Wildebeest analysis examples for:   mar-mar   “Word,    February 11, 2023 at 19:02    Script wb_pprint_html.py   by Ulf Hermjakob

11  GEN 1:11  देव बोलला, “हिरवळ, बीज देणाऱ्या वनस्पती, आणि आपआपल्या जातीप्रमाणे, ज्यात त्याचे बीज आहे अशी फळे देणारी फळझाडे, ही पृथ्वीवर येवोत.” आणि तसेच झाले.
78  GEN 3:22  परमेश्वर देव म्हणाला, “पाहा, मनुष्य आपल्यातल्या एका सारखा होऊन त्यास बरे व वाईट समजू लागले आहे. तर आता त्यास त्याच्या हातांनी जीवनाच्या झाडावरून ते फळ घेऊन खाऊ देऊ नये, आणि जर का तो ते फळ खाईल तर मग सदासर्वकाळ तो जिवंत राहील.”
161  GEN 7:1  नंतर परमेश्वर नोहाला म्हणाला, “चल, तू आणि तुझ्या कुटुंबातील सर्वांनी तारवात यावे, कारण या पिढीमध्ये तूच मला नीतिमान दिसला आहेस.
200  GEN 8:16  “तू, तुझी पत्नी, तुझी मुले व तुझ्या मुलांच्या स्त्रिया यांना तुझ्याबरोबर घेऊन तारवाच्या बाहेर ये.
270  GEN 11:3  ते एकमेकांना म्हणाले, “चला, आपण विटा करू व त्या पक्क्या भाजू.” त्यांच्याकडे बांधकामासाठी दगडाऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर होते.
271  GEN 11:4  मग लोक म्हणाले, “चला, आपण आपल्यासाठी नगर बांधू आणि ज्याचे शिखर आकाशापर्यंत पोहचेल असा उंच बुरूज बांधू, आणि आपण आपले नाव होईल असे करू या. आपण जर असे केले नाही, तर पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होईल.”
273  GEN 11:6  परमेश्वर देव म्हणाला, “पाहा, हे सर्व लोक एक असून, एकच भाषा बोलतात आणि ही तर त्यांची सुरुवात आहे! लवकरच, जे काही करण्याचा त्यांचा हेतू आहे ते करणे त्यांना मुळीच अशक्य होणार नाही.
356  GEN 14:19  त्याने अब्रामाला आशीर्वाद देऊन म्हटले, “अब्रामा, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्नकर्ता परात्पर देव तुला आशीर्वाद देवो.
362  GEN 15:1  या गोष्टी घडल्यानंतर अब्रामाला दृष्टांतात परमेश्वराचे वचन आले. तो म्हणाला, “अब्रामा, भिऊ नको. मी तुझे संरक्षण करीन आणि तुला फार मोठे प्रतिफळ देईन.”
402  GEN 17:4  “पाहा, तुझ्यासोबत माझा करार असा आहे: तू अनेक राष्ट्रांचा महान पिता होशील.
428  GEN 18:3  तो म्हणाला, “प्रभू, जर माझ्यावर तुमची कृपादृष्टी असेल तर तुझ्या सेवकाला सोडून पुढे जाऊ नका.
440  GEN 18:15  नंतर सारा नाकारून म्हणाली, “मी हसले नाही,” कारण ती फार घाबरली होती. त्याने उत्तर दिले, “नाही, तू हसलीसच.”
455  GEN 18:30  तो म्हणाला, “प्रभू, कृपा करून तुला राग न यावा म्हणजे मी बोलेन. तेथे फक्त तीसच मिळाले तर?” परमेश्वर म्हणाला, “जर तीस चांगले लोक असतील तरीही मी तसे करणार नाही.”
457  GEN 18:32  शेवटी तो म्हणाला, “प्रभू, कृपा करून माझ्यावर रागावू नकोस, मी शेवटी एकदाच बोलतो. कदाचित तुला तेथे दहाच लोक मिळाले तर?” परमेश्वर म्हणाला, “त्या दहांकरताही मी नगराचा नाश करणार नाही.”
