40 | GEN 2:9 | परमेश्वर देवाने दिसण्यास सुंदर आणि खाण्यास चांगले फळ देणारे प्रत्येक झाड जमिनीतून उगवले. त्यामध्ये बागेच्या मध्यभागी असलेले जीवनाचे झाड, आणि बऱ्यावाईटाचे ज्ञान देणारे झाड यांचाही समावेश होता. |
48 | GEN 2:17 | परंतु बऱ्यावाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ तू खाऊ नये, कारण तू ज्या दिवशी त्या झाडाचे फळ खाशील त्याच दिवशी तू नक्कीच मरशील.” |
55 | GEN 2:24 | म्हणून मनुष्य आपल्या आई वडीलांस सोडून आपल्या पत्नीला जडून राहील आणि ती दोघे एक देह होतील. |
61 | GEN 3:5 | कारण देवास हे माहीत आहे की, जर तुम्ही त्या झाडाचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील, व तुम्ही देवांसारखे बरेवाईट जाणणारे व्हाल.” |
76 | GEN 3:20 | आदामाने आपल्या पत्नीचे नाव हव्वा ठेवले, कारण सर्व जिवंत मनुष्यांची ती आई होती. |
78 | GEN 3:22 | परमेश्वर देव म्हणाला, “पाहा, मनुष्य आपल्यातल्या एका सारखा होऊन त्यास बरे व वाईट समजू लागले आहे. तर आता त्यास त्याच्या हातांनी जीवनाच्या झाडावरून ते फळ घेऊन खाऊ देऊ नये, आणि जर का तो ते फळ खाईल तर मग सदासर्वकाळ तो जिवंत राहील.” |
95 | GEN 4:15 | परमेश्वर त्यास म्हणाला, “जर कोणी काइनाला ठार मारील तर त्याचा सातपट सूड घेण्यात येईल.” त्यानंतर, तो कोणाला सापडला तर त्यास कोणी जिवे मारू नये म्हणून, परमेश्वराने काइनावर एक खूण करून ठेवली. |
104 | GEN 4:24 | जर काइनाबद्दल सातपट तर लामेखाबद्दल सत्याहत्तरपट सूड घेतला जाईल. |
135 | GEN 5:29 | लामेखाने त्याचे नाव नोहा ठेवून म्हटले, परमेश्वराने भूमी शापित केली आहे तिच्यापासून येणाऱ्या कामात आणि आमच्या हातांच्या श्रमात हाच आम्हांला विसावा देईल. |
143 | GEN 6:5 | पृथ्वीवर मानवजातीची दुष्टता मोठी आहे, आणि त्यांच्या मनात येणाऱ्या विचारातील प्रत्येक कल्पना केवळ एकसारखी वाईट असते, असे परमेश्वराने पाहिले. |
144 | GEN 6:6 | म्हणून पृथ्वीवर मनुष्य निर्माण केल्याबद्दल परमेश्वरास वाईट वाटले, आणि तो मनात फार दुःखी झाला. |
159 | GEN 6:21 | तसेच खाण्यात येते असे सर्व प्रकारचे अन्न तुझ्याजवळ आणून ते साठवून ठेव. ते तुला व त्यांना खाण्यासाठी होईल.” |
191 | GEN 8:7 | त्याने एक कावळा बाहेर सोडला आणि पृथ्वीवरील पाणी सुकून जाईपर्यंत तो इकडे तिकडे उडत राहिला. |
205 | GEN 8:21 | परमेश्वराने तो सुखकारक सुगंध घेतला आणि आपल्या मनात म्हटले, “मानवामुळे मी पुन्हा भूमीला शाप देणार नाही; मानवाच्या मनातील योजना बालपणापासूनच वाईट आहेत. मी आता केले आहे त्याप्रमाणे मी पुन्हा कधीही सर्व जिवांचा नाश करणार नाही. |
209 | GEN 9:3 | प्रत्येक हालचाल करणारा प्राणी हा तुमचे अन्न होईल. जशा मी हिरव्या वनस्पती दिल्या आहेत, तसेच आता सर्वकाही तुम्हास देत आहे. |
