81 | GEN 4:1 | मनुष्याने त्याची पत्नी हव्वा हिच्यासोबत वैवाहिक संबंध केला. ती गर्भवती झाली आणि तिने काइनाला जन्म दिला. तेव्हा ती म्हणाली, परमेश्वराच्या साहाय्याने मला पुरुषसंतान लाभले आहे. |
140 | GEN 6:2 | तेव्हा मानवजातीच्या मुली आकर्षक आहेत असे देवपुत्रांनी पाहिले, त्यांच्यापैकी त्यांना ज्या आवडल्या त्या त्यांनी स्त्रिया करून घेतल्या. |
157 | GEN 6:19 | तसेच पृथ्वीवरील प्रत्येक जातीतील सजीव प्राण्यांपैकी दोन-दोन तुझ्याबरोबर जिवंत ठेवण्यासाठी तुझ्याबरोबर तू तारवात ने; ते नर व मादी असावेत. |
162 | GEN 7:2 | प्रत्येक शुद्ध जातीच्या प्राण्यांपैकी नर व माद्यांच्या सात सात जोड्या घे, इतर शुद्ध नाहीत त्या प्राण्यापैकी, नर व मादी अशी दोन दोन घे. |
195 | GEN 8:11 | ते कबुतर संध्याकाळी त्याच्याकडे परत आले. आणि पाहा, त्याच्या चोचीत जैतून झाडाचे नुकतेच तोडलेले पान होते. यावरुन पृथ्वीवरील पाणी कमी झाले असल्याचे नोहाला समजले. |
240 | GEN 10:5 | यांच्यापैकी समुद्र किनारपट्टीवरील लोक वेगळे झाले आणि आपापल्या भाषेनुसार, कुळानुसार त्यांनी देश वसवले. |
269 | GEN 11:2 | ते पूर्वेकडे प्रवास करत असताना त्यांना शिनार देशात एक मैदान लागले आणि त्यांनी तेथेच वस्ती केली. |
331 | GEN 13:12 | अब्राम कनान देशातच राहिला आणि लोट यार्देनेच्या मैदानातल्या शहरामध्ये जाऊन राहिला; लोट दूर सदोमाला गेला आणि तेथेच त्याने आपला तंबू ठोकला. |
396 | GEN 16:14 | तेव्हा तेथील विहिरीला बैर-लहाय-रोई असे नाव पडले; पाहा, ती कादेश व बेरेद यांच्या दरम्यान आहे. |
410 | GEN 17:12 | पिढ्यानपिढ्या तुमच्यातील प्रत्येक पुरुषाची त्याच्या जन्मानंतर आठ दिवसानी सुंता करावी. मग तो पुरुष तुझ्या कुटुंबात जन्मलेला असो किंवा तो तुझ्या वंशातला नसून परक्यापासून पैसा देऊन घेतलेला असो. |
475 | GEN 19:17 | त्यांनी त्यांना बाहेर आणल्यावर त्यातील एक पुरुष म्हणाला, “आता पळा व तुमचे जीव वाचवा, नगराकडे मागे वळून पाहू नका आणि या मैदानात कोणत्याही ठिकाणी थांबू नका; डोंगराकडे निसटून जा म्हणजे तुमचा नाश होणार नाही.” |
510 | GEN 20:14 | अबीमलेखाने अब्राहामाला सारा परत दिली; तसेच त्याने त्यास मेंढरे, बैल व दास-दासीही दिल्या. |
528 | GEN 21:14 | अब्राहाम सकाळीच लवकर उठला, भाकरी व पाण्याची कातडी पिशवी घेतली आणि हागारेला देऊन तिच्या खांद्यावर ठेवली. त्याने तिचा मुलगा तिला दिला आणि तिला पाठवून दिले. ती गेली आणि बैर-शेबाच्या रानामध्ये भटकत राहिली. |
532 | GEN 21:18 | ऊठ, मुलाला उचलून घे. आणि त्यास धैर्य दे, मी त्याच्यापासून एक मोठे राष्ट्र करीन.” |
541 | GEN 21:27 | म्हणून अब्राहामाने मेंढरे व बैल घेतले आणि अबीमलेखास दिले आणि त्या दोन मनुष्यांनी करार केला. |