460  GEN 19:2  तो म्हणाला, “माझ्या स्वामी, मी तुम्हास विनंती करतो की, कृपा करून तुम्ही आपल्या सेवकाच्या घरात या, आपले पाय धुवा, आणि आजची रात्र मुक्काम करा.” मग तुम्ही लवकर उठून तुमच्या मार्गाने जा. पण ते म्हणाले, “नाही, आम्ही रात्र नगरातील चौकात घालवू.”
472  GEN 19:14  मग लोट बाहेर गेला व ज्या मनुष्यांनी त्याच्या मुलींशी लग्न केले होते त्या आपल्या जावायांना तो म्हणाला, “उठा, तुम्ही, लवकर या ठिकाणातून बाहेर पडा; कारण परमेश्वर देव या नगराचा नाश करणार आहे.” परंतु लोट गंमत करत आहे असे त्याच्या जावयांना वाटले.
473  GEN 19:15  मग पहाट झाल्यावर दूत लोटाला घाई करून म्हणाले, “ऊठ, या नगराला शिक्षा होणार आहे; तेव्हा तू, तुझी पत्नी व तुझ्या येथे असलेल्या दोन मुली यांना घेऊन नीघ म्हणजे मग या नगराच्या शिक्षेत तुमचा नाश होणार नाही.”
500  GEN 20:4  परंतु अबीमलेख तिच्याजवळ गेला नव्हता. तो म्हणाला, “प्रभू, तू नीतिमान राष्ट्राचाही नाश करणार काय?
511  GEN 20:15  अबीमलेख म्हणाला, “पाहा, माझा हा सर्व देश तुझ्यासमोर आहे; तुला बरे वाटेल तेथे तू राहा.”
531  GEN 21:17  देवाने मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकला आणि देवाचा दूत स्वर्गातून हागारेला हाक मारून म्हणाला, “हागारे, तुला काय झाले? भिऊ नकोस, तुझा मुलगा जेथे आहे तेथून त्याचा आवाज देवाने ऐकला आहे
559  GEN 22:11  परंतु तेवढ्यात, परमेश्वराच्या दूताने स्वर्गातून हाक मारून त्यास म्हटले, “अब्राहामा, अब्राहामा!” अब्राहामाने उत्तर दिले, “मी येथे आहे.”
583  GEN 23:11  “नाही, माझे स्वामी, माझे ऐका. मी ते शेत आणि त्यामध्ये असलेली गुहा तुम्हास देतो. येथे माझ्या लोकांच्या मुलांसमक्ष मी ते शेत व ती गुहा मी तुम्हास देतो. तुमच्या मृताला पुरण्यास मी ते तुम्हास देतो.”
637  GEN 24:45  मी माझ्या मनात बोलणे संपण्याच्या आत पाहा रिबका खांद्यावर घागर घेऊन बाहेर आली. ती विहिरीत खाली उतरली आणि पाणी काढले. मग मी तिला म्हणालो, “मुली, कृपा करून मला थोडे पाणी प्यायला दे.”
691  GEN 25:32  एसाव म्हणाला, “पाहा, मी मरायला लागलो आहे. या ज्येष्ठपणाच्या हक्काचा मला काय उपयोग आहे?”
692  GEN 25:33  याकोब म्हणाला, “प्रथम, तू माझ्याशी शपथ घे.” तेव्हा एसावाने तशी शपथ घेतली आणि अशा रीतीने त्याने आपल्या ज्येष्ठपणाचा हक्क याकोबाला विकला.
765  GEN 27:37  इसहाकाने एसावास उत्तर दिले आणि म्हणाला “पाहा, मी त्यास तुझ्यावर धनीपणा करण्याचा अधिकार दिला आहे, आणि तुझे सर्व बंधू त्याचे सेवक होतील. आणि त्यास मी धान्य व नवा द्राक्षरस दिला आहे. माझ्या मुला, मी तुझ्यासाठी काय करू.”
