57 | GEN 3:1 | परमेश्वर देवाने निर्माण केलेल्या सर्व वनपशूंमध्ये सर्प हा अतिशय धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, “‘बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नका’ असे देवाने तुम्हास खरोखरच सांगितले आहे काय?” |
360 | GEN 14:23 | तुझा दोरा, चपलेचा बंध, किंवा जे तुझे आहे त्यातून मी काहीच घेणार नाही, नाहीतर तू म्हणशील, ‘अब्रामाला मी धनवान केले.’ |
501 | GEN 20:5 | ‘ती माझी बहीण आहे,’ असे तो स्वतःच मला म्हणाला नाही काय? आणि ‘तो माझा भाऊ आहे,’ असे तिनेही म्हटले. मी आपल्या अंतःकरणाच्या शुद्धपणाने आणि आपल्या हाताच्या निर्दोषतेने हे केले आहे.” |
509 | GEN 20:13 | देवाने मला माझ्या बापाचे घर सोडून देऊन जागोजागी प्रवास करायला लावले, तेव्हा मी तिला म्हणालो, तू माझी पत्नी म्हणून मला एवढा विश्वासूपणा दाखव; जेथे जेथे आपण जाऊ तेथे तेथे माझ्याविषयी हा, ‘माझा भाऊ आहे असे सांग.’” |
599 | GEN 24:7 | आकाशाचा देव परमेश्वर, ज्याने मला माझ्या वडिलाच्या घरातून व माझ्या नातेवाइकांच्या देशातून मला आणले व ज्याने बोलून, ‘मी हा देश तुझ्या संततीला देईन,’ असे शपथपूर्वक अभिवचन दिले, तो परमेश्वर आपल्या दूताला तुझ्या पुढे पाठवील, आणि तू तेथून माझ्या मुलासाठी पत्नी आणशील. |
606 | GEN 24:14 | तर असे घडू दे की, मी ज्या मुलीस म्हणेन, ‘मुली तुझी पाण्याची घागर उतरून मला प्यायला पाणी दे,’ आणि ती जर ‘तुम्ही प्या, आणि मी तुमच्या उंटांनाही पाणी पाजते,’ तर मग तीच तुझा सेवक इसहाक ह्याच्यासाठी तू नेमलेली असू दे. त्यावरून मी असे समजेन की, तू माझ्या धन्यासोबत करार पाळण्याचा प्रामाणिकपणा दाखवला आहे.” |
630 | GEN 24:38 | त्याऐवजी माझ्या वडिलाच्या परिवाराकडे जा, आणि माझ्या नातलगांकडे जा व तेथून माझ्या मुलासाठी तू पत्नी मिळवून आण.’ |
631 | GEN 24:39 | मी माझ्या धन्याला म्हणालो, ‘यदाकदाचित मुलगी माझ्याबरोबर येणार नाही?’ |
633 | GEN 24:41 | परंतु जेव्हा तू माझ्या नातलगांमध्ये जाशील आणि जर त्यांनी तुला ती दिली नाही, तर मग तू माझ्या शपथेतून मोकळा होशील.’ |
702 | GEN 26:9 | अबीमलेखाने इसहाकाला बोलावले आणि म्हणाला, “पाहा नक्कीच ही तुझी पत्नी आहे. मग, ‘ती तुझी बहीण आहे’ असे तू का सांगितलेस?” इसहाक त्यास म्हणाला, “कारण मला वाटले की, तिला मिळविण्यासाठी कोणीही मला मारून टाकेल.” |
735 | GEN 27:7 | ‘माझ्यासाठी शिकार घेऊन ये आणि त्याचे रुचकर जेवण करून माझ्याकडे घेऊन ये म्हणजे मी ते खाईन आणि माझ्या मरण्यापूर्वी परमेश्वराच्या उपस्थितीत तुला आशीर्वाद देईन.’ |
887 | GEN 31:13 | बेथेलचा मी देव आहे. जेथे तू एका स्मारकस्तंभास अभिषेक केलास, जेथे नवस करून तू मला वचन दिले, आणि आता तू हा देश सोड आणि आपल्या जन्मभूमीस परत जा.’” |