545 | GEN 21:31 | तेव्हा त्याने त्या जागेला बैर-शेबा असे नाव दिले, कारण त्या ठिकाणी त्या दोघांनी शपथ वाहून वचन दिले. |
546 | GEN 21:32 | त्यांनी बैर-शेबा येथे करार केल्यानंतर अबीमलेख व त्याचा सेनापती पिकोल हे पलिष्ट्यांच्या देशात परत गेले. |
547 | GEN 21:33 | अब्राहामाने बैर-शेबा येथे एक एशेल झाड लावले. तेथे सनातन देव परमेश्वर याचे नाव घेऊन त्याने प्रार्थना केली. |
567 | GEN 22:19 | मग अब्राहाम आपल्या तरुण सेवकाकडे परत आला आणि अब्राहाम, इसहाक व त्याचे सेवक असे सर्व मिळून बैर-शेबाला गेले, आणि तो बैर-शेबा येथे राहिला. |
585 | GEN 23:13 | देशातले लोक ऐकत असता तो एफ्रोनास म्हणाला, “परंतु जर तुझी इच्छा आहे, तर कृपा करून माझे ऐक. मी शेताची किंमत तुला देईन. माझ्याकडून त्याचे पैसे घे, आणि मग मी आपल्या मयतास तेथे पुरेन.” |
602 | GEN 24:10 | मग त्या सेवकाने धन्याच्या उंटांपैकी दहा उंट घेतले आणि निघाला (त्याच्या धन्याची सर्व मालमत्ता त्याच्या हाती होती). त्याने आपल्या धन्याकडून सर्व प्रकारच्या भेटवस्तू आपल्याबरोबर देण्यासाठी घेतल्या. तो अराम-नहराईम प्रदेशातील नाहोराच्या नगरात गेला. |
654 | GEN 24:62 | इकडे इसहाक नेगेब येथे राहत होता आणि नुकताच बैर-लहाय-रोई विहिरीपासून परत आला होता. |
670 | GEN 25:11 | अब्राहामाच्या मृत्यूनंतर देवाने त्याचा मुलगा इसहाक याला आशीर्वादित केले आणि इसहाक बैर-लहाय-रोई जवळ राहत होता. |
677 | GEN 25:18 | त्याचे वंशज हवीलापासून ते शूरापर्यंत वस्ती करून राहिले, अश्शूराकडे जाताना मिसराजवळ हा देश आहे. ते एकमेकांबरोबर वैराने राहत होते. |
703 | GEN 26:10 | अबीमलेख म्हणाला, “तू आम्हांला हे काय केलेस? कारण आमच्या लोकांतून कोणीही तुझ्या पत्नीबरोबर सहज लैंगिक संबंध केला असता, आणि त्यामुळे तू आमच्यावर दोष आणला असतास.” |
716 | GEN 26:23 | नंतर तेथून इसहाक बैर-शेबा येथे गेला. |
719 | GEN 26:26 | नंतर गराराहून अबीमलेख, त्याचा मित्र अहुज्जाथ व त्याच्या सैन्याचा सेनापती पिकोल हे त्याच्याकडे गेले. |
726 | GEN 26:33 | तेव्हा इसहाकाने त्या विहिरीचे नाव शेबा ठेवले, आणि त्या नगराला अजूनही बैर-शेबा नाव आहे. |
727 | GEN 26:34 | एसाव चाळीस वर्षांचा झाल्यावर त्याने हेथी स्त्रियांशी लग्ने केली, एकीचे नाव होते यहूदीथ, ही बैरी हित्तीची मुलगी, आणि दुसरीचे नाव होते बासमथ, ही एलोन हित्तीची मुलगी होती. |
776 | GEN 28:2 | ऊठ, तू पदन-अरामात तुझ्या आईचा बाप बथुवेल याच्या घरी जा. आणि तुझ्या आईचा भाऊ लाबान त्याच्या मुलींपैकीच एकीला पत्नी करून घे. |
784 | GEN 28:10 | याकोबाने बैर-शेबा सोडले व तो हारानाला गेला. |