767  GEN 27:39  मग त्याचा बाप इसहाकाने उत्तर दिले आणि त्यास म्हणाला, “पाहा, जेथे पृथ्वीवरील समृद्धी व आकाशातले दंव पडते त्या ठिकाणापासून दूर तुझी वस्ती होईल.
770  GEN 27:42  रिबकाला तिच्या वडील मुलाचे शब्द कोणी सांगितले. म्हणून तिने आपला धाकटा मुलगा याकोब याला निरोप पाठवून बोलावले आणि मग ती त्यास म्हणाली, “पाहा, तुझा भाऊ एसाव तुला ठार मारण्याचा बेत करीत आहे व स्वतःचे समाधान करून घेत आहे.
801  GEN 29:5  मग तो त्यांना म्हणाला, “नाहोराचा नातू लाबान याला तुम्ही ओळखता का?” ते म्हणाले, “होय, आम्ही त्यास ओळखतो.”
834  GEN 30:3  ती म्हणाली, “पाहा, माझी दासी बिल्हा आहे. तुम्ही तिच्या जवळ जा म्हणजे मग ती माझ्या मांडीवर मुलाला जन्म देईल व तिजपासून मलाही मुले मिळतील.”
1013  GEN 35:1  देव याकोबाला म्हणाला, “ऊठ, बेथेल नगरामध्ये जा आणि तेथे राहा. तुझा भाऊ एसाव याजपासून तू पळून जात असताना ज्याने तुला दर्शन दिले, त्या देवासाठी तेथे एक वेदी बांध.”
1093  GEN 37:9  नंतर योसेफाला आणखी एक स्वप्न पडले. तेही त्याने आपल्या भावांना सांगितले. तो म्हणाला, “पाहा, मला आणखी एक स्वप्न पडले: सूर्य, चंद्र व अकरा तारे यांनी मला खाली वाकून नमन केले.”
1133  GEN 38:13  तेव्हा तामारेला कोणी सांगितले की, “पाहा, तुझा सासरा आपल्या मेंढरांची लोकर कातरवून घेण्याकरता तिम्ना येथे जात आहे.”
1158  GEN 39:8  परंतु त्याने नकार दिला. तो त्याच्या धन्याच्या पत्नीला म्हणाला, “पाहा, घरात मी काय करतो याकडे माझा धनी लक्ष देत नाही आणि जे काही त्याचे आहे ते सर्व त्याने माझ्या ताब्यात सोपवले आहे.
1164  GEN 39:14  आणि तिने हाक मारून तिच्या घरातील मनुष्यांना बोलावले. आणि ती म्हणाली, “पाहा, पोटीफराने या इब्र्याला आमच्या घरच्या मनुष्यांची अब्रू घेण्यासाठी आणून ठेवले आहे. त्याने आत येऊन माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु मी मोठ्याने ओरडले.
1221  GEN 41:25  मग योसेफ फारोला म्हणाला, “महाराज, या दोन्हीही स्वप्नांचा अर्थ एकच आहे. देव जे काही करणार आहे ते त्याने आपणांस कळविले आहे.
1247  GEN 41:51  योसेफाने पाहिल्या मुलाचे नाव मनश्शे ठेवले. कारण तो म्हणाला, “देवाने, मला झालेल्या सर्व कष्टांचा व तसेच माझ्या वडिलाच्या घराचा विसर पडू दिला.”
1260  GEN 42:7  योसेफाने आपल्या भावांना पाहिल्याबरोबर ओळखले, परंतु ते कोण आहेत हे माहीत नसल्यासारखे दाखवून तो त्यांच्याशी कठोरपणाने बोलला. त्याने त्यांना विचारले, “तुम्ही कोठून आला?” त्याच्या भावांनी उत्तर दिले, “महाराज, आम्ही कनान देशातून धान्य विकत घेण्यासाठी आलो आहो.”
