62 | GEN 3:6 | आणि स्त्रीने पाहिले की, त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले व डोळ्यांना आनंद देणारे व शहाणे करण्यासाठी इष्ट आहे, तेव्हा तिने त्याचे काही फळ घेऊन खाल्ले. आणि तिने आपल्याबरोबर आपल्या पतीसही त्या फळातून थोडे दिले व त्याने ते खाल्ले. |
81 | GEN 4:1 | मनुष्याने त्याची पत्नी हव्वा हिच्यासोबत वैवाहिक संबंध केला. ती गर्भवती झाली आणि तिने काइनाला जन्म दिला. तेव्हा ती म्हणाली, परमेश्वराच्या साहाय्याने मला पुरुषसंतान लाभले आहे. |
82 | GEN 4:2 | त्यानंतर तिने काइनाचा भाऊ हाबेल याला जन्म दिला. आणि हाबेल मेंढपाळ बनला, पण काइन शेतातील कामकरी झाला. |
83 | GEN 4:3 | काही काळानंतर काइनाने परमेश्वरास शेतामधील फळांतले काही अर्पण आणले. |
85 | GEN 4:5 | परंतु त्याने काइन आणि त्याचे अर्पण स्विकारले नाही. यामुळे काइनाला फार राग आला, आणि त्याचे तोंड उतरले. |
86 | GEN 4:6 | परमेश्वर काइनाला म्हणाला, “तू का रागावलास? तुझा चेहरा का उतरला आहे? |
87 | GEN 4:7 | तू जर चांगल्या गोष्टी करशील तर, मग तुझाही स्विकार केला जाणार नाही का? परंतु तू जर योग्य ते करणार नाहीस, तर पाप दाराशी टपून बसले आहे आणि त्याची तुझ्यावर ताबा मिळवण्याची इच्छा आहे, परंतु तू त्यावर नियंत्रण केले पाहिजेस.” |
88 | GEN 4:8 | काइन आपला भाऊ हाबेल याच्याशी बोलला, आणि असे झाले की ते शेतात असता, काइन आपला भाऊ हाबेल ह्याच्या विरूद्ध उठला व त्यास त्याने ठार मारले. |
89 | GEN 4:9 | परमेश्वर काइनास म्हणाला, “तुझा भाऊ हाबेल कोठे आहे?” काइनाने उत्तर दिले, “मला माहीत नाही; मी माझ्या भावाचा राखणदार आहे काय?” |
93 | GEN 4:13 | काइन परमेश्वरास म्हणाला, “माझी शिक्षा मी सहन करण्यापलीकडे, इतकी मोठी ती आहे. |
95 | GEN 4:15 | परमेश्वर त्यास म्हणाला, “जर कोणी काइनाला ठार मारील तर त्याचा सातपट सूड घेण्यात येईल.” त्यानंतर, तो कोणाला सापडला तर त्यास कोणी जिवे मारू नये म्हणून, परमेश्वराने काइनावर एक खूण करून ठेवली. |
96 | GEN 4:16 | काइन परमेश्वरासमोरून निघून गेला आणि एदेनाच्या पूर्वेस नोद प्रदेशात जाऊन राहिला. |
97 | GEN 4:17 | काइनाने आपल्या पत्नीस जाणिले, ती गर्भवती होऊन तिने हनोखाला जन्म दिला; काइनाने एक नगर बांधले त्याने त्या नगराला आपल्या मुलाचेच हनोख हे नाव दिले. |
98 | GEN 4:18 | हनोखाला इराद झाला; इरादाला महूयाएल झाला महूयाएलास मथुशाएल झाला; आणि मथुशाएलास लामेख झाला. |
102 | GEN 4:22 | सिल्ला हिला तुबल-काइन झाला; तो तांब्याची व लोखंडाची कामे करणाऱ्या लोकांचा मूळपुरुष झाला. तुबल काइनास नामा नावाची बहीण होती. |