903 | GEN 31:29 | खरे तर अपाय करण्याची माझ्यात ताकद आहे, परंतु काल रात्री तुझ्या बापाचा देव माझ्या स्वप्नात बोलला आणि म्हणाला, ‘तू याकोबाला बरे किंवा वाईट बोलू नको म्हणून काळजी घे.’ |
934 | GEN 32:6 | माझ्यापाशी पुष्कळ गाई-गुरे, गाढवे, शेरडामेंढरांचे कळप आणि दास व दासी आहेत. आपली कृपादृष्टी माझ्यावर व्हावी म्हणून मी आपल्या धन्याला हा निरोप पाठवीत आहे.’” |
941 | GEN 32:13 | परंतु तू मला म्हणालास की, ‘मी नक्कीच तुझी भरभराट करीन. मी तुझी संतती वाढवीन आणि जिची गणना करता येणार नाही, अशी समुद्राच्या वाळूइतकी ती करीन.’” |
946 | GEN 32:18 | याकोबाने कळपाच्या पहिल्या टोळीच्या चाकराला आज्ञा देऊन तो म्हणाला, “जेव्हा माझा भाऊ एसाव तुझ्याकडे येईल व विचारील, ‘ही कोणाची जनावरे आहेत? तू कोठे चाललास? तू कोणाचा नोकर आहेस?’ |
947 | GEN 32:19 | तेव्हा तू त्यास असे उत्तर दे, ‘ही जनावरे आपला सेवक याकोब याच्या मालकीची आहेत. त्याने ही माझा धनी एसाव याला भेट म्हणून पाठवली आहेत. आणि पाहा, तो आमच्या पाठोपाठ येत आहे.’” |
1142 | GEN 38:22 | तेव्हा यहूदाचा मित्र त्याच्याकडे परत गेला व म्हणाला, “ती वेश्या मला काही सापडली नाही, तेथे राहणारे लोक म्हणाले की, ‘तेथे कोणीही वेश्या कधीच नव्हती.’” |
1275 | GEN 42:22 | मग रऊबेन त्यांना म्हणाला, “मी तुम्हास म्हणत नव्हतो का की, ‘मुलाविरूद्ध पाप करू नका,’ परंतु तुम्ही ते ऐकले नाही. आता पाहा, त्याचे रक्त तुमच्यापासून मागितले जात आहे.” |
1285 | GEN 42:32 | आम्ही त्यास सांगितले की, ‘आम्ही बारा भाऊ एका मनुष्याचे पुत्र आहोत. आमच्यातला एक जिवंत नाही, आणि तसेच धाकटा भाऊ कनान देशात आज आमच्या पित्याजवळ असतो.’ |
1287 | GEN 42:34 | आणि नंतर तुम्ही तुमच्या धाकट्या भावाला येथे माझ्याकडे घेऊन या. मग तुम्ही खरेच प्रामाणिक माणसे आहात हे मला पटेल. तुम्ही जर खरे बोलत असाल तर मग मी तुमचा भाऊ परत तुमच्या हवाली करीन आणि तुम्ही देशात व्यापार कराल.’” |
1294 | GEN 43:3 | परंतु यहूदा त्यास म्हणाला, “त्या देशाच्या अधिकाऱ्याने आम्हांला ताकीद दिली. तो म्हणाला, ‘तुम्ही जर तुमच्या धाकट्या भावाला तुमच्या बरोबर माझ्याकडे आणले नाही तर तुम्ही माझे तोंडदेखील पाहणार नाही.’ |
1298 | GEN 43:7 | ते म्हणाले, “त्या मनुष्याने आमच्याविषयी व आपल्या परिवाराविषयी बारकाईने विचारपूस केली. त्याने आम्हांला विचारले, ‘तुमचा बाप अजून जिवंत आहे का? तुमचा आणखी दुसरा भाऊ आहे का?’ आम्ही तर त्याच्या या प्रश्नाप्रमाणे त्यास उत्तरे दिली. ‘तुम्ही आपल्या भावाला घेऊन या’ असे सांगेल, हे आम्हांला कुठे माहीत होते?” |
1330 | GEN 44:5 | हा प्याला खास माझा धनी पिण्याकरिता वापरतात. तसेच देवाला प्रश्न विचारण्याकरिता उपयोग करतात. हा प्याला चोरून तुम्ही फार वाईट केले आहे.’” |