1265  GEN 42:12  नंतर तो त्यांना म्हणाला, “नाही, तुम्ही आमच्या देशाचा कमकुवत भाग पाहण्यास आलेले आहात.”
1311  GEN 43:20  ते म्हणाले, “धनी, मागच्या वेळी आम्ही धान्य खरेदी करण्यासाठीच आलो होतो.
1389  GEN 46:2  रात्री देव स्वप्नात दर्शन देऊन इस्राएलाशी बोलला, तो म्हणाला, “याकोबा, याकोबा.” त्याने उत्तर दिले, “काय आज्ञा?”
1444  GEN 47:23  तेव्हा योसेफ लोकांस म्हणाला, “पाहा, मी फारोकरता तुम्हास तुमच्या जमिनीसह विकत घेतले आहे तर मी आता तुम्हास बियाणे देतो. ते तुम्ही शेतात पेरा.
1473  GEN 48:21  मग इस्राएल योसेफाला म्हणाला, “पाहा, मी आता मरणार आहे. परंतु देव तुमच्या बरोबर राहील, तो तुम्हास तुमच्या पूर्वजांच्या देशात घेऊन येईल.
1512  GEN 50:5  ‘माझा बाप मरावयास टेकला असताना त्याने मला शपथ घेण्यास सांगून म्हटले, “पाहा, मी मरणार आहे. माझी जी कबर मी आपणासाठी कनान देशात खणून ठेवली आहे तिच्यात तू मला नेऊन पूर.” तेव्हा कृपा करून माझ्या पित्यास पुरावयास जाऊ द्या; मग मी परत येईन.
1592  EXO 3:12  देवाने उत्तर दिले, “खचीत, मी तुझ्याबरोबर असेन, मी तुला पाठवत आहे याची खूण हीच असेल; तू इस्राएली लोकांस मिसरमधून बाहेर आणल्यावर याच डोंगरावर तुम्ही देवाची उपासना कराल.”
1655  EXO 5:22  मग मोशेने परमेश्वराकडे परत जाऊन प्रार्थना करून म्हटले, “प्रभू, तू या लोकांस का त्रास देत आहेस? पहिली गोष्ट म्हणजे तू मला का पाठवलेस?
1687  EXO 7:1  परमेश्वर मोशेला म्हणाला, “पाहा, मी तुला फारोच्या नजरेत देवासमान महान करतो; आणि तुझा भाऊ अहरोन हा तुझा संदेष्टा होईल;
1740  EXO 8:25  मोशे म्हणाला, “पाहा, मी तुमच्यापासून जातो आणि फारो व त्याचे सेवक या सर्वांपासून उद्या गोमाशांचे थवे दूर करण्याकरिता परमेश्वरास विनंती करतो. परंतु परमेश्वरासाठी यज्ञ करण्यास जाणाऱ्या आमच्या लोकांस तुम्ही पुन्हा फसवू नये.”
2179  EXO 24:1  मग तो मोशेला म्हणाला, “तू, अहरोन, नादाब, अबीहू आणि इस्राएलांच्या वडिलापैकी सत्तरजण असे मिळून परमेश्वराकडे पर्वतावर चढून येऊन त्यास दुरूनच नमन करा;
2423  EXO 31:2  “पाहा, यहूदा वंशातील उरीचा मुलगा म्हणजे हूरचा नातू बसालेल याला मी निवडून घेतले आहे.
2440  EXO 32:1  मोशेला पर्वतावरून उतरण्यास बराच विलंब लागला आहे असे लोकांनी पाहिले तेव्हा सर्व लोक अहरोनाभोवती जमले व त्यास म्हणाले, “पाहा, मोशेने आम्हांला मिसर देशातून बाहेर आणले आहे. परंतु मोशेचे काय झाले ते आम्हांला कळत नाही, म्हणून आमच्यापुढे चालतील असे देव आमच्यासाठी तयार कर.”
2461  EXO 32:22  अहरोन मोशेला म्हणाला, “स्वामी, असे माझ्यावर रागावू नका; या लोकांची प्रवृत्ती पापाकडे आहे, हे आपल्याला माहीत आहे.