785 | GEN 28:11 | तो एका ठिकाणी आला आणि सूर्य मावळला म्हणून त्याने तेथे रात्रभर मुक्काम केला. तेथे रात्री झोपताना त्याने त्या ठिकाणच्या धोंड्यांपैकी एक धोंडा घेतला, तो त्याच्या डोक्याखाली ठेवला आणि त्या ठिकाणी झोप घेण्यासाठी खाली पडून राहिला. |
842 | GEN 30:11 | लेआ म्हणाली, “मी सुदैवी आहे.” तेव्हा तिने त्याचे नाव गाद ठेवले. |
863 | GEN 30:32 | परंतु आज मला तुमच्या सगळ्या कळपात फिरून त्यातील मेंढरांपैकी ठिपकेदार व प्रत्येक काळे व तपकरी असलेली मेंढरे व शेळ्यांतून तपकरी आणि काळ्या रंगाची ही मी बाजूला करीन; हेच माझे वेतन असेल. |
866 | GEN 30:35 | परंतु त्याच दिवशी लाबानाने ठिपकेदार व बांडे एडके तसेच ठिपकेदार व बांड्या शेळ्या आणि मेंढरापैकी काळी मेंढरे कळपातून काढून लपवली, गुपचूप ती आपल्या मुलांच्या हवाली केली व त्यावर लक्ष ठेवून त्यांना सांभाळण्यास सांगितले; |
889 | GEN 31:15 | आम्ही परक्या असल्यासारखे त्याने आम्हांला वागवले नाही काय? त्याने आम्हास तुम्हास विकून टाकले, आणि आमचे पूर्ण पैसे खाऊन टाकले आहेत. |
900 | GEN 31:26 | लाबान याकोबाला म्हणाला, “तू मला हे काय केले? तू मला फसवलेस. आणि युद्धकैदी केलेल्या स्त्रियांप्रमाणे तू माझ्या मुलींना का घेऊन आलास? |
944 | GEN 32:16 | तसेच तीस दुभत्या सांडणी व त्यांची शिंगरे, चाळीस गाई व दहा बैल, वीस गाढवी व दहा गाढवे घेतली. |
1170 | GEN 39:20 | योसेफाच्या धन्याने त्यास धरले आणि जेथे राजाच्या कैद्यांना कोंडत असत त्या तुरुंगात टाकले. योसेफ त्या तुरुंगात राहिला. |
1172 | GEN 39:22 | त्या अधिकाऱ्याने तुरुंगातील सर्व कैद्यांना योसेफाच्या स्वाधीन केले. ते तेथे जे काही करीत होते, त्याचा योसेफ प्रमुख होता. |
1176 | GEN 40:3 | आणि त्याने त्यांना पहारेकऱ्यांचा सरदाराच्या वाड्यात, योसेफ कैदेत होता त्या ठिकाणी, तुरुंगात टाकले. |
1177 | GEN 40:4 | तेव्हा पहारेकऱ्यांच्या सरदाराने त्या दोघाही अपराध्यांना योसेफाच्या ताब्यात देऊन त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले. ते दोघे काही काळपर्यंत कैदेत राहिले. |
1180 | GEN 40:7 | तेव्हा, त्याच्या धन्याच्या वाड्यात जे फारोचे सेवक त्याच्या बरोबर कैदेत होते, त्यांना त्याने विचारले, “आज तुम्ही असे दुःखी का दिसता?” |
1204 | GEN 41:8 | दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यावर फारो राजा त्या स्वप्नांमुळे चिंतेत पडून बेचैन झाला. त्याने मिसर देशातील जादूगार व ज्ञान्यांना बोलावले. फारोने आपली स्वप्ने त्यांना सांगितली. परंतु त्यांच्यातील कोणालाच त्या स्वप्नांचा अर्थ सांगता आला नाही. |
1208 | GEN 41:12 | तेथे कोणी इब्री तरुण आमच्याबरोबर कैदेत होता. तो संरक्षण दलाच्या सरदाराचा दास होता. त्यास आम्ही आमची स्वप्ने सांगितली त्याने त्याचे स्पष्टीकरण केले. त्याने आमच्या प्रत्येकाच्या स्वप्नांचा अर्थ सांगितला. |