104 | GEN 4:24 | जर काइनाबद्दल सातपट तर लामेखाबद्दल सत्याहत्तरपट सूड घेतला जाईल. |
105 | GEN 4:25 | आदामाने पुन्हा पत्नीस जाणिले आणि तिला पुत्र झाला. त्यांनी त्याचे नाव शेथ असे ठेवले. हव्वा म्हणाली, “देवाने हाबेलाच्या ठिकाणी मला दुसरे संतान दिले आहे, कारण काइनाने त्यास जिवे मारले.” |
154 | GEN 6:16 | तारवाला छतापासून सुमारे अठरा इंचावर एक खिडकी कर. तारवाच्या एका बाजूस दार ठेव आणि तारवाला खालचा, मधला व वरचा असे तीन मजले कर. |
162 | GEN 7:2 | प्रत्येक शुद्ध जातीच्या प्राण्यांपैकी नर व माद्यांच्या सात सात जोड्या घे, इतर शुद्ध नाहीत त्या प्राण्यापैकी, नर व मादी अशी दोन दोन घे. |
180 | GEN 7:20 | पाणी पर्वत शिखरावर पंधरा हातापेक्षा अधिक उंच इतके वर चढले. |
191 | GEN 8:7 | त्याने एक कावळा बाहेर सोडला आणि पृथ्वीवरील पाणी सुकून जाईपर्यंत तो इकडे तिकडे उडत राहिला. |
296 | GEN 11:29 | अब्राम व नाहोर या दोघांनीही लग्न केले. अब्रामाच्या पत्नीचे नाव साराय आणि नाहोरच्या पत्नीचे नाव मिल्का होते. मिल्का ही हारानाची मुलगी होती. हा हारान मिल्का व इस्का यांचा पिता होता. |
325 | GEN 13:6 | तो देश त्या दोघांना एकत्र जवळ राहण्यास पुरेना, कारण त्यांची मालमत्ता फारच मोठी होती, ती इतकी की त्यांना एकत्र राहता येईना. |
335 | GEN 13:16 | मी तुझी संतती या पृथ्वीवरील धुळीच्या कणांइतकी करीन, ते असे की, जर कोणाला ते धुळीचे कण मोजता येतील तर तुझे संतानही मोजता येईल. |
350 | GEN 14:13 | तेथून पळून आलेल्या एकाने अब्राम इब्रीला हे सांगितले. तो तर अष्कोल व आनेर ह्यांचा भाऊ मम्रे अमोरी याच्या एलोन झाडांजवळ राहत होता आणि ते सर्व अब्रामाचे सहकारी होते. |
351 | GEN 14:14 | जेव्हा अब्रामाने ऐकले की, त्याच्या नातेवाइकांना शत्रूंनी पकडून नेले आहे तेव्हा त्याने आपल्या घरी जन्मलेली, लढाईचे शिक्षण घेतलेली तीनशे अठरा माणसे घेऊन सरळ दान नगरापर्यंत शत्रूंचा पाठलाग केला. |
353 | GEN 14:16 | अब्रामाने सगळी मालमत्ता आणि त्याचा नातेवाइक लोट आणि त्याच्या वस्तू, त्याचप्रमाणे स्त्रिया आणि इतर लोक यांना परत आणले. |
392 | GEN 16:10 | परमेश्वराचा दूत तिला आणखी म्हणाला, “तुझी संतती मी इतकी बहुगुणित करीन, की ती मोजणे शक्य होणार नाही.” |
393 | GEN 16:11 | परमेश्वराचा दूत तिला असे सुद्धा म्हणाला, “तू आता गरोदर आहेस आणि तुला मुलगा होईल त्याचे नाव तू इश्माएल म्हणजे परमेश्वर ऐकतो असे ठेव, कारण प्रभूने तुझ्या दुःखाविषयी ऐकले आहे. |
394 | GEN 16:12 | इश्माएल जंगली गाढवासारखा मनुष्य असेल. तो सर्वांविरूद्ध असेल आणि सर्व लोक त्याच्या विरूद्ध असतील, आणि तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्या भावांच्यापासून वेगळा राहील.” |