2470  EXO 32:31  तेव्हा मोशे माघारी परमेश्वराकडे जाऊन म्हणाला, “हाय, हाय या लोकांनी फार घोर पातक केले आहे. आपणासाठी सोन्याचे देव बनविले;
2503  EXO 34:6  परमेश्वर त्याच्यापुढून अशी घोषणा करीत गेला: “परमेश्वर, परमेश्वर, दयाळू, कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर,
2507  EXO 34:10  मग परमेश्वर म्हणाला, “पाहा, मी तुझ्या सर्व लोकांबरोबर हा करार करीत आहे; आतापर्यंत पृथ्वीवरील कोणत्याही राष्ट्रासाठी यापूर्वी कधीही केलेले नाहीत ते चमत्कार मी करीन; ज्या लोकांमध्ये तू राहशील ते सर्व लोक परमेश्वराची कृती पाहतील, कारण जे मी तुझ्याबरोबर करणार आहे ते भयानक आहे.
2997  LEV 10:19  परंतु अहरोन मोशेला म्हणाला, “पाहा, आज त्यांनी आपले पापार्पण व होमार्पण परमेश्वरासमोर अर्पण केले, आणि तरी आज माझ्यावर कशी संकटे आली आहेत हे तू जाणतोस; तेव्हा आज मी पापबली खाल्ला असता तर परमेश्वरास ते आवडले असते, असे तुला वाटते काय? नाही ना!”
3007  LEV 11:9  “जलाशयात, समुद्रात व नद्यात संचार करणाऱ्या ज्या प्राण्यांना पंख व खवले आहेत ते तुम्ही खावे.
4493  NUM 26:2  “इस्राएलात, वीस वर्षाचे आणि वीस वर्षांवरील अधिक वयाचे असून युध्दास जाण्याच्या लायकीचे असतील त्या सगळ्या मंडळीची त्यांच्या पूर्वजांच्या घराण्याप्रमाणे मोजणी करा.”
5003  DEU 3:26  पण तुमच्यापायी परमेश्वर माझ्यावर रुष्ट झाला होता. त्याने माझे म्हणणे ऐकले नाही. तो म्हणाला, “पुरे, आता एक शब्दही बोलू नको.
5182  DEU 9:23  जेव्हा परमेश्वराने कादेश-बर्ण्याहून तुम्हास रवाना करून सांगितले की, “जा, व जो देश मी तुम्हास दिला आहे तो ताब्यात घ्या,” तेव्हाही तुम्ही तुमचा देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेविरुद्ध बंड केले; तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही व त्याचे सांगणे ऐकले नाही.
5606  DEU 27:19  लेवींनी म्हणावे “परकीय, अनाथ, आणि विधवा यांच्याबाबतीत न्यायीपणाने न वागणारे शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.
5819  DEU 33:7  मोशेने यहूदाला हा आशीर्वाद दिला: “परमेश्वरा, यहूदा तुझ्याकडे मदत मागेल तेव्हा त्याचे ऐक. त्याच्या लोकांची व त्यांची गाठभेट करून दे. त्यास शक्तीशाली कर आणि शत्रूला पराभूत करण्यात त्यास साहाय्यकारी हो.”
5830  DEU 33:18  मोशे जबुलूनबद्दल म्हणाला, “जबुलूना, बाहेर जाल तेव्हा आनंद करा. इस्साखारा आपल्या डेऱ्यात आनंदाने राहा.
5835  DEU 33:23  नफताली विषयी मोशेने सांगितले, “नफताली, तू सर्व चांगल्या गोष्टीने समाधानी त्या तुला भरभरून मिळतील. तुझ्यावर परमेश्वराचा आशीर्वाद राहील. गालील तलावाजवळचा प्रदेश तुला मिळेल.”