1344 | GEN 44:19 | माझ्या धन्याने आपल्या सेवकाला विचारले होते, ‘तुम्हास बाप किंवा भाऊ आहे का?’ |
1346 | GEN 44:21 | आणि तुम्ही आपल्या सेवकांना म्हणाला, ‘मग त्यास माझ्याकडे घेऊन या. मला त्यास पाहावयाचे आहे.’ |
1348 | GEN 44:23 | परंतु आपण आम्हांला बजावून सांगितले, ‘तुम्ही तुमच्या धाकट्या भावाला घेऊन आलेच पाहिजे नाही, तर तुम्ही माझे तोंड पुन्हा पाहू शकणार नाही.’ |
1357 | GEN 44:32 | या मुलाबद्दल मी माझ्या पित्यास हमी दिली आहे. मी म्हटले, ‘जर मी त्यास तुमच्याकडे परत घेऊन आलो नाही तर मग जन्मभर मी तुमचा दोषी राहीन.’ |
1377 | GEN 45:18 | तसेच तुमचा बाप आणि तुमच्या घरची सर्व मंडळी यांना घेऊन माझ्याकडे या. तुम्हास रहावयास मिसरमधील सर्वांत उत्तम प्रदेश मी देईन आणि तुमच्या घरातील मंडळी, यांना आमच्या येथे असलेले उत्तम पदार्थ खावयास मिळतील.’ |
1379 | GEN 45:20 | तुमची मालमत्ता व जे काही असेल त्याची चिंता करू नका, कारण मिसर देशामधील जे उत्तम ते सर्व तुमचेच आहे.’” |
1419 | GEN 46:32 | माझ्या वडिलाच्या घरचे सर्वजण मेंढपाळ आहेत, ते त्यांची शेरडेमेंढरे व गुरेढोरे पाळत आले आहेत. ते त्यांची शेरडेमेंढरे, गुरेढोरे व त्यांचे तेथे जे काही होते ते सर्व घेऊन आले आहेत.’ |
1420 | GEN 46:33 | जेव्हा फारो राजा तुम्हास बोलावून विचारील, ‘तुम्ही काय काम धंदा करता?’ |
1421 | GEN 46:34 | तेव्हा तुम्ही असे सांगा, ‘आम्ही सर्व मेंढपाळ आहोत. हा आमचा पिढीजात धंदा आहे. आमच्या आधी आमचे वाडवडील हाच धंदा करीत होते.’ मग फारो तुम्हास गोशेन प्रांतात राहू देईल. मिसरी लोकांस मेंढपाळ आवडत नाहीत.” |
1456 | GEN 48:4 | देव म्हणाला, ‘मी तुला खूप संतती देईन व ती वाढवीन आणि मी तुला राष्ट्रांचा समुदाय करीन. आणि तुझ्यानंतर तुझ्या संतानाला हा देश कायमचा वतन म्हणून देईल.’ |
1472 | GEN 48:20 | त्या दिवशी इस्राएलाने त्या मुलांना या शब्दांत आशीर्वाद दिला, तो म्हणाला, “इस्राएल लोक आशीर्वाद देताना तुमची नावे उच्चारितील, ते म्हणतील, ‘देव तुम्हास एफ्राईमासारखा, मनश्शेसारखा आशीर्वाद देवो.’” |
1524 | GEN 50:17 | तो म्हणाला, ‘योसेफाला सांगा की, तुझ्या भावांनी तुझ्याशी जे वाईट वर्तन केले त्याबद्दल तू त्यांची क्षमा करावीस अशी मी विनंती करतो.’ तेव्हा हे योसेफा, आम्ही तुला अशी विनंती करतो की, आम्ही तुझ्याशी वाईट रीतीने वागलो त्याबद्दल कृपया तू आमची क्षमा कर. आम्ही देवाचे, तुझ्या वडिलाच्या देवाचे दास आहोत.” योसेफाचे भाऊ वरीलप्रमाणे बोलले त्यामुळे योसेफाला फार दुःख झाले व तो रडला. |
1593 | EXO 3:13 | मग मोशे देवाला म्हणाला, “परंतु मी जर इस्राएली लोकांकडे जाऊन म्हणालो, ‘तुमच्या पूर्वजांचा देव याने मला तुमच्याकडे पाठवले आहे’ तर मग ते लोक विचारतील ‘त्याचे नाव काय आहे?’ मग मी त्यांना काय सांगू?” |