211 | GEN 9:5 | परंतु तुमच्या रक्तासाठी, जे रक्त तुमचे जीवन आहे, त्याबद्दल मी आवश्यक भरपाई घेईन. प्रत्येक प्राण्याच्या हातून मी ती घेईन. मनुष्याच्या हातून, म्हणजे ज्याने आपल्या भावाचा खून केला आहे त्याच्या हातून, त्या मनुष्याच्या जिवाबद्दल मी भरपाईची मागणी करीन. |
212 | GEN 9:6 | जो कोणी मनुष्याचे रक्त पाडतो, त्याचे रक्त मनुष्याकडून पाडले जाईल, कारण देवाने मनुष्यास त्याच्या प्रतिरूपाचे बनवले आहे. |
221 | GEN 9:15 | नंतर मी ते पाहीन तेव्हा मी तुमच्याशी व पृथ्वीवरील सर्व देहातल्या जिवंत प्राण्यांशी केलेल्या माझ्या कराराची मला आठवण होईल, या कराराप्रमाणे पुराच्या पाण्याने पृथ्वीवरील सर्व देहाचा पुन्हा कधीही नाश करणार नाही. |
241 | GEN 10:6 | हामाचे पुत्र कूश, मिस्राईम, पूट व कनान होते. |
246 | GEN 10:11 | त्या देशातून तो अश्शूर देशास गेला व तेथे त्याने निनवे, रहोबोथ, ईर, कालह ही शहरे बांधली |
248 | GEN 10:13 | मिस्राईम हा लूदीम, अनामीम, लहाबीम, नाप्तुहीम, |
271 | GEN 11:4 | मग लोक म्हणाले, “चला, आपण आपल्यासाठी नगर बांधू आणि ज्याचे शिखर आकाशापर्यंत पोहचेल असा उंच बुरूज बांधू, आणि आपण आपले नाव होईल असे करू या. आपण जर असे केले नाही, तर पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होईल.” |
301 | GEN 12:2 | मी तुझे मोठे राष्ट्र करीन आणि मी तुला आशीर्वाद देईन आणि मी तुझे नाव मोठे करीन आणि तू आशीर्वादित होशील, |
302 | GEN 12:3 | जे लोक तुला आशीर्वाद देतील त्यांना मी आशीर्वाद देईन, परंतु जो कोणी तुझा अनादर करील त्यास मी शाप देईन. तुझ्यामुळे पृथ्वीवरील सर्व कुटुंबे आशीर्वादित होतील.” |
306 | GEN 12:7 | परमेश्वर अब्रामाला दर्शन देऊन म्हणाला, “हा देश मी तुझ्या वंशजांना देईन.” ज्या जागेवर परमेश्वराने अब्रामाला दर्शन दिले त्या जागी त्याने परमेश्वरासाठी वेदी बांधली. |
312 | GEN 12:13 | म्हणून, तू माझी बहीण आहेस, असे तू लोकांस सांग. म्हणजे तुझ्यामुळे माझे बरे होईल, आणि ते मला मारणार नाहीत, अशा रीतीने तू माझा जीव वाचवशील.” |
325 | GEN 13:6 | तो देश त्या दोघांना एकत्र जवळ राहण्यास पुरेना, कारण त्यांची मालमत्ता फारच मोठी होती, ती इतकी की त्यांना एकत्र राहता येईना. |
328 | GEN 13:9 | तुझ्यापुढे सर्व देश नाही काय? पुढे जा आणि माझ्यापासून तू वेगळा हो. तू जर डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन, आणि तू जर उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन.” |
334 | GEN 13:15 | तू पाहतोस हा सगळा प्रदेश मी तुला आणि तुझ्यानंतर तुझ्या संततीला कायमचा देईन. |
335 | GEN 13:16 | मी तुझी संतती या पृथ्वीवरील धुळीच्या कणांइतकी करीन, ते असे की, जर कोणाला ते धुळीचे कण मोजता येतील तर तुझे संतानही मोजता येईल. |
342 | GEN 14:5 | त्यानंतर चौदाव्या वर्षी कदार्लागोमर व त्याच्या बरोबरचे राजे आले आणि त्यांनी अष्टरोथ-कर्णईम येथे रेफाईम लोकांस, हाम येथे जूजीम लोकांस, शावेह किर्याथाईम येथे एमीम या लोकांस मारले. |