5845  DEU 34:4  परमेश्वर मोशेला म्हणाला, “अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांना कबूल केलेला हाच तो प्रदेश. त्यांच्या वंशजांना तो द्यायचे मी त्यांना वचन दिले आहे. तुला मी तो पाहू दिला पण तू येथे जाणार नाहीस.”
5953  JOS 6:2  परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “पाहा, यरीहो, त्याचा राजा व त्याचे कसलेले योद्धे मी तुझ्या हाती दिले आहेत.
5958  JOS 6:7  तो लोकांस म्हणाला, “चला, नगराला प्रदक्षिणा घाला, आणि सशस्त्र पुरुषांनी परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे चालावे.”
5980  JOS 7:2  बेथेल शहराच्या पूर्वेस बेथ-आवेनाजवळ आय नगर आहे तिकडे यहोशवाने यरीहोहून माणसे पाठवली आणि त्यांना सांगितले की, “जा, तो देश हेरा.” तेव्हा त्यांनी जाऊन आय नगर हेरले,
6008  JOS 8:4  त्याने त्यांना अशी आज्ञा केली, “पाहा, नगराच्या मागे जाऊन नगरावर दबा धरून बसा; नगरापासून फार दूर जाऊ नका, पण तुम्ही सर्व तयार राहा.
6505  JOS 24:27  आणि यहोशवाने सर्व लोकांस म्हटले, “पाहा, ही धोंड आमच्याविषयी साक्षीदार होईल, कारण की परमेश्वराने आपली जी सर्व वचने आमच्याजवळ सांगितली ती हिने ऐकली आहेत; तर ही तुमच्याविषयी साक्षीदार यासाठी व्हावी की तुम्ही आपल्या देवाला कधी नाकारू नये.”
6615  JDG 4:14  दबोरा बाराकाला म्हणाली, “ऊठ, आजच परमेश्वराने सीसरावर तुला विजय दिला आहे; देव तुझ्यापुढे निघाला आहे की नाही?” मग बाराक व त्याच्या पाठोपाठ दहा हजार लोक ताबोर डोंगरावरून खाली उतरले.
6623  JDG 4:22  बाराक सीसराचा पाठलाग करीत आला तेव्हा त्यास याएल सामोरी येऊन म्हणाली, “चला, ज्या मनुष्याचा तुम्ही शोध करीत आहा तो मी तुम्हाला दाखवते.” तो तिच्यासोबत आत जाऊन पाहतो तो सीसरा मरून पडला होता आणि त्याच्या कानशिलात मेख ठोकलेली होती.
6709  JDG 7:13  मग गिदोन गेला आणि पाहा, कोणी आपल्या सोबत्याला असे स्वप्न सांगत होता की, “पाहा, मी एक स्वप्न पाहिले, सातूची गोल भाकर मिद्यानी तळात घरंगळत येऊन एका तंबूपर्यंत आली आणि तिने असा जोराचा धक्का दिला की, तो तंबू पडला आणि उलटून भुई सपाट झाला.”
6743  JDG 8:22  तेव्हा इस्राएलातल्या मनुष्यांनी गिदोनाला म्हटले, “तू, तुझ्या पुत्राने आणि तुझ्या नातवाने आमच्यावर राज्य करावे, कारण तू आम्हास मिद्यानाच्या तावडीतून सोडवले आहे.”
6787  JDG 9:31  मग त्याने कपट करून अबीमलेखाजवळ दूत पाठवून असे सांगितले की, “पाहा, एबेदाचा पुत्र गाल आपल्या भावांसोबत शखेमास आला आहे; आणि पाहा, ते तुझ्याविरूद्ध नगराला चिथावत आहेत.
6792  JDG 9:36  तेव्हा गालाने त्या लोकांस पाहून जबुलाला म्हटले, “पाहा, लोक डोंगरांच्या शिखरांवरून उतरतात.” मग जबुल त्यास बोलला, “तुला डोंगराची छाया मनुष्यांसारखी दिसते.”