1744 | EXO 9:1 | नंतर परमेश्वराने मोशेला फारोकडे जाऊन असे बोलण्यास सांगितले, “इब्र्यांचा देव परमेश्वर म्हणतो, ‘माझी उपासना करण्याकरिता माझ्या लोकांस जाऊ दे.’ |
2462 | EXO 32:23 | लोक मला म्हणाले, ‘मोशेने आम्हांला मिसर देशातून काढून बाहेर आणले; परंतु आता त्याचे काय झाले हे आम्हांला माहीत नाही; तेव्हा आमच्यापुढे चालतील असे देव तू आमच्यासाठी करून दे.’ |
2463 | EXO 32:24 | तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘जर तुमच्याकडे सोन्याची कुंडले असतील तर ती मला द्या.’ तेव्हा लोकांनी मला त्यांच्याकडील सोने दिले; मी सोने भट्टीत टाकले आणि तिच्यातून हे वासरू बाहेर आले.” |
2949 | LEV 8:31 | मोशे अहरोन व त्याचे पुत्र ह्याना म्हणाला, “मी सांगितल्याप्रमाणे, ‘अहरोन व त्याच्या मुलांनी हे मांस खावे;’ तेव्हा ही भाकरीची टोपली व याजकाच्या समर्पणासाठीचे हे मांस घ्या; दर्शनमंडपाच्या दारापाशी ते शिजवा आणि मी सांगितल्याप्रमाणे मांस व भाकर तेथेच खा. |
2981 | LEV 10:3 | मग मोशे अहरोनाला म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, ‘जे याजक माझ्याजवळ येतील. त्यांनी माझा मान राखलाच पाहिजे, मी पवित्र आहे हे त्यांना व सर्व लोकांस समजलेच पाहिजे. तेव्हा अहरोन, नादाब व अबीहू ह्यांच्या विषयी काहीही न बोलता गप्प राहिला.’” |
4947 | DEU 2:7 | तुमच्या हातच्या सर्व कार्यात तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास आशीर्वादीत केले आहे. तुमच्या या रानातील वाटचालीकडे त्याचे लक्ष आहे. गेली चाळीस वर्षे तुमचा देव परमेश्वर तुमच्या सोबत राहीला आहे. तुम्हास कशाचीही वाण पडली नाही.’ |
4949 | DEU 2:9 | परमेश्वर मला म्हणाला, ‘मवाबाला उपद्रव करू नका. त्यांच्याशी युद्धाचा प्रंसग आणू नका. त्यांच्यातली जमीन मी तुम्हास देणार नाही. कारण आर नगर मी लोटच्या वंशजांना इनाम दिले आहे.’” |
5918 | JOS 4:6 | म्हणजे हे तुमच्यामध्ये चिन्हादाखल होईल, पुढच्या येणाऱ्या दिवसात जेव्हा तुमची मुले तुम्हाला विचारतील की, ‘या धोंड्यांचा अर्थ काय आहे?’ |
5933 | JOS 4:21 | तो इस्राएल लोकांस म्हणाला की, “पुढे जेव्हा तुमची मुलेबाळे आपल्या वडिलांना विचारतील, ‘या धोंड्यांचा अर्थ काय आहे?’ |
6010 | JOS 8:6 | असे आम्ही त्यांना पळवीत नगराबाहेर दूर नेईपर्यंत ते आमच्या पाठीस लागतील, कारण त्यांना वाटेल, ‘पहिल्याप्रमाणेच आपल्याला घाबरून हे पळ काढीत आहेत.’ याप्रमाणे आम्ही त्यांच्यापुढे पळायला लागू; |
6655 | JDG 5:30 | ‘त्यांना मिळालेल्या लुटीची ते वाटणी तर करून घेत नसतील ना? प्रत्येक वीराला एक एक किंवा दोन-दोन कुमारिका; सीसरासाठी रंगीबेरंगी वस्रे, भरजरी रंगीबेरंगी वस्रे लुटीत मिळालेल्या कुमारिकांच्या गळ्यांत भुषण म्हणून पांघरण्यासाठी रंगीबेरंगी वस्रे मिळाली नसतील ना?’ |