343 | GEN 14:6 | आणि होरी यांना त्यांच्या सेईर डोंगराळ प्रदेशात जे एल पारान रान आहे तेथपर्यंत त्यांनी जाऊन मारले. |
345 | GEN 14:8 | नंतर सदोमाचा राजा, गमोराचा राजा, अदमाचा राजा, सबोयिमाचा राजा आणि बेला म्हणजे सोअराचा राजा ह्यांनी लढाईची तयारी केली. |
351 | GEN 14:14 | जेव्हा अब्रामाने ऐकले की, त्याच्या नातेवाइकांना शत्रूंनी पकडून नेले आहे तेव्हा त्याने आपल्या घरी जन्मलेली, लढाईचे शिक्षण घेतलेली तीनशे अठरा माणसे घेऊन सरळ दान नगरापर्यंत शत्रूंचा पाठलाग केला. |
362 | GEN 15:1 | या गोष्टी घडल्यानंतर अब्रामाला दृष्टांतात परमेश्वराचे वचन आले. तो म्हणाला, “अब्रामा, भिऊ नको. मी तुझे संरक्षण करीन आणि तुला फार मोठे प्रतिफळ देईन.” |
363 | GEN 15:2 | अब्राम म्हणाला, “हे प्रभू परमेश्वरा, मी अजून निपुत्रिक आहे, आणि माझ्या घराचा वारस दिमिष्क शहरातील अलिएजर हाच होईल, तेव्हा तू मला काय देणार?” |
365 | GEN 15:4 | नंतर, पाहा, परमेश्वराचे वचन अब्रामाकडे आले. तो म्हणाला, “हा मनुष्य तुझा वारस होणार नाही, तर तुझ्या पोटी येईल तोच तुझा वारस होईल.” |
366 | GEN 15:5 | मग त्याने त्यास बाहेर आणले, आणि म्हटले, “या आकाशाकडे पाहा, तुला तारे मोजता येतील तर मोज.” तो त्यास म्हणाला, “असे तुझे संतान होईल.” |
374 | GEN 15:13 | मग परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तुला या गोष्टी समजल्या पाहिजेत; तुझे वंशज जो देश त्यांचा नाही त्या अनोळखी देशात राहतील आणि ते तेथे गुलाम होतील आणि चारशे वर्षे त्यांचा छळ होईल. |
381 | GEN 15:20 | हित्ती, परिज्जी, रेफाईम, |
393 | GEN 16:11 | परमेश्वराचा दूत तिला असे सुद्धा म्हणाला, “तू आता गरोदर आहेस आणि तुला मुलगा होईल त्याचे नाव तू इश्माएल म्हणजे परमेश्वर ऐकतो असे ठेव, कारण प्रभूने तुझ्या दुःखाविषयी ऐकले आहे. |
396 | GEN 16:14 | तेव्हा तेथील विहिरीला बैर-लहाय-रोई असे नाव पडले; पाहा, ती कादेश व बेरेद यांच्या दरम्यान आहे. |
403 | GEN 17:5 | येथून पुढे तुझे नाव अब्राम असणार नाही, तर तुझे नाव अब्राहाम असे होईल. कारण मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता असे नेमले आहे. |
404 | GEN 17:6 | मी तुला भरपूर संतती देईन, आणि मी तुझ्यापासून नवीन राष्ट्रे उदयास आणीन, आणि तुझ्यापासून राजे उत्पन्न होतील. |
405 | GEN 17:7 | मी तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये आणि तुझ्या वंशजांमध्येही पिढ्यानपिढ्या कायम लागू राहील असा सनातन करार करीन, तो असा की, मी तुझा आणि तुझ्यानंतर तुझ्या वंशजांचा देव होईन. |
406 | GEN 17:8 | ज्या प्रदेशामध्ये तू राहत आहेस तो, म्हणजे कनान देश, मी तुला व तुझ्या वंशजांना कायमचे वतन म्हणून देईन, आणि मी तुमचा देव होईन.” |
