 20:4  परंतु अबीमलेख तिच्याजवळ गेला नव्हता. तो म्हणाला, “प्रभू, तू नीतिमान राष्ट्राचाही नाश करणार काय?
501  GEN 20:5  ‘ती माझी बहीण आहे,’ असे तो स्वतःच मला म्हणाला नाही काय? आणि ‘तो माझा भाऊ आहे,’ असे तिनेही म्हटले. मी आपल्या अंतःकरणाच्या शुद्धपणाने आणि आपल्या हाताच्या निर्दोषतेने हे केले आहे.”
505  GEN 20:9  मग अबीमलेखाने अब्राहामास बोलावून त्यास म्हटले, “तू हे आम्हांला काय केले? मी तुझ्याविरूद्ध काय पाप केले की तू माझ्यावर आणि माझ्या राष्ट्रावर असे मोठे पाप आणले? तू माझ्याशी करू नये ते केले आहे अशा गोष्टी तू करायच्या नव्हत्या.”
506  GEN 20:10  अबीमलेख अब्राहामाला म्हणाला, “तुला हे करण्यास कोणी सुचवले?
521  GEN 21:7  आणखी ती असेही म्हणाली, “सारा या मुलाला स्तनपान देईल असे अब्राहामाला कोण म्हणाला असता? आणि तरीसुद्धा त्याच्या म्हातारपणात मला त्याच्यापासून मुलगा झाला आहे!”
531  GEN 21:17  देवाने मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकला आणि देवाचा दूत स्वर्गातून हागारेला हाक मारून म्हणाला, “हागारे, तुला काय झाले? भिऊ नकोस, तुझा मुलगा जेथे आहे तेथून त्याचा आवाज देवाने ऐकला आहे
543  GEN 21:29  अबीमलेख अब्राहामाला म्हणाला, “ही सात कोकरे तू वेगळी करून ठेवली याचा अर्थ काय आहे?
555  GEN 22:7  इसहाक आपल्या पित्याला म्हणाला, “माझ्या बाबा.” अब्राहामाने उत्तर दिले, “मी येथे आहे, माझ्या मुला.” इसहाक म्हणाला, “मला लाकडे व अग्नी दिसतात, परंतु होमार्पणासाठी कोकरू कोठे आहे?
587  GEN 23:15  “माझे स्वामी, कृपया माझे जरा ऐका. जमिनीचा हा एक तुकडा चारशे शेकेल रुपे किंमताचा, तो माझ्या व तुमच्यामध्ये एवढा काय आहे? तुमच्या मृताला पुरा.”
597  GEN 24:5  सेवक त्यास म्हणाला, “ती स्त्री जर माझ्याबरोबर या देशात येण्यास तयार झाली नाही तर? ज्या देशातून तुम्ही आला त्या देशात मी मुलाला घेऊन जावे काय?
615  GEN 24:23  आणि विचारले, “तू कोणाची मुलगी आहेस? तसेच तुझ्या वडिलाच्या घरी आम्हा सर्वांना रात्री मुक्काम करावयास जागा आहे का ते कृपा करून सांग.”
623  GEN 24:31  आणि लाबान त्यास म्हणाला, “परमेश्वराचा आशीर्वाद लाभलेले तुम्ही, आत या. तुम्ही बाहेर का उभे आहात? मी तुमच्यासाठी घर तयार केले आहे आणि उंटासाठीही जागा केली आहे.”
631  GEN 24:39  मी माझ्या धन्याला म्हणालो, ‘यदाकदाचित मुलगी माझ्याबरोबर येणार नाही?
639  GEN 24:47  मग मी तिला विचारले, “तू कोणाची मुलगी आहेस?ती म्हणाली, “नाहोरापासून मिल्केला झालेल्या बथुवेलाची मी मुलगी,” तेव्हा मग मी तिला सोन्याची नथ आणि हातात घालण्यासाठी सोन्याच्या दोन बांगडया दिल्या.