6699 | JDG 7:3 | तर आता तू लोकांच्या कानी जाईल असे जाहीर करून सांग की, ‘जो कोणी भित्रा आणि घाबरट आहे,’ त्याने गिलाद डोंगरावरून निघून परत माघारी जावे.” तेव्हा लोकांतून बावीस हजार लोक माघारी गेले आणि दहा हजार राहिले. |
6764 | JDG 9:8 | झाडे आपल्यावर अभिषेकाने राजा करायास निघाली; तेव्हा त्यांनी जैतूनाला म्हटले, ‘तू आमचा राजा हो.’ |
6766 | JDG 9:10 | नंतर त्या झाडांनी अंजिराला म्हटले, ‘तू चल, आमचा राजा हो.’ |
6767 | JDG 9:11 | तेव्हा अंजिराने त्यांना म्हटले, ‘मी आपली गोडी व आपले चांगले फळ सोडून, झाडांवर अधिकार कारायास जावे की काय?’ |
6768 | JDG 9:12 | नंतर त्या झाडांनी द्राक्षवेलाला म्हटले, ‘चल तू आमचा राजा हो.’ |
6770 | JDG 9:14 | नंतर त्या सर्व झाडांनी काटेरी झुडुपाला म्हटले, ‘चल तू आमचा राजा हो.’ |
6771 | JDG 9:15 | तेव्हा काटेरी झुडपाने त्या झाडांना म्हटले, ‘जर तुम्ही खरेपणाने मला अभिषेक करून राजा करीत असाल, तर येऊन माझ्या छायेचा आश्रय घ्या; नाही तर काटेरी झुडुपातून विस्तव निघून लबानोनावरल्याचे गंधसरूस जाळून टाकील.’ |
7005 | JDG 18:10 | तुम्ही तेथे जाल, तेव्हा ‘आम्ही अगदी सुरक्षित आहोत’ असा विचार करणाऱ्या लोकांकडे जाल, तसेच त्यांचा देश विस्तीर्ण आहे. देवाने ते तुम्हाला दिले आहेत. ती जागा अशी आहे की पृथ्वीवरील कोणत्याही गोष्टीची उणीव तेथे नाही.” |
7158 | RUT 2:7 | ती मला म्हणाली, ‘कृपा करून कापणी करणाऱ्यांच्या मागून पेंढ्यांमधला सरवा मला वेचू द्या.’ ती सकाळपासून आतापर्यंत तो वेचीत आहे, आत्ताच येथे थोडा वेळ मात्र विश्रांती घेण्यासाठी ती येथे आली आहे.” |
7172 | RUT 2:21 | मग मवाबी रूथने सांगितले; “तो मला असेही म्हणाला की, ‘माझे गडी सर्व कापणी करत तोपर्यंत त्याच्या मागोमाग राहा.’” |
7191 | RUT 3:17 | तिने सांगितले, “सहा मापे सातू त्याने मला दिले. तो म्हणाला, ‘आपल्या सासूकडे रिकाम्या हाताने जाऊ नको.’” |
7519 | 1SA 14:9 | जर ते आम्हास म्हणतील, ‘आम्ही तुम्हाकडे येऊ तोपर्यंत थांबा,’ तर आम्ही आपल्या ठिकाणी उभे राहू वर त्याच्याकडे जाणार नाही; |
7520 | 1SA 14:10 | परंतु जर ते म्हणतील की, ‘वर आम्हाकडे या,’ तर आम्ही वर जाऊ; कारण परमेश्वराने त्यांना आमच्या हाती दिले आहे. हेच आम्हांला चिन्ह होईल.” |
8034 | 2SA 1:9 | तेव्हा शौल म्हणाला, ‘मला अत्यंत दुखापत झाली आहे. तेव्हा मला मारून टाक. कारण मी मरणाच्या दाराशी उभा आहे.’ |
8886 | 1KI 5:19 | परमेश्वराने माझे वडिल दाविदाला वचन दिले होते. परमेश्वराने सांगितले होते, ‘तुझ्यानंतर मी तुझ्या मुलाला राजा करीन. तो माझ्या सन्मानार्थ मंदिर बांधील’ त्याप्रमाणे माझ्या परमेश्वर देवाच्या सन्मानार्थ मंदिर बाधण्याची माझी योजना आहे. |