413 | GEN 17:15 | देव अब्राहामाला म्हणाला, “तुझी पत्नी साराय, हिला येथून पुढे साराय असे संबोधू नको. त्या ऐवजी तिचे नाव सारा असे होईल. |
414 | GEN 17:16 | मी तिला आशीर्वादित करीन, आणि मी तुला तिच्यापासून मुलगा देईन. मी तिला आशीर्वादीत करीन, आणि ती अनेक राष्ट्रांची माता होईल. लोकांचे राजे तिच्यापासून निपजतील.” |
417 | GEN 17:19 | देव म्हणाला, “नाही! परंतु तुझी पत्नी सारा हिलाच मुलगा होईल, आणि त्याचे नाव तू इसहाक असे ठेव. मी त्याच्याशी निरंतरचा करार करीन; तो करार त्याच्यानंतर त्याच्या वंशजांसोबत निरंतर असेल. |
418 | GEN 17:20 | तू मला इश्माएलविषयी विचारलेस ते मी ऐकले आहे. पाहा, मी आतापासून पुढे त्यास आशीर्वाद देईन, आणि त्यास फलद्रुप करीन आणि त्यास बहुगुणित करीन. तो बारा सरदारांच्या वंशांचा पिता होईल, आणि मी त्यास एक मोठे राष्ट्र करीन. |
419 | GEN 17:21 | परंतु मी इसहाकाबरोबर माझा करार स्थापीन, ज्याला सारा पुढल्या वर्षी याच वेळी जन्म देईल.” |
435 | GEN 18:10 | त्यांच्यातील एक म्हणाला, “मी वसंतऋतूच्या वेळी तुझ्याकडे नक्की परत येईन, आणि पाहा तेव्हा तुझी पत्नी सारा हिला मुलगा होईल.” तेव्हा त्याच्यामागे असलेल्या तंबूच्या दारामागून सारेने हे ऐकले. |
438 | GEN 18:13 | परमेश्वर अब्राहामाला म्हणाला, “सारा का हसली? मी आता इतकी म्हातारी झाली असताना मला मुलगा होईल काय, असे ती का म्हणाली? |
439 | GEN 18:14 | परमेश्वरास काही अशक्य आहे काय? येत्या वसंतऋमध्ये, सांगितल्याप्रमाणे मी पुन्हा येईन. पुढील वर्षी साधारण याच वेळी सारा हिला मुलगा होईल.” |
443 | GEN 18:18 | कारण अब्राहामापासून खरोखर एक महान व समर्थ राष्ट्र होईल, आणि पृथ्वीवरील सगळी राष्ट्रे त्याच्यामुळे आशीर्वादित होतील. |
445 | GEN 18:20 | मग परमेश्वर म्हणाला, “सदोम व गमोरा यांच्या दुष्टाईचा आक्रोश मोठा आहे, आणि त्यांचे पाप फार गंभीर असल्या कारणाने, |
446 | GEN 18:21 | मी आता तेथे खाली जाईन आणि त्यांच्या पातकाचा जो बोभाटा माझ्या कानी आला आहे त्याप्रमाणेच त्यांची करणी आहे का हे पाहीन. तसे नसेल तर मला समजेल.” |
465 | GEN 19:7 | तो म्हणाला, “माझ्या बंधूनो, मी तुम्हास विनंती करतो, तुम्ही असे भयंकर वाईट काम करू नका. |
467 | GEN 19:9 | ते म्हणाले, “बाजूला हो!” ते असेही म्हणाले, “हा आमच्यात परराष्ट्रीय म्हणून राहण्यास आला. आणि आता हा आमचा न्यायाधीश बनू पाहत आहे! आता आम्ही तुझे त्यांच्यापेक्षा वाईट करू.” ते त्या मनुष्यास म्हणजे लोटाला अधिक जोराने लोटू लागले व दरवाजा तोडण्यास ते जवळ आले. |
470 | GEN 19:12 | मग ते पुरुष लोटाला म्हणाले, “तुझे दुसरे कोणी येथे आहे काय? जावई, तुझी मुले, तुझ्या मुली आणि तुझे जे कोणी या नगरात आहेत त्यांना येथून बाहेर काढ. |