397 | GEN 16:15 | हागारेने अब्रामाच्या पुत्राला जन्म दिला, आणि ज्याला हगारेने जन्म दिला त्या त्याच्या पुत्राचे नाव अब्रामाने इश्माएल ठेवले. |
398 | GEN 16:16 | हागारेला अब्रामापासून इश्माएल झाला तेव्हा अब्राम शहाऐंशी वर्षांचा होता. |
416 | GEN 17:18 | अब्राहाम देवाला म्हणाला, “इश्माएल तुझ्या समोर जगावा तेवढे पुरे!” |
417 | GEN 17:19 | देव म्हणाला, “नाही! परंतु तुझी पत्नी सारा हिलाच मुलगा होईल, आणि त्याचे नाव तू इसहाक असे ठेव. मी त्याच्याशी निरंतरचा करार करीन; तो करार त्याच्यानंतर त्याच्या वंशजांसोबत निरंतर असेल. |
418 | GEN 17:20 | तू मला इश्माएलविषयी विचारलेस ते मी ऐकले आहे. पाहा, मी आतापासून पुढे त्यास आशीर्वाद देईन, आणि त्यास फलद्रुप करीन आणि त्यास बहुगुणित करीन. तो बारा सरदारांच्या वंशांचा पिता होईल, आणि मी त्यास एक मोठे राष्ट्र करीन. |
419 | GEN 17:21 | परंतु मी इसहाकाबरोबर माझा करार स्थापीन, ज्याला सारा पुढल्या वर्षी याच वेळी जन्म देईल.” |
421 | GEN 17:23 | त्यानंतर अब्राहामाने त्याचा मुलगा इश्माएल आणि त्याच्या घराण्यात जन्मलेले आणि जे सर्व मोल देऊन विकत घेतलेले अशा सगळ्या पुरुषांना एकत्र केले, आणि देवाने सांगितल्याप्रमाणेच त्याच्या घरातील सर्व पुरुषांची त्या एकाच दिवशी सुंता केली. |
423 | GEN 17:25 | आणि त्याचा मुलगा इश्माएल तेरा वर्षांचा होता तेव्हा त्याची सुंता झाली. |
424 | GEN 17:26 | अब्राहाम आणि त्याचा मुलगा इश्माएल या दोघांची एकाच दिवशी सुंता झाली. |
438 | GEN 18:13 | परमेश्वर अब्राहामाला म्हणाला, “सारा का हसली? मी आता इतकी म्हातारी झाली असताना मला मुलगा होईल काय, असे ती का म्हणाली? |
517 | GEN 21:3 | अब्राहामाला जो मुलगा सारेपासून झाला त्याचे नाव त्याने इसहाक ठेवले. |
518 | GEN 21:4 | देवाने आज्ञा केल्याप्रमाणे अब्राहामाने त्याचा मुलगा इसहाक आठ दिवसाचा झाल्यावर त्याची सुंता केली. |
519 | GEN 21:5 | इसहाकाचा जन्म झाला तेव्हा अब्राहाम शंभर वर्षांचा होता. |
522 | GEN 21:8 | मग बालक वाढत गेला आणि त्याचे स्तनपान तोडले, आणि इसहाकाच्या स्तनपान तोडण्याच्या दिवशी अब्राहामाने मोठी मेजवानी दिली. |
523 | GEN 21:9 | मग साराची मिसरी दासी हागार हिचा मुलगा इश्माएल जो तिला अब्राहामापासून झाला होता, तो चेष्टा करीत आहे असे सारेने पाहिले. |
524 | GEN 21:10 | म्हणून सारा अब्राहामाला म्हणाली, “या दासीला व तिच्या मुलाला येथून बाहेर घालवून द्या. या दासीचा मुलगा, माझा मुलगा इसहाक याच्याबरोबर वारस होणार नाही.” |