650  GEN 24:58  मग त्यांनी रिबकेला बोलावून तिला विचारले, “या मनुष्याबरोबर तू जातेस काय?तिने उत्तर दिले, “मी जाते.”
657  GEN 24:65  ती सेवकाला म्हणाली, “शेतातून आपल्याला भेटावयास सामोरा येत असलेला पुरुष कोण आहे?सेवकाने उत्तर दिले, “तो माझा धनी आहे.” तेव्हा तिने बुरखा घेतला आणि स्वतःला झाकून घेतले.
681  GEN 25:22  मुले तिच्या उदरात एकमेकांशी झगडू लागली, तेव्हा ती म्हणाली, “मला हे काय होत आहे?ती परमेश्वरास याबद्दल विचारायला गेली.
691  GEN 25:32  एसाव म्हणाला, “पाहा, मी मरायला लागलो आहे. या ज्येष्ठपणाच्या हक्काचा मला काय उपयोग आहे?
702  GEN 26:9  अबीमलेखाने इसहाकाला बोलावले आणि म्हणाला, “पाहा नक्कीच ही तुझी पत्नी आहे. मग, ‘ती तुझी बहीण आहे’ असे तू का सांगितलेस?इसहाक त्यास म्हणाला, “कारण मला वाटले की, तिला मिळविण्यासाठी कोणीही मला मारून टाकेल.”
703  GEN 26:10  अबीमलेख म्हणाला, “तू आम्हांला हे काय केलेस? कारण आमच्या लोकांतून कोणीही तुझ्या पत्नीबरोबर सहज लैंगिक संबंध केला असता, आणि त्यामुळे तू आमच्यावर दोष आणला असतास.”
720  GEN 26:27  इसहाकाने त्यांना विचारले, “तुम्ही माझा द्वेष करता व मला तुम्ही आपणापासून दूर केलेत; तर आता तुम्ही माझ्याकडे का आलात?
729  GEN 27:1  जेव्हा इसहाक म्हातारा झाला आणि त्याची नजर मंद झाल्यामुळे त्यास दिसेनासे झाले तेव्हा त्याने आपला वडील मुलगा एसाव याला बोलावून म्हटले, “माझ्या मुला.” तो म्हणाला, “काय बाबा?
746  GEN 27:18  ते घेऊन याकोब आपल्या बापाकडे गेला आणि म्हणाला, “माझ्या बापा” तो म्हणाला, “मी येथे आहे, माझ्या मुला तू कोण आहेस?
748  GEN 27:20  इसहाक आपल्या मुलाला म्हणाला, “माझ्या मुला एवढ्या लवकर तुला शिकार कशी काय मिळाली?याकोब म्हणाला, “कारण तुमचा देव परमेश्वराने मला मिळवून दिली.”
752  GEN 27:24  तो म्हणाला, “तू खरेच माझा मुलगा एसावच आहेस काय?आणि तो म्हणाला, “मी आहे.”
760  GEN 27:32  इसहाक त्याचा बाप त्यास म्हणाला, “तू कोण आहेस?तो म्हणाला, “मी तुमचा मुलगा वडील मुलगा एसाव आहे.”
761  GEN 27:33  मग इसहाक भीतीने थरथर कापत म्हणाला, “तर मग तू येण्या अगोदर ज्याने मांस तयार करून मला आणून दिले तो कोण होता? मी ते सर्व खाऊन त्यास आशीर्वाद दिला. खरोखर तो आशीर्वादित होईल.”
764  GEN 27:36  एसाव म्हणाला, “त्याचे याकोब हे नाव त्यास योग्यच आहे की नाही? त्याने माझी दोनदा फसवणूक केली आहे. त्याने माझा ज्येष्ठपणाचा हक्क हिरावून घेतला आणि आता त्याने माझा आशीर्वादही काढून घेतला आहे.” आणि एसाव म्हणाला, “माझ्याकरिता तुम्ही काही आशीर्वाद राखून ठेवला नाही काय?