473 | GEN 19:15 | मग पहाट झाल्यावर दूत लोटाला घाई करून म्हणाले, “ऊठ, या नगराला शिक्षा होणार आहे; तेव्हा तू, तुझी पत्नी व तुझ्या येथे असलेल्या दोन मुली यांना घेऊन नीघ म्हणजे मग या नगराच्या शिक्षेत तुमचा नाश होणार नाही.” |
477 | GEN 19:19 | माझा जीव वाचवून तू माझ्यावर मोठी दया दाखवली आहेस आणि तुझी कृपादृष्टी तुझ्या दासास प्राप्त झाली आहे, परंतु मी डोंगरापर्यंत पळून जाऊ शकणार नाही, कारण आपत्ती मला गाठेल व मी मरून जाईन. |
508 | GEN 20:12 | शिवाय ती खरोखर माझी बहीण आहे. ती माझ्या बापाची मुलगी आहे, पण माझ्या आईची ती मुलगी नाही आणि म्हणून ती माझी पत्नी झाली आहे. |
512 | GEN 20:16 | तो सारेला म्हणाला, “तुझा भाऊ अब्राहाम याला मी चांदीची एक हजार नाणी दिली आहेत. तुझ्यासोबत असलेल्या सर्व लोकांसमोर तुझी भरपाई करण्यासाठी ते आहेत, आणि या प्रकारे तू सर्वांसमोर पूर्णपणे निर्दोष ठरली आहेस.” |
521 | GEN 21:7 | आणखी ती असेही म्हणाली, “सारा या मुलाला स्तनपान देईल असे अब्राहामाला कोण म्हणाला असता? आणि तरीसुद्धा त्याच्या म्हातारपणात मला त्याच्यापासून मुलगा झाला आहे!” |
526 | GEN 21:12 | परंतु देव अब्राहामाला म्हणाला, “मुलाकरता व तुझ्या दासी करता दुःखी होऊ नकोस. तुला ती या बाबतीत जे काही सांगते, ते तिचे सर्व म्हणणे ऐक. कारण इसहाकाद्वारेच तुझ्या वंशाला नाव देण्यात येईल. |
535 | GEN 21:21 | तो पारानाच्या रानात राहिला आणि त्याच्या आईने त्यास मिसर देशातील मुलगी पत्नी करून दिली. |
544 | GEN 21:30 | त्याने उत्तर दिले, “तू ही कोकरे माझ्याकडून स्विकारशील तेव्हा ही विहीर मी खणली आहे असा तो पुरावा होईल.” |
562 | GEN 22:14 | तेव्हा अब्राहामाने त्या जागेला, “परमेश्वर पुरवठा करेल,” असे नाव दिले, आणि आजवर देखील, “परमेश्वराच्या डोंगरावर तो पुरवठा केला जाईल,” असे बोलले जाते. |
565 | GEN 22:17 | मी खरोखर तुला आशीर्वाद देईन व तुझे वंशज आकाशातल्या ताऱ्यांसारखे व समुद्र किनाऱ्यावरील वाळू इतके बहुतपट वाढवीनच वाढवीन; आणि तुझे वंशज आपल्या शत्रूच्या वेशीचा ताबा मिळवतील. |
585 | GEN 23:13 | देशातले लोक ऐकत असता तो एफ्रोनास म्हणाला, “परंतु जर तुझी इच्छा आहे, तर कृपा करून माझे ऐक. मी शेताची किंमत तुला देईन. माझ्याकडून त्याचे पैसे घे, आणि मग मी आपल्या मयतास तेथे पुरेन.” |
599 | GEN 24:7 | आकाशाचा देव परमेश्वर, ज्याने मला माझ्या वडिलाच्या घरातून व माझ्या नातेवाइकांच्या देशातून मला आणले व ज्याने बोलून, ‘मी हा देश तुझ्या संततीला देईन,’ असे शपथपूर्वक अभिवचन दिले, तो परमेश्वर आपल्या दूताला तुझ्या पुढे पाठवील, आणि तू तेथून माझ्या मुलासाठी पत्नी आणशील. |
602 | GEN 24:10 | मग त्या सेवकाने धन्याच्या उंटांपैकी दहा उंट घेतले आणि निघाला (त्याच्या धन्याची सर्व मालमत्ता त्याच्या हाती होती). त्याने आपल्या धन्याकडून सर्व प्रकारच्या भेटवस्तू आपल्याबरोबर देण्यासाठी घेतल्या. तो अराम-नहराईम प्रदेशातील नाहोराच्या नगरात गेला. |