9062 | 1KI 9:8 | हे मंदिर नामशेष होईल; ते पाहणारे स्तंभित होतील आणि म्हणतील, ‘परमेश्वराने या देशाचा आणि या मंदिराचे असे का केले बरे?’ |
9164 | 1KI 12:10 | तेव्हा ते तरुण मित्र म्हणाले, “ते लोक येऊन असे म्हणत आहेत, ‘तुझ्या वडिलांनी आमच्याकडून बेदम कष्ट करवून घेतले, तर आता आमचे जू हलके करा.’ तर तू त्यांना बढाई मारुन सांग, ‘माझ्या वडिलांच्या कंबरेपेक्षा ही माझी करंगळी जास्त मोठी आहे. |
9355 | 1KI 18:11 | आणि आता तुम्ही मला म्हणता, ‘जा जाऊन तुझ्या स्वामीला सांग एलीया या ठिकाणी आहे.’ |
9358 | 1KI 18:14 | आणि आता तुम्ही म्हणता, ‘जा आपल्या धन्याला सांग की एलीया या ठिकाणी आहे,’ मग तो मला जीवे मारील.” |
9450 | 1KI 20:39 | राजा तिथून जात होता. तेव्हा संदेष्टा त्यास म्हणाला, “मी लढाईवर गेलो होतो. आपल्यापैकी एकाने एका शत्रू सैनिकाला माझ्यापुढे आणले आणि मला सांगितले, ‘याच्यावर नजर ठेव. हा पळाला तर याच्या जागी तुला आपला जीव द्यावा लागेल किंवा शंभर रत्तल चांदीचा दंड भरावा लागेल.’ |
9503 | 1KI 22:20 | परमेश्वराने म्हटले, ‘अहाब राजाची कोणी फसगत करेल का? त्याने रामोथ-गिलाद वर हल्ला करावा असे मला वाटते. त्यामध्ये त्यास मरण येईल.’ तेव्हा आता काय करावे याबद्दल देवदूतांमध्ये एकमत होईना. |
9504 | 1KI 22:21 | मग त्यापैकी एकजण परमेश्वराकडे गेला आणि म्हणाला, ‘मी हे काम करीन.’ |
9505 | 1KI 22:22 | परमेश्वर त्यास म्हणाला, ‘तू अहाबाची फसगत कशी करशील?’ यावर तो देवदूत म्हणाला, ‘मी अहाबाच्या संदेष्ट्यांमध्ये गोंधळ माजवून देईन. त्यांना मी राजाशी खोटे बोलायला प्रवृत्त करीन संदेष्टे राजाला सांगतील ते खोटे असेल.’ यावर परमेश्वर म्हणाला, ‘हे चांगले झाले; जा आणि अहाब राजाला या मोहात पाड, तुला यश येईल. |
9635 | 2KI 4:28 | तेव्हा ती म्हणाली, “माझ्या स्वामी, मी तुझ्याजवळ मुलगा मागितला होता काय? ‘मला फसवू नको’ असे मी म्हटले नव्हते काय?” |
9664 | 2KI 5:13 | मग नामानाचे सेवक त्याच्याकडे येऊन त्यास म्हणाले, “माझ्या पित्या, संदेष्ट्याने तुम्हास एखादी अवघड गोष्ट करायला सांगितली असती तर तुम्ही ती केली असती, नाही का? ‘स्नान करून शुध्द हो,’ एवढेच त्याने आपल्याला सांगितले. ते आपण का करू नये?” |
9707 | 2KI 6:29 | तेव्हा माझ्या मुलाला मारुन त्याचे मांस शिजवून आम्ही खाल्ले. दुसऱ्या दिवशी मी तिला म्हणाले, ‘आता तुझ्या मुलाला आण म्हणजे त्यास आपण खाऊ.’ पण तिने आपल्या मुलाला लपवून ठेवले आहे.” |
9741 | 2KI 8:10 | तेव्हा अलीशा हजाएलला म्हणाला, “बेन-हदादला जाऊन सांग, ‘तू खात्रीने बरा होशील.’ पण तो मरणार आहे असे खरे म्हणजे परमेश्वराने मला सांगितले आहे.” |