526 | GEN 21:12 | परंतु देव अब्राहामाला म्हणाला, “मुलाकरता व तुझ्या दासी करता दुःखी होऊ नकोस. तुला ती या बाबतीत जे काही सांगते, ते तिचे सर्व म्हणणे ऐक. कारण इसहाकाद्वारेच तुझ्या वंशाला नाव देण्यात येईल. |
530 | GEN 21:16 | नंतर ती बरीच दूर म्हणजे बाणाच्या टप्प्याइतकी दूर जाऊन बसली, कारण तिने म्हटले “मला माझ्या मुलाचे मरण पाहायला नको.” ती त्याच्या समोर बसून मोठमोठ्याने हंबरडा फोडून रडू लागली. |
550 | GEN 22:2 | नंतर देव म्हणाला, “तुझा एकुलता एक प्रिय पुत्र, ज्याच्यावर तू प्रीती करतोस त्या इसहाकाला घेऊन तू मोरिया देशात जा आणि तेथे मी तुला सांगेन त्या डोंगरावर माझ्यासाठी त्याचे होमार्पण कर.” |
551 | GEN 22:3 | तेव्हा अब्राहाम पहाटेस लवकर उठला, त्याने खोगीर घालून आपले गाढव तयार केले, आपला मुलगा इसहाक व त्याच्यासोबत दोन तरुण सेवकांना आपल्याबरोबर घेतले. त्याने होमार्पणाकरिता लाकडे फोडून घेतली आणि मग ते सर्व देवाने सांगितलेल्या ठिकाणी प्रवासास निघाले. |
554 | GEN 22:6 | अब्राहामाने होमार्पणासाठी लाकडे घेऊन इसहाकाच्या खांद्यावर ठेवली; त्याने स्वतःच्या हातात अग्नी व एक सुरा घेतला. आणि ते दोघे बरोबर निघाले. |
555 | GEN 22:7 | इसहाक आपल्या पित्याला म्हणाला, “माझ्या बाबा.” अब्राहामाने उत्तर दिले, “मी येथे आहे, माझ्या मुला.” इसहाक म्हणाला, “मला लाकडे व अग्नी दिसतात, परंतु होमार्पणासाठी कोकरू कोठे आहे?” |
557 | GEN 22:9 | देवाने सांगितलेल्या ठिकाणी जेव्हा ते जाऊन पोहचले, तेथे अब्राहामाने एक वेदी बांधली, त्याने वेदीवर लाकडे रचली. नंतर त्याने आपला पुत्र इसहाक याला बांधले, आणि वेदीवरील लाकडावर ठेवले. |
560 | GEN 22:12 | तो म्हणाला, “तू आपल्या मुलावर हात टाकू नकोस, किंवा त्यास कोणत्याही प्रकारची इजा करू नकोस, कारण आता मला खात्रीने समजले की, तू देवाचे भय बाळगतोस, कारण तू माझ्यासाठी आपल्या एकुलत्या एका पुत्राला ही राखून ठेवले नाही.” |
565 | GEN 22:17 | मी खरोखर तुला आशीर्वाद देईन व तुझे वंशज आकाशातल्या ताऱ्यांसारखे व समुद्र किनाऱ्यावरील वाळू इतके बहुतपट वाढवीनच वाढवीन; आणि तुझे वंशज आपल्या शत्रूच्या वेशीचा ताबा मिळवतील. |
567 | GEN 22:19 | मग अब्राहाम आपल्या तरुण सेवकाकडे परत आला आणि अब्राहाम, इसहाक व त्याचे सेवक असे सर्व मिळून बैर-शेबाला गेले, आणि तो बैर-शेबा येथे राहिला. |
585 | GEN 23:13 | देशातले लोक ऐकत असता तो एफ्रोनास म्हणाला, “परंतु जर तुझी इच्छा आहे, तर कृपा करून माझे ऐक. मी शेताची किंमत तुला देईन. माझ्याकडून त्याचे पैसे घे, आणि मग मी आपल्या मयतास तेथे पुरेन.” |
596 | GEN 24:4 | परंतु, तू माझ्या देशाला माझ्या नातेवाइकांकडे जाशील, आणि तेथून माझा मुलगा इसहाक याच्यासाठी पत्नी मिळवून आणशील.” |