1278 | GEN 42:25 | मग आपल्या भावांच्या पोत्यात धान्य भरण्यास सांगितले, तसेच त्या धान्याबद्दल त्याच्या भावांनी दिलेला पैसा ज्याच्या त्याच्या पोत्यात भरण्यास सांगितले, आणि त्यांच्या परतीच्या प्रवासात वाटेत खाण्यासाठी अन्नसामग्री देण्यास सेवकांना सांगतिले. त्यांच्यासाठी तसे करण्यात आले. |
1280 | GEN 42:27 | ते भाऊ रात्रीच्या मुक्कामासाठी एका ठिकाणी थांबले. तेव्हा त्यांच्यापैकी एकाने त्याच्या गाढवाला थोडेसे धान्य देण्यासाठी आपली गोणी उघडली, तेव्हा त्याने धान्यासाठी दिलेले पैसे त्यास त्या गोणीत आढळले. |
1281 | GEN 42:28 | तेव्हा तो आपल्या इतर भावांना म्हणाला, “पाहा! धान्यासाठी मी दिलेले हे पैसे कोणीतरी पुन्हा माझ्या गोणीत ठेवले आहेत!” तेव्हा ते भाऊ अतिशय घाबरले, ते एकमेकांस म्हणाले, “देव आपल्याला काय करत आहे.” |
1288 | GEN 42:35 | मग ते भाऊ आपापल्या पोत्यातून धान्य काढावयास गेले. तेव्हा प्रत्येकाच्या पोत्यात पैशाची पिशवी मिळाली. त्या पैशाच्या पिशव्या पाहून ते भाऊ व त्यांचा बाप हे अतिशय घाबरले. |
1302 | GEN 43:11 | मग त्यांचा बाप इस्राएल म्हणाला, “जर असे आहे तर आता हे करा, त्या अधिकाऱ्याकरता आपल्या देशातले चांगले निवडक पदार्थ म्हणजे थोडा मध, मसाल्याचे पदार्थ व बोळ, पिस्ते, बदाम, डिंक, गंधरस वगैरे तुमच्या गोण्यांत घेऊन त्यास बक्षीस म्हणून घेऊन जा.” |
1303 | GEN 43:12 | या वेळी दुप्पटीपेक्षा जास्त पैसा तुमच्या हाती घ्या. मागच्या वेळी तुम्ही दिलेला जो पैसा तुमच्या गोण्यामधून परत आला तोही परत घेऊन जा. कदाचित काही चूक झाली असेल. |
1306 | GEN 43:15 | अशा रीतीने त्या मनुष्यांनी भेटवस्तू घेतल्या. त्यांनी त्यांच्या हातात दुप्पट पैसा आणि बन्यामिनाला घेतले. ते उठले आणि खाली मिसरात गेले व योसेफापुढे उभे राहिले. |
1309 | GEN 43:18 | योसेफाच्या घरी नेल्यावर ते भाऊ फार घाबरले. ते म्हणाले, “मागच्या वेळी आपल्या गोणीत आपण दिलेले पैसे परत ठेवण्यात आले म्हणून आपणांस येथे आणले आहे, त्यावरून आपणास दोषी ठरवण्याची संधी शोधत आहे. तो आपली गाढवे घेईल व आपल्याला गुलाम करील असे वाटते.” |
1312 | GEN 43:21 | आम्ही घरी परत जाताना एका मुक्कामाच्या ठिकाणी आमची पोती उघडली तेव्हा पाहा, प्रत्येक मनुष्याचा पैसा ज्याच्या गोणीत पूर्ण वजनासह जसाच्या तसाच होता. आमच्या पोत्यात पैसे कसे आले हे आम्हांला माहीत नाही. परंतु ते सगळे पैसे तुम्हास परत देण्यासाठी आम्ही आमच्यासोबत आणले आहेत. |
1313 | GEN 43:22 | आणि आता या वेळी आणखी धान्य विकत घेण्यासाठी अधिक पैसे आणले आहेत, आमच्या गोणीत पैसे कोणी ठेवले हे आम्हांला ठाऊक नाही.” |
1314 | GEN 43:23 | परंतु कारभाऱ्याने उत्तर दिले, “तुम्हास शांती असो, भिऊ नका. तुमच्या व तुमच्या पित्याच्या देवाने तुमच्या गोणीत ते पैसे ठेवले असतील. मला तुमचे पैसे मिळाले आहेत.” नंतर त्या कारभाऱ्याने शिमोनाला तुरुंगातून सोडवून घरी आणले. |