6793  JDG 9:37  तेव्हा गालाने फिरून असे म्हटले की, “पाहा, देशाच्या उंचवटयावरून लोक उतरतात; आणि एक टोळी एलोन मौननीमाच्या वाटेवरून येत आहे.”
6889  JDG 13:3  तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्या स्त्रीला दर्शन दिले, आणि तिला म्हटले, “पाहा, तू गरोदर राहण्यास असमर्थ होतीस, म्हणून तू पुत्राला जन्म देऊ शकली नाहीस, परंतु आता तू गरोदर होऊन पुत्राला जन्म देशील.
6896  JDG 13:10  तेव्हा ती स्त्री त्वरीत पळाली आणि आपल्या पतीला म्हणाली: “पाहा, जो पुरुष त्यादिवशी माझ्याजवळ आला होता, तो माझ्या दृष्टीस पडला आहे.”
6927  JDG 14:16  तेव्हा शमशोनाची पत्नी त्याच्यासमोर रडून म्हणू लागली, “तुम्ही केवळ माझा द्वेष करता! माझ्यावर प्रीती करतच नाही. तुम्ही माझ्या लोकांस तर कोडे सांगितले आहे, परंतु त्याचे उत्तर मला सांगितले नाही.” परंतु शमशोन तिला म्हणाला, “पहा, मी आपल्या आईबापाला ते सांगितले नाही, तर तुला कसे सांगू?”
6944  JDG 15:13  मग त्यांनी त्यास सांगितले की, “नाही, आम्ही फक्त तुला दोरीने बांधू आणि तुला त्यांच्या हाती सोपवू. आम्ही तुला वचन देतो, आम्ही तुला मारून टाकणार नाही.” तेव्हा त्यांनी दोन नव्या दोरांनी त्यास बांधून खडकातून वर नेले.
6960  JDG 16:9  तेव्हा तिच्या आतल्या खोलीत गुप्तपणे माणसे दबा धरून बसली होती, आणि तिने त्यास म्हटले, “शमशोना, पलिष्टी तुजवर चालून आले आहेत!” परंतु त्याने जसा तागाचा दोरा अग्नी लागताच तुटून जातो तशा धनुष्याच्या त्या सात हिरव्या वाद्या तोडून टाकल्या. आणि त्याच्या बळाचे रहस्य त्यांना समजू शकले नाही.
6961  JDG 16:10  दलीला, शमशोनाला म्हणाली, “पाहा, तुम्ही मला फसवले आणि माझ्याशी लबाडी केली. तुमच्यावर कशाने मात करता येईल ते, मी विनंती करते, मला सांग.”
6963  JDG 16:12  तेव्हा दलीलाने नवे दोर घेऊन त्याने त्यास बांधले, आणि त्यास म्हटले, “शमशोना, पलिष्टी तुझ्यावर चालून आले आहेत.” तेव्हा ते आतल्या खोलीत वाट पाहत बसले होते. परंतु शमशोनाने त्याच्या दंडाला बांधलेले दोर धाग्याच्या तुकड्यासारखे तोडून टाकले.
6965  JDG 16:14  तो झोपला तेव्हा तिने त्याचे केस विणकाराच्या फणीमध्ये धाग्यांबरोबर ताणून बांधले आणि नंतर मागावर विणले; आणि ती त्यास म्हणाली, “शमशोना, पलिष्टी तुझ्यावर चालून आलेत!” तेव्हा तो आपल्या झोपेतून जागा झाला आणि त्याने विणकराची फणी व मागसुद्धा उखडून काढला.
7037  JDG 19:11  जेव्हा ते यबूसजवळ होते तेव्हा दिवस फार उतरला होता, म्हणून त्याच्या नोकराने आपल्या धन्याला म्हटले, “चला, आपण बाजूला वळून यबूसी यांच्या नगराकडे जाऊ आणि त्यामध्ये रात्र घालवू.”
7039  JDG 19:13  लेवीने आपल्या नोकराला सांगितले, “चल, आपण गिबा किंवा रामा या नगरांपैकी एका ठिकाणी पोहचू आणि त्यामध्ये रात्र घालवू.”