612 | GEN 24:20 | म्हणून तिने घाईघाईने उंटांसाठी घागर कुंडात ओतली, आणि आणखी पाणी काढण्याकरिता ती धावत विहिरीकडे गेली, आणि याप्रमाणे तिने त्याच्या सगळ्या उंटांना पाणी पाजले. |
620 | GEN 24:28 | नंतर ती तरुण स्त्री पळत गेली आणि तिने या सर्व गोष्टींबद्दल आपल्या आईला व घरच्या सर्वांना सांगितले. |
635 | GEN 24:43 | मी येथे या झऱ्याजवळ उभा आहे, आणि असे होऊ दे की, जी मुलगी पाणी काढण्यास येईल आणि जिला मी म्हणेन, “मी तुला विनंती करतो, तू आपल्या घागरीतले थोडे पाणी मला प्यायला दे,” |
642 | GEN 24:50 | मग लाबान व बथुवेल यांनी उत्तर दिले, “ही गोष्ट परमेश्वराकडून आली आहे. आम्ही तुम्हास बरे किंवा वाईट काही बोलू शकत नाही. |
645 | GEN 24:53 | सेवकाने सोन्याचे दागिने व चांदीचे दागिने व वस्त्रे रिबकेला दिली. त्याने तिचा भाऊ व तिची आई यांनाही मोलवान देणग्या दिल्या. |
647 | GEN 24:55 | तेव्हा तिची आई व भाऊ म्हणाले, “रिबकेला आमच्याजवळ थोडे दिवस म्हणजे निदान दहा दिवस तरी राहू द्या. मग तिने जावे.” |
648 | GEN 24:56 | परंतु तो त्यांना म्हणाला, “मला थांबवून घेऊ नका, कारण परमेश्वराने माझा मार्ग यशस्वी केला आहे, मला माझ्या मार्गाने पाठवा जेणेकरून मी माझ्या धन्याकडे जाईन.” |
651 | GEN 24:59 | मग त्यांची बहीण रिबका, तिच्या दाईसोबत अब्राहामाचा सेवक व त्याची माणसे यांच्या बरोबर प्रवासास निघाली. |
652 | GEN 24:60 | त्यांनी रिबकेला आशीर्वाद दिला आणि तिला म्हटले, “आमच्या बहिणी, तू हजारो लाखांची आई हो, आणि तुझे वंशज त्यांचा द्वेष करणाऱ्यांच्या वेशीचा ताबा घेवोत.” |
654 | GEN 24:62 | इकडे इसहाक नेगेब येथे राहत होता आणि नुकताच बैर-लहाय-रोई विहिरीपासून परत आला होता. |
659 | GEN 24:67 | मग इसहाकाने मुलीला आपली आई सारा हिच्या तंबूत आणले. आणि त्याने रिबकेला स्विकारले, आणि ती त्याची पत्नी झाली, आणि त्याने तिच्यावर प्रेम केले. अशा रीतीने आपल्या आईच्या मरणानंतर इसहाक सांत्वन पावला. |
670 | GEN 25:11 | अब्राहामाच्या मृत्यूनंतर देवाने त्याचा मुलगा इसहाक याला आशीर्वादित केले आणि इसहाक बैर-लहाय-रोई जवळ राहत होता. |
696 | GEN 26:3 | या देशात उपरी म्हणून राहा आणि मी तुझ्याबरोबर असेन आणि मी तुला आशीर्वाद देईन; कारण हे सर्व देश मी तुझ्या वंशजाला देईन, आणि तुझ्या बाप अब्राहाम याला शपथ घेऊन जे वचन दिले आहे ते सर्व मी पूर्ण करीन. |
697 | GEN 26:4 | मी तुझे वंशज आकाशातील ताऱ्यांइतके बहुगुणित करीन आणि हे सर्व देश मी तुझ्या वंशजांना देईन. तुझ्या वंशजांद्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील. |
704 | GEN 26:11 | म्हणून अबीमलेखाने सर्व लोकांस ताकीद दिली आणि म्हणाला, “जो कोणी या मनुष्यास किंवा याच्या पत्नीला हात लावेल त्यास खचित जिवे मारण्यात येईल.” |