1315 | GEN 43:24 | मग त्या कारभाऱ्याने त्या भावांना योसेफाच्या घरी आणले. त्याने त्यांना पाय धुण्यासाठी पाणी दिले व त्यांनी पाय धुतले. मग त्याने त्यांच्या गाढवांना वैरण दिली. |
1326 | GEN 44:1 | मग योसेफाने आपल्या कारभाऱ्याला आज्ञा देऊन म्हटले, “या लोकांच्या गोणीमधे जेवढे अधिक धान्य मावेल व त्यांना नेता येईल तेवढे भर. आणि त्यासोबत प्रत्येकाचे पैसेही त्या पोत्यात ठेव. |
1327 | GEN 44:2 | सर्वांत धाकट्याच्या गोणीत धान्याच्या पैशाबरोबर माझा विशेष चांदीचा प्यालाही ठेव.” योसेफाच्या कारभाऱ्याने त्याच्या आज्ञेप्रमाणे सर्वकाही केले. |
1333 | GEN 44:8 | पाहा, मागे आमच्या गोणीत मिळालेला पैसाही आम्ही कनान देशातून तुमच्याकडे परत आणला. तेव्हा आपल्या धन्याच्या घरातून आम्ही सोने किंवा चांदी कशी चोरणार? |
1334 | GEN 44:9 | या पेक्षा आम्हापैकी कोणाच्या पोत्यात तुम्हास जर तो चांदीचा प्याला मिळाला तर तो भाऊ मरेल. तुम्ही त्यास मारून टाकावे आणि मग आम्ही सर्वजण तुमच्या धन्याचे गुलाम होऊ.” |
1372 | GEN 45:13 | मिसर देशातील माझे वैभव आणि तुम्ही येथे जे जे पाहिले आहे त्यासंबंधी माझ्या बापाला सांगा. आता लवकर जाऊन माझ्या बापाला माझ्याकडे खाली घेऊन या.” |
1388 | GEN 46:1 | इस्राएलाने, आपले जे काही होते त्याबरोबर प्रवासास सुरुवात केली आणि तो बैर-शेबास गेला. तेथे त्याने आपला बाप इसहाक याच्या देवाला अर्पणे वाहिली. |
1392 | GEN 46:5 | मग याकोब बैर-शेबाहून उठला. इस्राएलाच्या मुलांनी आपला बाप, आपल्या स्त्रिया व मुले या सर्वांना फारोने पाठवलेल्या गाड्यांतून मिसरला आणले. |
1423 | GEN 47:2 | त्याने आपल्याबरोबर फारोसमोर जाण्यासाठी आपल्या भावांपैकी पाच जणांना घेतले आणि त्यांची ओळख करून दिली. |
1435 | GEN 47:14 | योसेफाने मिसर आणि कनान देशातील रहिवाशांना अन्नधान्य विकून त्यांच्याकडील सर्व पैसा गोळा केला. त्यानंतर योसेफाने तो पैसा फारोच्या राजवाड्यात आणला. |
1436 | GEN 47:15 | काही काळाने मिसर व कनान देशातील लोकांचे पैसे संपून गेले, त्यामुळे मिसरचे लोक योसेफाकडे येऊन म्हणाले, “आम्हास अन्न द्या! आमचे सर्व पैसे संपले आहेत म्हणून आम्ही तुमच्यासमोरच का मरावे?” |
1437 | GEN 47:16 | परंतु योसेफ म्हणाला, “जर तुमचे पैसे संपले आहेत, तर तुम्ही मला तुमची गुरेढोरे द्या आणि मग मी तुमच्या गुराढोरांच्या बदल्यात तुम्हास धान्य देईन.” |
1439 | GEN 47:18 | परंतु त्या वर्षानंतर, पुढील वर्षी लोक योसेफाकडे जाऊन म्हणाले, “आमच्या धन्यापासून आम्ही काही लपवत नाही. आपणास माहीत आहे की, आमच्याकडे पैसे उरलेले नाहीत आणि आमची गुरेढोरेही धन्याची झाली आहेत. तेव्हा आमच्या धनाच्यासमोर आमची शरीरे व आमच्या जमिनी याशिवाय दुसरे काहीही उरलेले नाही. |