766  GEN 27:38  एसाव आपल्या बापाला म्हणाला, “माझ्या बापा, माझ्यासाठी तुमच्याकडे एकही आशीर्वाद नाही काय? माझ्या बापा मलाही आशीर्वाद द्या.” एसाव मोठ्याने रडला!
773  GEN 27:45  तुझ्यावरून तुझ्या भावाचा राग निघून जाईल, आणि तू त्यास काय केले हे तो विसरेल. मग मी तुला तेथून बोलावून घेईन. एकाच दिवशी मी तुम्हा दोघांनाही का अंतरावे?
774  GEN 27:46  मग रिबका इसहाकाला म्हणाली, “हेथीच्या मुलींमुळे मला जीव नकोसा झाला आहे. याकोबाने जर या देशाच्या मुली करून हेथाच्या लोकांतून पत्नी केली तर माझ्या जगण्याचा काय उपयोग?
800  GEN 29:4  याकोब त्यांना म्हणाला, “माझ्या बंधूंनो, तुम्ही कोठून आलात?ते म्हणाले, “आम्ही हारान प्रदेशाहून आलो आहोत.”
801  GEN 29:5  मग तो त्यांना म्हणाला, “नाहोराचा नातू लाबान याला तुम्ही ओळखता का?ते म्हणाले, “होय, आम्ही त्यास ओळखतो.”
802  GEN 29:6  याकोबाने त्यांना विचारले, “तो बरा आहे काय?त्यांनी उत्तर दिले, “तो बरा आहे आणि ती पाहा त्याची मुलगी राहेल मेंढरे घेऊन इकडे येत आहे.”
811  GEN 29:15  लाबान याकोबाला म्हणाला, “तू काही मोबदला न घेता काम करीत राहावेस काय? कारण तू माझा नातलग आहेस तर तुला मी काय वेतन द्यावे ते सांग?
821  GEN 29:25  सकाळी याकोबाने पाहिले तो पाहा, ती लेआ होती. मग याकोब लाबानाला म्हणाला, “तुम्ही मला हे काय केले आहे? मी राहेलीसाठी तुमची चाकरी केली नाही काय? तुम्ही मला का फसवले?
833  GEN 30:2  याकोबाचा राहेलवर राग भडकला. तो म्हणाला, “ज्याने तुला मुल होण्यापासून रोखून धरले आहे, त्या देवाच्या ठिकाणी मी आहे की काय?
846  GEN 30:15  लेआ तिला म्हणाली, “तू माझ्या नवऱ्याला माझ्यापासून घेतलेस हे काय कमी झाले? आता माझ्या मुलाची पुत्रदात्रीची फळेही तू घेतेस काय?राहेल म्हणाली, “तुझ्या मुलाची पुत्रदात्रीची फळे मला देशील तर त्याच्या बदल्यात आज रात्री तो तुझ्याबरोबर झोपेल.”
861  GEN 30:30  मी येण्यापूर्वी तुम्हापाशी फार थोडी होती. आणि आता भरपूर वाढली आहेत. मी जेथे जेथे काम केले तेथे तेथे परमेश्वराने तुम्हास आशीर्वादित केले आहे. आता मी माझ्या स्वतःच्या घराची तरतूद कधी करू?
862  GEN 30:31  म्हणून लाबान म्हणाला, “मी तुला काय देऊ?याकोब म्हणाला, “तुम्ही मला काही देऊ नका. जर तुम्ही माझ्यासाठी ही गोष्ट कराल तर मी पूर्वीप्रमाणे आपले कळप चारीन व सांभाळीन.
885  GEN 31:11  देवाचा दूत मला स्वप्नात म्हणाला, “याकोबा,” मी म्हणालो, “काय आज्ञा आहे?
889  GEN 31:15  आम्ही परक्या असल्यासारखे त्याने आम्हांला वागवले नाही काय? त्याने आम्हास तुम्हास विकून टाकले, आणि आमचे पूर्ण पैसे खाऊन टाकले आहेत.