9763 | 2KI 9:3 | त्यानंतर ही तेलाची कुपी घेऊन त्याच्या मस्तकावर तेल ओत. तेव्हा ‘परमेश्वर म्हणतो की इस्राएलचा राजा म्हणून मी तुला अभिषेक केला आहे,’ असे म्हण. एवढे झाले की धावत परत ये. तेथे थांबू नकोस!” |
9786 | 2KI 9:26 | परमेश्वर म्हणाला होता, ‘नाबोथ आणि त्याची मुले यांचे रक्त काल मला दिसले तेव्हा त्या शेतात मी अहाबाला शिक्षा करीन.’ प्रत्यक्ष परमेश्वरच असे म्हणाला. तेव्हा उचल तो मृतदेह आणि परमेश्वराच्या म्हणण्याप्रमाणे दे टाकून त्या शेतात!” |
9796 | 2KI 9:36 | तेव्हा त्या लोकांनी येऊन येहूला हे सांगितले. येहू त्यांना म्हणाला, “आपला सेवक एलीया तिश्बी याच्या मार्फत परमेश्वराने हेच सांगितले होते. एलीया म्हणाला होता, ‘इज्रेलच्या परिसरात ईजबेलचा देह कुत्री खातील.’ |
10060 | 2KI 18:32 | पुढे मी तुमच्या देशासारख्याच दुसऱ्या देशात, धान्याचा व द्राक्षरसाचा देश, अन्नाचा व द्राक्षीच्या मळ्याचा देश, जैतून तेलाचा व मधाचा देश यामध्ये मी तुम्हास घेऊन जाईपर्यंत तुम्ही असे वागा. तरच तुम्ही जगाल; मरणार नाही. आणि हिज्कीयाचे ऐकू नका. तो तुमचे हृदयपरिवर्तन करु पाहत आहे, ‘परमेश्वर आपल्याला वाचवेल’ असे तो म्हणतो. |
10071 | 2KI 19:6 | आणि यशया त्यांना म्हणाला, “तुझ्या स्वामीला हा निरोप द्या; की परमेश्वर असे म्हणतो ‘माझ्यासाठी जे अपमानकारक उद्गार अश्शूरच्या राजाच्या सेनापतींनी काढले त्याने घाबरुन जाऊ नका.’ |
10075 | 2KI 19:10 | यहूदाचा राजा हिज्कीयाला तुम्ही सांगा, “तुम्ही ज्या परमेश्वरावर विसंबून आहात तो, ‘अश्शूरचा राजाच्या हाती यरूशलेम दिले जाणार नाही, असे बोलून तुला न फसवो.’ |
10874 | 1CH 17:6 | सर्व इस्राएलाबरोबर ज्या ज्या ठिकाणांमध्ये मी फिरत आलो तेथे तेथे ज्यांना माझ्या लोकांचे पालन करण्यासाठी मी नेमले त्या इस्राएलाच्या पुढाऱ्यांतील कोणा एकालाही ‘माझ्यासाठी तुम्ही गंधसरूचे घर का बांधले नाही, असा एक शब्द तरी मी कधी बोललो काय?’” |
11151 | 1CH 28:3 | पण देव मला म्हणाला, ‘तू माझ्या नावासाठी मंदिर बांधायचे नाही. कारण तू एक लढवय्या आहेस आणि रक्त पाडले आहेस.’ |
11296 | 2CH 6:9 | पण ते तू बांधू शकत नाहीस पण तुझा पुत्र जो तुझ्यापासून जन्मला तो हे काम करील.’ |
11297 | 2CH 6:10 | आता परमेश्वराने कबूल केले तसेच झाले आहे व माझे पिता दावीद यांच्या जागी मी इस्राएल लोकांचा राजा झालो आहे. ‘मी इस्राएलचा राजा आहे असे होईल’ हे वचन परमेश्वराने दिले होते, आणि मी इस्राएलाचा देव परमेश्वर याच्या नावाने मंदिर बांधले आहे. |
11347 | 2CH 7:18 | तर मी तुला समर्थ राजा बनवील आणि तुझे राज्य महान होईल. तुझे पिता दावीद यांना मी तसे वचन दिले आहे. त्यांना मी म्हटले होते, ‘दावीद तुझ्या घराण्यातील पुरुषच इस्राएलाच्या राजपदावर आरुढ होईल.’ |