1443 | GEN 47:22 | योसेफाने याजकांच्या मालकीच्या जमिनी मात्र विकत घेतल्या नाहीत. फारो याजकांना त्यांच्या कामाबद्दल पगार देत होता. त्या पैशातून ते आपणासाठी अन्नधान्य विकत घेत असत म्हणून त्यांच्यावर आपल्या जमिनी विकण्याची वेळ आली नाही. |
1480 | GEN 49:6 | माझ्या जिवा, त्यांच्या गुप्त मसलतींमध्ये गुंतू नको; त्यांच्या गुप्त बैठकांमध्ये सामील होऊ नको, त्यांचे हे बेत माझ्या जिवाला मान्य नाहीत. त्यांनी त्यांच्या रागाच्या भरात पुरुषांची कत्तल केली. आपल्या रागाने बैलांच्या पायांच्या शिरा तोडल्या. |
1509 | GEN 50:2 | योसेफाने आपल्या सेवकांतील वैद्यांना आपल्या वडिलाच्या प्रेताला मसाला लावण्याची व भरण्याची आज्ञा केली. तेव्हा त्यांनी खास मिसरच्या पद्धतीने इस्राएलाचे प्रेत मसाला लावून, भरून तयार केले. |
1516 | GEN 50:9 | तो लोकांचा खूप मोठा समूह होता. सैनिकांची एक पलटणही घोड्यांवर व रथांत बसून मोठ्या संख्येने योसेफाबरोबर गेली. |
1533 | GEN 50:26 | योसेफ एकशे दहा वर्षांचा झाल्यावर मिसरमध्ये मरण पावला. वैद्यांनी त्याच्या शरीराला मसाला लावून ते पुरण्यासाठी तयार केले व ते मिसर देशामध्ये शवपेटीत ठेवले. |
1561 | EXO 2:6 | तिने ती पेटी उघडली तेव्हा तिला तिच्यात एक लहान बाळ दिसले. ते बाळ रडत होते. तिला त्याचा कळवळा आला, ती म्हणाली, “खात्रीने हे इब्र्याच्या मुलांपैकी आहे.” |
1670 | EXO 6:14 | मोशे व अहरोन यांच्या पूर्वजांपैकी प्रमुख पुरुषांची नावे अशीः इस्राएलाचा ज्येष्ठ पुत्र रऊबेन. त्याची मुले हनोख, पल्लू, हेस्रोन व कर्मी. हे रऊबेनाचे कुळ. |
1749 | EXO 9:6 | दुसऱ्या दिवशी परमेश्वराने ही गोष्ट केली आणि मिसरमधील सर्व गुरे मरण पावली. परंतु इस्राएल लोकांच्या गुरांपैकी एकही मरण पावले नाही. |
1750 | EXO 9:7 | फारोने बारकाईने चौकशी केली आणि पाहा, इस्राएल लोकांच्या जनावरांपैकी एकही मरण पावले नव्हते. तरीपण फारोचे मन कठीणच राहिले. त्याने इस्राएल लोकांस जाऊ दिले नाही. |
1763 | EXO 9:20 | फारोच्या सेवकांपैकी काहींना परमेश्वराच्या संदेशाची भीती वाटली त्यांनी लगेच आपली गुरेढोरे व गुलाम यांना आसऱ्याला घरी आणले व सुरक्षित जागी ठेवले. |
1768 | EXO 9:25 | त्या गारांच्या वादळाच्या माऱ्याने मिसर देशात, मनुष्ये, गुरेढोरे वगैरे जे काही वनांत होते त्या सर्वांवर गारांचा मारा झाला. शेतांतील सर्व वनस्पतींवर मारा झाला. तसेच वनांतील सर्व मोठमोठी झाडे मोडून पडली. |
1829 | EXO 12:12 | आज रात्री मी मिसर देशात फिरेन आणि त्यातील मनुष्य व पशू या सर्वांचे प्रथम जन्मलेले मी मारून टाकीन, आणि मिसर देशातील सर्व दैवतांना शिक्षा करीन. मी परमेश्वर आहे. |