900  GEN 31:26  लाबान याकोबाला म्हणाला, “तू मला हे काय केले? तू मला फसवलेस. आणि युद्धकैदी केलेल्या स्त्रियांप्रमाणे तू माझ्या मुलींना का घेऊन आलास?
901  GEN 31:27  तू मला न सांगता का पळून गेलास? मला का फसवले? तू मला सांगितले नाही. मी तर उत्सव करून आणि गाणी, डफ व वीणा वाजवून तुला पाठवले असते.
904  GEN 31:30  तुला तुझ्या वडिलाच्या घरी जायचे आहे हे मला माहीत आहे आणि म्हणूनच तू जाण्यास निघालास, परंतु तू माझ्या घरातील कुलदेवता का चोरल्यास?
910  GEN 31:36  मग याकोबाला राग आला आणि त्याने लाबानाशी वाद केला, तो त्यास म्हणाला, “माझा गुन्हा काय आहे? माझे पाप कोणते आहे, म्हणून तुम्ही माझा रागाने पाठलाग केलात?
911  GEN 31:37  माझ्या मालकीच्या सर्व चीजवस्तू तुम्ही शोधून पाहिल्या आहेत. तुम्हास तुमच्या मालकीची एकतरी चीजवस्तू आढळली का? जर तुम्हास तुमचे काही मिळाले असेल तर ते आपल्या नातलगासमोर ठेवा. यासाठी की ते आपल्या दोघांचा न्याय करतील.
917  GEN 31:43  लाबानाने उत्तर दिले आणि तो याकोबाला म्हणाला, “या मुली माझ्या मुली आहेत आणि ही नातवंडे माझी नातवंडे आहेत आणि हे कळप माझे कळप आहेत. जे काही तू पाहतोस ते सर्व माझे आहे. परंतु आज मी या मुलींसाठी किंवा त्यांच्या मुलांसाठी ज्यांना त्यांनी जन्म दिला त्यांना मी काय करू शकतो?
946  GEN 32:18  याकोबाने कळपाच्या पहिल्या टोळीच्या चाकराला आज्ञा देऊन तो म्हणाला, “जेव्हा माझा भाऊ एसाव तुझ्याकडे येईल व विचारील, ‘ही कोणाची जनावरे आहेत? तू कोठे चाललास? तू कोणाचा नोकर आहेस?
956  GEN 32:28  तो पुरुष त्यास म्हणाला, “तुझे नाव काय आहे?आणि याकोब म्हणाला, “माझे नाव याकोब आहे.”
958  GEN 32:30  मग याकोबाने त्यास विचारले, “कृपया तुझे नाव मला सांग.” परंतु तो पुरुष म्हणाला, “तू माझे नाव का विचारतोस?त्या वेळी तेथेच त्या पुरुषाने याकोबाला आशीर्वाद दिला.
966  GEN 33:5  एसावाने आपल्या समोरील स्त्रिया व मुले पाहून विचारले, “तुझ्याबरोबर ही कोण मंडळी आहे?याकोबाने उत्तर दिले, “तुझ्या सेवकाला ही मुले देऊन देवाने माझे कल्याण केले आहे.”
969  GEN 33:8  एसावाने विचारले, “इकडे येताना मला भेटलेल्या सर्व टोळ्यांचा अर्थ काय आहे?याकोबाने उत्तर दिले, “माझ्या धन्याच्या दृष्टीने मला कृपा मिळावी म्हणून.”
976  GEN 33:15  तेव्हा एसाव म्हणाला, “मग मी माझ्या मनुष्यातून काही माणसे तुला मदत करण्यासाठी मागे ठेवतो.” परंतु याकोब म्हणाला, “तसे कशाला? माझ्या धन्याची आधीच माझ्यावर पुरेशी कृपा झालेली आहे.”
1004  GEN 34:23  जर हे आपण करू तर मग त्यांची सर्व शेरडेमेंढरे गुरेढोरे व संपत्ती आपलीच होणार नाहीत काय? म्हणून आपण त्यांच्याशी सहमत होऊ, आणि मग ते आपल्या बरोबर येथेच वस्ती करून राहतील.”