599 | GEN 24:7 | आकाशाचा देव परमेश्वर, ज्याने मला माझ्या वडिलाच्या घरातून व माझ्या नातेवाइकांच्या देशातून मला आणले व ज्याने बोलून, ‘मी हा देश तुझ्या संततीला देईन,’ असे शपथपूर्वक अभिवचन दिले, तो परमेश्वर आपल्या दूताला तुझ्या पुढे पाठवील, आणि तू तेथून माझ्या मुलासाठी पत्नी आणशील. |
606 | GEN 24:14 | तर असे घडू दे की, मी ज्या मुलीस म्हणेन, ‘मुली तुझी पाण्याची घागर उतरून मला प्यायला पाणी दे,’ आणि ती जर ‘तुम्ही प्या, आणि मी तुमच्या उंटांनाही पाणी पाजते,’ तर मग तीच तुझा सेवक इसहाक ह्याच्यासाठी तू नेमलेली असू दे. त्यावरून मी असे समजेन की, तू माझ्या धन्यासोबत करार पाळण्याचा प्रामाणिकपणा दाखवला आहे.” |
611 | GEN 24:19 | त्यास पुरे इतके पाणी पाजल्यानंतर ती म्हणाली, “मी तुमच्या उंटांसाठीसुद्धा, त्यांना पुरेल इतके पाणी पिण्यास काढते.” |
619 | GEN 24:27 | तो म्हणाला, “माझा धनी, अब्राहाम ह्याचा देव परमेश्वर धन्यवादित असो, त्याने माझ्या धन्यासंबंधीचा कराराचा प्रामाणिकपणा आणि विश्वसनीयता सोडली नाही, माझ्याबाबत सांगायचे तर, परमेश्वराने मला माझ्या धन्याच्या नातेवाइकाकडेच सरळ मार्ग दाखवून आणले.” |
654 | GEN 24:62 | इकडे इसहाक नेगेब येथे राहत होता आणि नुकताच बैर-लहाय-रोई विहिरीपासून परत आला होता. |
655 | GEN 24:63 | इसहाक संध्याकाळी मनन करण्यास शेतात गेला होता. त्याने आपली नजर वर केली व पाहिले तेव्हा त्यास उंट येताना दिसले. |
656 | GEN 24:64 | रिबकेने नजर वर करून जेव्हा इसहाकाला पाहिले तेव्हा ती उंटावरून उडी मारून खाली उतरली. |
658 | GEN 24:66 | सेवकाने इसहाकाला सर्व गोष्टी, त्याने काय केले त्याविषयी सविस्तर सांगितले. |
659 | GEN 24:67 | मग इसहाकाने मुलीला आपली आई सारा हिच्या तंबूत आणले. आणि त्याने रिबकेला स्विकारले, आणि ती त्याची पत्नी झाली, आणि त्याने तिच्यावर प्रेम केले. अशा रीतीने आपल्या आईच्या मरणानंतर इसहाक सांत्वन पावला. |
661 | GEN 25:2 | तिच्यापासून त्यास जिम्रान, यक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक व शूह ही मुले झाली. |
664 | GEN 25:5 | अब्राहामाने आपले सर्वस्व इसहाकास दिले. |
665 | GEN 25:6 | अब्राहामाने आपल्या उपपत्नीच्या मुलांना देणग्या दिल्या, आणि आपण जिवंत असतानाच त्याने आपला मुलगा इसहाकापासून त्यांना वेगळे करून दूर पूर्वेकडील देशात पाठवून दिले. |
666 | GEN 25:7 | अब्राहामाच्या आयुष्याच्या वर्षाचे दिवस हे इतके आहेत, तो एकशे पंच्याहत्तर वर्षे जगला. |
668 | GEN 25:9 | इसहाक व इश्माएल या त्याच्या मुलांनी त्यास सोहर हित्ती याचा मुलगा एफ्रोन याचे शेत मम्रेसमोर आहे त्यातल्या मकपेला गुहेत पुरले. |