11350 | 2CH 7:21 | एकेकाळी पूज्य मानल्या गेलेल्या या मंदिरावरुन जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येकाला आता आश्चर्य वाटेल. ते लोक म्हणतील, ‘हा प्रदेश आणि हे मंदिर यांची अशी अवस्था परमेश्वराने का केली बरे?’ |
11351 | 2CH 7:22 | तेव्हा त्यांना इतर लोक सांगतील, ‘कारण आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचे या इस्राएल लोकांनी ऐकले नाही. या लोकांस या परमेश्वरानेच मिसरातून बाहेर आणले. तरी हे इतर दैवतांच्या भजनी लागले. त्यांनी त्यांची उपासना व सेवा केली. त्यांनी मूर्तीपूजा सुरु केली. म्हणून इस्राएल लोकांवर परमेश्वराने हे अरिष्ट आणले.’” |
11557 | 2CH 18:10 | कनानचा पुत्र सिदकीया याने लोखंडाची शिंगे करून आणली होती. तो म्हणाला, “परमेश्वर म्हणतो ‘अरामी लोकांचा या शिंगांच्या सहाय्याने तुम्ही नाश कराल.’” |
11727 | 2CH 25:18 | इस्राएलचा राजा योवाश याने यहूदाचा राजा अमस्या याच्याकडे आपले उत्तर पाठवले. योवाशाने दृष्टांत दिला तो असा: “लबानोन मधल्या एका काटेरी झुडुपाने लबानोनाच्या एका गंधसरूला निरोप पाठवला की, ‘तुझ्या कन्येचे माझ्या पुत्रांशी लग्न व्हावे.’ पण तेवढ्यात ते झुडुप तिथून जाणाऱ्या एका वन्यपशूच्या पायाखाली तुडवले गेले. |
12148 | EZR 5:9 | या कामाच्या संदर्भात आम्ही तेथील वडीलधाऱ्यांकडे चौकशी केली. त्यांना विचारले, ‘तुम्हास हे मंदिराचे बांधकाम करायला कोणी परवानगी दिली?’ |
12161 | EZR 6:5 | देवाच्या घरातील सोन्यारुप्याची पात्रे जी नबुखद्नेस्सराने यरूशलेमेच्या मंदिरातून काढून बाबेलला आणली आहेत ती परत करावी. ती तू यरूशलेमास पाठवावी आणि देवाच्या घरात जमा करावी.’ |
13005 | JOB 6:23 | किंवा ‘माझ्याविरोधकाच्या हातून माझे रक्षण करा? किंवा, क्रूर लोकांपासून खंडणी देऊन वाचवा!’ असे मी तुम्हास म्हटले का? |
13051 | JOB 8:18 | परंतु जर हा व्यक्ती त्या जागेवरून हलवला गेला तर तो नष्ट होतो, मग ती जागा त्यास नाकारुन म्हणेल ‘मी तुला कधी पाहिले नाही.’ |
13278 | JOB 17:14 | जर मी गर्तेस म्हणालो तू माझा बाप किड्यांना म्हणालो तू माझी आई किंवा माझी ‘बहीण’ |
13337 | JOB 20:7 | परंतु त्याच्या विष्ठेप्रमाणे त्याचा नाश होईल. जे लोक त्यास ओळखतात ते विचारतील, ‘तो कुठे गेला?’ |
13410 | JOB 22:17 | जे देवाला म्हटले, ‘आमच्या पासून निघून जा तो सर्वशक्तिमान देव आम्हास काय करु शकतो?’ |
13455 | JOB 24:15 | ज्या मनुष्यास व्यभिचार करायचा आहे तो रात्रीची वाट बघतो. तो म्हणतो, ‘मला कोणीही बघणार नाही’ पण तरीही तो त्याचा चेहरा झाकतो. |
13522 | JOB 28:14 | पृथ्वीवरील मोठे खोल जलाशय असे म्हणते, ‘माझ्यामध्ये ते नाही.’ सागर म्हणतो, ‘माझ्याजवळीही ते नाही.’ |
13530 | JOB 28:22 | मृत्यू आणि विनाश म्हणतात, ‘आम्हास शहाणपण सापडले नाही, आम्ही त्याबद्दलच्या फक्त अफवाच ऐकल्या आहेत.’ |