1012  GEN 34:31  परंतु शिमोन आणि लेवी म्हणाले, “शखेमाने आमच्या बहिणीशी वेश्येशी वागतात तसे वागावे काय?
1092  GEN 37:8  हे ऐकून त्याचे भाऊ त्यास म्हणाले, “तू आमचा राजा होऊन आमच्यावर राज्य करणार काय? आणि खरोखर तू आम्हावर अधिकार करशील काय?त्याच्या या स्वप्नामुळे व त्याच्या बोलण्यामुळे तर त्याचे भाऊ त्याचा अधिकच द्वेष करू लागले.
1094  GEN 37:10  त्याने आपल्या पित्यासही या स्वप्नाविषयी सांगितले. परंतु त्याच्या वडिलाने त्यास दोष देऊन म्हटले, “असले कसले हे स्वप्न आहे? तुझी आई, तुझे भाऊ व मी आम्ही भूमीपर्यंत लवून तुला नमन करू काय?
1097  GEN 37:13  इस्राएल योसेफाला म्हणाला, “तुझे भाऊ शखेम येथे आपली मेंढरे चारावयास गेले आहेत ना? चल, मी तुला तेथे पाठवत आहे.” योसेफ त्यास म्हणाला, “मी तयार आहे.”
1098  GEN 37:14  तो त्यास म्हणाला, “आता जा आणि तुझे भाऊ व माझी मेंढरे ठीक आहेत सुखरुप आहेत का? ते पाहा व मला त्यांच्यासंबंधी बातमी घेऊन ये.” अशा रीतीने याकोबाने त्यास हेब्रोनातून शखेमास पाठवले आणि योसेफ शखेमास गेला.
1099  GEN 37:15  योसेफ शेतात भटकत होता. पाहा, तो कोणा मनुष्यास दिसला. त्या मनुष्याने त्यास विचारले, “तू काय शोधत आहेस?
1100  GEN 37:16  योसेफ म्हणाला, “मी माझ्या भावांना शोधत आहे, ते कोठे कळप चारीत आहेत, हे कृपा करून मला सांगता का?
1110  GEN 37:26  तेव्हा यहूदा त्याच्या भावांना म्हणाला, “आपल्या भावाला ठार मारून आणि त्याचा खून लपवून ठेवून आपल्याला काय फायदा?
1114  GEN 37:30  तो भावांकडे येऊन म्हणाला, “मुलगा कोठे आहे? आणि मी, आता मी कोठे जाऊ?
1136  GEN 38:16  तेव्हा यहूदा तिच्याजवळ जाऊन म्हणाला, “मला तुझ्यापाशी निजू दे.” ती आपली सून आहे हे यहूदाला माहीत नव्हते. ती म्हणाली, “तुम्ही मला त्याबद्दल काय मोबदला द्याल?
1137  GEN 38:17  यहूदा म्हणाला, “मी तुला माझ्या कळपातून एक करडू पाठवून देईन.” ती म्हणाली, “परंतु ते पाठवून देईपर्यंत तुम्ही माझ्याजवळ काय गहाण ठेवाल?
1138  GEN 38:18  यहूदा म्हणाला, “गहाण म्हणून मी तुझ्याकडे काय ठेवू?तामार म्हणाली, “तुम्ही अंगठी, गोफ व हातातली काठी मला द्या.” तेव्हा यहूदाने त्या वस्तू तिला दिल्या. मग तो तिजपाशी जाऊन निजला. त्याच्यापासून ती गरोदर राहिली.
1141  GEN 38:21  मग अदुल्लामकराने तेथील काही लोकांस विचारले, “येथे या एनाईमाच्या रस्त्यावर एक वेश्या होती ती कोठे आहे?तेव्हा लोकांनी उत्तर दिले, “येथे कधीच कोणीही वेश्या नव्हती.”