670 | GEN 25:11 | अब्राहामाच्या मृत्यूनंतर देवाने त्याचा मुलगा इसहाक याला आशीर्वादित केले आणि इसहाक बैर-लहाय-रोई जवळ राहत होता. |
671 | GEN 25:12 | अब्राहामापासून सारेची दासी हागार हिला झालेल्या इश्माएलाची वंशावळ ही: |
672 | GEN 25:13 | इश्माएलाच्या मुलांची नावे ही होती. इश्माएलाच्या मुलांची नावे त्यांच्या जन्मक्रमाप्रमाणे: इश्माएलाचा प्रथम जन्मलेला मुलगा नबायोथ, केदार, अदबील, मिबसाम, |
675 | GEN 25:16 | ही इश्माएलाची मुले होती, आणि त्यांच्या गावांवरून आणि त्याच्या छावणीवरून त्यांची नावे ही पडली होती. हे त्यांच्या वंशाप्रमाणे बारा सरदार झाले. |
676 | GEN 25:17 | ही इश्माएलाच्या आयुष्याची वर्षे एकशे सदतीस आहेत. त्याने शेवटचा श्वास घेतला आणि मेला आणि आपल्या लोकांस जाऊन मिळाला. |
678 | GEN 25:19 | अब्राहामाचा मुलगा इसहाक ह्याच्यासंबंधीच्या घटना या आहेत. अब्राहाम इसहाकाचा बाप झाला. |
679 | GEN 25:20 | इसहाक चाळीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने पदन-अरामातील अरामी बथुवेलाची मुलगी व अरामी लाबानाची बहीण रिबका हिला पत्नी करून घेतले. |
680 | GEN 25:21 | इसहाकाने आपल्या पत्नीसाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली कारण ती निःसंतान होती, आणि परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली, आणि रिबका त्याची पत्नी गरोदर राहिली. |
685 | GEN 25:26 | त्याच्यानंतर त्याचा भाऊ बाहेर आला. त्याच्या हाताने त्याने एसावाची टाच हाताने धरली होती म्हणून त्याचे नाव याकोब असे ठेवले. जेव्हा त्याच्या पत्नीने त्यांना जन्म दिला तेव्हा इसहाक साठ वर्षांचा होता. |
687 | GEN 25:28 | एसावावर इसहाकाची प्रीती होती, कारण त्याने शिकार करून आणलेल्या प्राण्यांचे मांस तो खात असे, परंतु रिबकेने याकोबावर प्रीती केली. |
694 | GEN 26:1 | अब्राहामाच्या दिवसात जो पहिला दुष्काळ पडला होता त्यासारखा दुसरा दुष्काळ त्या देशात पडला. तेव्हा इसहाक पलिष्ट्यांचा राजा अबीमलेख याजकडे गरार नगरामध्ये गेला. |
697 | GEN 26:4 | मी तुझे वंशज आकाशातील ताऱ्यांइतके बहुगुणित करीन आणि हे सर्व देश मी तुझ्या वंशजांना देईन. तुझ्या वंशजांद्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील. |
699 | GEN 26:6 | म्हणून मग इसहाक गरारातच राहिला. |
700 | GEN 26:7 | जेव्हा तेथील लोकांनी त्याच्या पत्नीविषयी त्यास विचारले, तेव्हा तो म्हणाला, “ती माझी बहीण आहे.” “ती माझी पत्नी आहे,” असे म्हणण्यास तो घाबरला. कारण त्याने विचार केला की, “रिबकेला मिळविण्यासाठी या ठिकाणचे लोक माझा घात करतील, कारण ती दिसायला इतकी सुंदर आहे.” |