7049  JDG 19:23  मग तो मनुष्य, त्या घराचा धनी बाहेर त्यांच्याजवळ जाऊन त्यांना बोलला, “नाही, माझ्या भावांनो मी विनंती करतो अशी वाईट गोष्ट करू नका; हा मनुष्य माझ्या घरी पाहुणा म्हणून आला आहे, तर तुम्ही हा दुष्टपणा करू नका.
7054  JDG 19:28  तेव्हा लेवीने तिला म्हटले, “ऊठ, म्हणजे आपण जाऊ.” परंतु तिने उत्तर दिले नाही; नंतर तो पुरुष तिला गाढवावर घालून निघाला आणि आपल्या ठिकाणी गेला.
7139  RUT 1:10  त्या तिला म्हणाल्या, “नाही, आम्ही तुमच्याबरोबर तुमच्या लोकांकडे येणार.”
7144  RUT 1:15  ती तिला म्हणाली, “ऐक, तुझी जाऊ आपल्या लोकांकडे व आपल्या देवांकडे परत गेली आहे, तर तूही आपल्या जावेच्या मागून जा.”
7159  RUT 2:8  बवाज रूथला म्हणाला, “मुली, तू माझे ऐकतेस ना? तू दुसऱ्याच्या शेतात सरवा वेचायला जाऊ नकोस, येथेच माझ्या काम करणाऱ्या तरुण स्त्रियांबरोबर राहा.
7173  RUT 2:22  नामी आपली सून रूथ हिला म्हणाली, “मुली, तू त्याच्याच नोकरीणींबरोबर जावे, इतरांच्या शेतात तू लोकांस दिसू नये हे बरे.”
7184  RUT 3:10  तो म्हणाला, “मुली, परमेश्वर तुझे कल्याण करो, तू पहिल्यापेक्षा दुसऱ्या वेळेस अधिक प्रेमळपणा दाखविलास; कारण धनवान किंवा गरीब अशा कोणत्याही तरुणाच्या मागे तू गेली नाहीस.
7192  RUT 3:18  ती म्हणाली, “मुली, या गोष्टींचा कसा काय परिणाम होतो हे समजेपर्यंत तू स्वस्थ राहा. कारण आज तो मनुष्य या गोष्टीचा शेवट लावल्याशिवाय शांत राहणार नाही.”
7193  RUT 4:1  आता बवाज वेशीत जाऊन बसला; इतक्यात बवाज ज्या जवळच्या नातलगाबद्दल बोलला होता तोसुद्धा तेथे आला, तेव्हा हा त्यास म्हणाला, “मित्रा, येथे येऊन बस.” तेव्हा तो तेथे जाऊन बसला.
7516  1SA 14:6  योनाथान आपल्या तरुण शस्त्रवाहकाला म्हणाला, “चल, आपण त्या बेसुंत्यांच्या ठाण्यावर जाऊ. कदाचित परमेश्वर आमच्यासाठी कार्य करील; कारण बहुतांनी किंवा थोडक्यांनी सोडायला परमेश्वरास काही अडचण नाही.”
7614  1SA 16:17  मग शौलाने आपल्या चाकरास म्हटले, “जा, चांगला वाजविणारा पुरुष शोधून माझ्याकडे आणा.”
7806  1SA 22:16  राजा म्हणाला, “अहीमलेखा, तुला खचित मरण पावले पाहिजे; तुला व तुझ्या वडिलाच्या घराण्यातील सर्वांना मरण पावले पाहिजे”
8105  2SA 3:21  अबनेर दावीदाला म्हणाला, “महाराज, सर्व इस्राएल लोकांस मी आता आपल्या पायाशी एकत्र आणतो. ते तुमच्याशी करार करतील. मग आपल्या इच्छेप्रमाणे तुम्ही इस्राएलवर राज्य कराल.” तेव्हा दावीदाने अबनेरला निरोप दिला. अबनेर शांततेने परत गेला.