1846 | EXO 12:29 | मध्यरात्री असे झाले की मिसर देशातील सिंहासनारूढ असलेल्या फारोच्या ज्येष्ठ पुत्रापासून तर तुरुंगात पडलेल्या कैद्याच्या ज्येष्ठ पुत्रापर्यंत सर्व आणि तसेच गुराढोरांपैकी सर्व प्रथम वत्स परमेश्वराने मारून टाकले. |
1862 | EXO 12:45 | परंतु उपरा मनुष्य किंवा मोलकरी ह्यांपैकी कोणीही ते खाऊ नये. |
1899 | EXO 14:9 | फारोच्या लष्करात पुष्कळ घोडेस्वार व रथ होते. मिसरी सैन्याने त्यांचा पाठलाग केला व इस्त्राएल लोकांनी लाल समुद्र व बआल-सफोनाच्या दरम्यान पीहहीरोथ येथे तळ दिला होता तेथे त्यांना गाठले. |
1900 | EXO 14:10 | फारो व मिसरी सैन्य आपणाकडे येताना इस्राएल लोकांनी पाहिले, तेव्हा ते अतिशय घाबरले; आणि मदतीसाठी ते परमेश्वराचा धावा करू लागले. |
1907 | EXO 14:17 | आणि पाहा, मी स्वतः मिसऱ्यांची मने कठीण करीन आणि ते तुमचा पाठलाग करतील. आणि फारो व त्याचे सर्व सैन्य, स्वार व रथ यांचा पराभव केल्याने माझा महिमा प्रगट होईल. |
1914 | EXO 14:24 | तेव्हा त्या दिवशी भल्या पहाटे परमेश्वराने मेघस्तंभातून व अग्निस्तंभातून खाली मिसराच्या सैन्याकडे पाहिले आणि त्यांचा गोंधळ उडवून त्यांचा पराभव केला. |
1918 | EXO 14:28 | पाणी पूर्ववत झाले व त्याने घोडे, रथ व स्वारांना गडप केले आणि इस्राएल लोकांचा पाठलाग करणाऱ्या फारोच्या सर्व सैन्याचा नाश झाला, त्यांच्यातले कोणीही वाचले नाही. |
1928 | EXO 15:7 | तुझ्या वैभवशाली सामर्थ्याने तू तुझ्याविरूद्ध बंड करून उठणाऱ्यांचा नाश करतोस; अग्नीने वाळलेल्या गवताच्या काड्या जाळाव्या तसे तू त्यांना तुझ्या रागाने जाळून भस्म करतोस. |
1936 | EXO 15:15 | मग अदोमाचे अधिकारी हैराण झाले. मवाबाचे नायक भीतीने थरथर कापत आहेत आणि कनानी लोक गलित झाले आहेत. |
1947 | EXO 15:26 | तू आपला देव परमेश्वर याचे वचन मनःपूर्वक ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे योग्य ते करशील, त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील तर मिसरी लोकांवर ज्या व्याधी मी पाठवल्या त्यापैकी एकही तुजवर पाठविणार नाही. कारण मी तुला व्याधी मुक्त करणारा परमेश्वर आहे. |
1967 | EXO 16:19 | मोशेने लोकांस सांगितले, “कोणीही यापैकी काहीएक सकाळपर्यंत ठेवू नये.” |
1989 | EXO 17:5 | परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू इस्राएल लोकांपुढे जा. त्यांच्यापैकी काही वडील माणसे तुजबरोबर घे. नील नदीच्या पाण्यावर तू जी काठी आपटली होतीस ती हाती घेऊन लोकांच्या पुढे चाल. |
2069 | EXO 20:17 | “तू आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नकोस; आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीचा लोभ धरू नकोस; आपल्या शेजाऱ्याचा दासदासी, बैल, गाढव, किंवा त्याच्या कोणत्याही वस्तूचा लोभ धरु नकोस.” |